Suraj Chavan : ‘गुलिगत स्टार’चं पारंपारिक पद्धतीने स्वागत, सूरज चव्हाणच्या लेकीचा खास व्हिडीओ

Suraj Chavan Daughter Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सुरज चव्हाणच्या लेकीचे घरी पारंपारिक पद्धतीने स्वागत केले जात असल्याचे दिसत आहे.

Suraj Chavan : गुलिगत स्टारचं पारंपारिक पद्धतीने स्वागत, सूरज चव्हाणच्या लेकीचा खास व्हिडीओ
Suraj Chavan
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Sep 10, 2026 | 2:09 PM

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय रिअॅलिटी शो बिग बॉस मराठीचा विजेता सूरज चव्हाण आणि पत्नी संजना यांना कृष्णजन्माष्टमीच्या शुभदिवशी मुलगी झाली. दोघे आता आनंदी आई-वडील झाले आहेत. ४ सप्टेंबर २०२६ रोजी घरात चिमुकल्या पाहुणीचे आगमन झाले आणि कृष्णाच्या जन्मदिनी राधा आल्याचा आनंद कुटुंबीयांनी साजरा केला. बाळाला आता मामाच्या घरी नेण्यात आले असून, तिथे पारंपरिक पद्धतीने तिचे स्वागत करण्यात आले आहे.

सुरजने दिली गूड न्यूज

सूरज आणि संजना यांना कृष्णजन्माष्टमीच्या दिवशी मुलगी झाली. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. संजनाने त्यात ‘घरी राधा आली आहे’ असे सांगितले. सूरज बाळाला पाहून खूप भावुक झाला. त्याने पत्नीला घट्ट मिठी मारली, तिच्या कपाळावर किस केले आणि डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. हा क्षण खूप भावूक करणारा होता. त्यानंतर धुळ्यातील दहीहंडी सोहळ्यात सूरजने स्वतः ही गुड न्यूज जाहीर केली. तो म्हणाला, “कृष्णाचा वार होता, म्हणजे जन्मोत्सव. त्याच दिवशी माझ्या घरी लक्ष्मी, राधा आली. मुलगी झाली आहे. खूप आनंद होत आहे. वडील झाल्यावर आता समजतंय की या भावना व्यक्त करता येत नाहीत. माझ्यावर आता मोठी जबाबदारी आली आहे.”

काय आहे व्हिडीओ?

आता सूरजच्या लेकीला रुग्णालयातून घरी आणण्यात आले आहे. तिला संजनाच्या माहेरी, म्हणजे मामाच्या घरी नेण्यात आले. तिथे औंक्षण करून, फुलांच्या पायघड्यांवरून घरात आणण्यात आले. फुगे आणि सजावट करून अगदी पारंपरिक पद्धतीने चिमुकल्या पाहुणीचे स्वागत करण्यात आले.

सूरज आणि संजना यांचे लग्न डिसेंबर 2025 मध्ये पुण्यात झाले होते. लग्नानंतर काही महिन्यांतच संजना प्रेग्नंट असल्याची चर्चा सुरू झाली. सुरुवातीला फोटोंवरून वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. नंतर संजनाने फक्त आवाज असलेला एक व्हिडिओ शेअर करत प्रेग्नन्सीची हिंट दिली. त्यानंतर जान्हवीने चोरओटीचा व्हिडिओ शेअर करत या बातमीची पुष्टी केली. हा व्हिडिओ मार्चमधील चोरओटीचा असल्याचे तिने सांगितले. सूरजनेही जूनमध्ये आपल्या खास स्टाईलमध्ये बाबा होणार असल्याची घोषणा केली होती. ‘तुमचा टॉपचा किंग बाबा होणार आहे, देणार धब्बा, टॉपचा किंग होणार पप्पा,’ असे तो व्हिडिओत म्हणाला होता.

प्रेग्नन्सीची घोषणा झाल्यानंतर सूरज-संजना नियमित रील्स आणि व्हिडीओ शेअर करत होते. संजनाचे विविध लुक्समधील व्हिडीओही येत होते. मात्र गेल्या एक महिन्यापासून दोघांचीही सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट नव्हती. त्यानंतर दोघांचा रुग्णालयात बाळासोबतचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि सर्वांना आनंदाची बातमी कळली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us