AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Election: बहुमत नसतानाही कसा झाला शिवसेनेचा महापौर? कसं जुळवलं आकड्यांचं गणित, माहिती आहे तुम्हाला तो खास किस्सा?

Mumbai Corporation Election History: राजकारणात केव्हा काय घडले हे सांगता येत नाही. मुंबई महापालिका ही त्याला अपवाद नाही. मुंबई महापालिकेच्या 2017 मधील निवडणुकीत भाजप आणि शिवेसना आमने-सामने होती. अशावेळी बहुमत नसतानाही असा झाला शिवसेनेचा महापौर...

BMC Election: बहुमत नसतानाही कसा झाला शिवसेनेचा महापौर? कसं जुळवलं आकड्यांचं गणित, माहिती आहे तुम्हाला तो खास किस्सा?
मुंबई महापालिका निवडणूक
| Updated on: Dec 26, 2025 | 3:37 PM
Share

BMC Shivsena Mayor 2017: आशियातील सर्वात श्रीमंत मुंबई महापालिका ताब्यात घेण्याचे भाजपचे मोठे स्वप्न आहे. पण 2017 मध्ये अगदी हातातोंडाशी आलेला हा घास भाजपला सोडावा लागला. नाट्यमयरित्या शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर हे मुंबईचे महापौर झाले. त्यावेळी अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. 8 मार्च 2017 मध्ये हा चमत्कार झाला. शिवसेनेने या निवडणुकीत 84 जागा पटकावल्या होत्या. तर भाजपचे 82 नगरसेवक निवडून आले होते. गेल्या निवडणुकीत दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले होते. तेव्हापासून शिवसेना आणि भाजपमध्ये वितुष्ट आल्याचे मानले जाते.पण भाजपच्या एका निर्णयामुळे शिवसेनेचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा झाला होता.

मुंबई महापालिकेची निवड 21 फेब्रुवारी 2017 रोजी एकाच टप्प्यात ही निवडणूक झाली. तर 23 फेब्रुवारी रोजी या निवडणुकीचा निकाल लागला होता. 227 जागांसाठी चुरशीची लढत झाली होती. कारण युतीमधील शिवसेना आणि भाजप यांनी संयुक्तपणे नाही तर स्वतंत्रपणे ही निवडणूक लढवली होती. दोन्ही मित्र एकमेकांविरोधात ठाकले होते. त्यात भाजपने मोठी मुसंडी मारली होती. भाजपने 82 तर शिवसेनेने 84 जागा जिंकल्या होत्या. दोन्ही पक्षाने 2012 मधील महापालिका निवडणुकीपेक्षा सरस कामगिरी केली होती. दोघेही चुरशीने लढले होते.

भाजपच्या भूमिकेने सेनेचा महापौर

विश्वनाथ महाडेश्वर हे बांद्रा पूर्व वॉर्ड क्रमांक 87 मतदारसंघातून निवडून आले होते. नगरसेवकांनी त्यांची महापौरपदी निवड केली होती. महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर भाजपने शिवसेनेला समर्थन दिले होते. शिवसेनेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर हे 171 मतांसह निवडून आले होते. तर हेमांगी वोरलीकर या उपमहापौर म्हणून निवडून आल्या होत्या. महाडेश्वर हे घाटकोपरच्या पंतनगरमध्ये राजे शिवाजी हायस्कूलमध्ये प्राध्यापक होते. 1992 मधील दंगलीत त्यांना सहा महिने तुरुंगवास झाला होता. त्यानंतर त्यांनी शिवसेनेला त्यांनी वाहून घेतले होते. 2017 मध्ये ते महापौरपदी आले.

1978 पासून मुंबईचे महापौर

कालावधी           महापौर

1978 -1978      व्ही एस महाडीक

1978 -1980     आर के चिंबुलकर

1980 – 1981     बी एच शेटे

1981 – 1982     ए यु मेमन

1982 – 1983    पी एस पै

1983 – 1984    एम एच बेदी

1985 – 1986   छगन भुजबळ

1986 – 1987    दत्ता नलावडे

1987 – 1988   डॉ. रमेश प्रभु

1988 – 1989   सी एस पडवळ

1989 – 1990   शरद आचार्य

1990 – 1991   छगन सी. भुजबळ

1991 – 1992   दिवाकर रावते

1992 – 1993   सी डी हांडोरे

1993 – 1994   आर आर सिंह

1994 – 1995   श्रीमती निर्मला सामंत-प्रभावळकर

1995 – 1996  रा ता कदम

1996 – 1997 मिलींद वैद्य

1997 – 1998  श्रीमती विशाखा राऊत

1998 – 1999  नंदु साटम

1999 – 2002  हरेश्वर पाटील

2002 – 2005  महादेव देवळे

2005 – 2007  दत्ताजी दळवी

2007 – 2009  शुभा ऊ. राऊळ

2009 – 2012  श्रध्दा श्रीधर जाधव

2012 – 2014  सुनिल वा प्रभु

2014 – 2017  स्नेहल सुर्यकांत आंबेकर

2017- 2019  विश्वनाथ महाडेश्वर

प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?.
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ.
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?.
अजित पवारांकडून स्वबळाचा नारा! दादांची NCP 'या' महापालिकांत स्वतंत्र?
अजित पवारांकडून स्वबळाचा नारा! दादांची NCP 'या' महापालिकांत स्वतंत्र?.
ते एकटे निष्ठावंत आहे का?जगतापांच्या राजीनाम्यावर रूपाली पाटलांच भाष्य
ते एकटे निष्ठावंत आहे का?जगतापांच्या राजीनाम्यावर रूपाली पाटलांच भाष्य.