Suraj Chavan: माझी लाडूबाई.. सूरज चव्हाणने पहिल्यांदाच दाखवला लेकीचा चेहरा; लक्ष्मीपूजनाला पत्नी अन् चिमुकलीचं केलं औक्षण

Suraj Chavan: बाळाच्या जन्मानंतर संजना माहेरी होती. त्यानंतर दसऱ्याच्या मुहूर्तावर सूरजने पत्नी आणि लेकीचं घरी जंगी स्वागत केलं होतं. फुलांची सजावट, रांगोळी आणि आकर्षक रोषणाईने घर सजवण्यात आलं होतं. त्यावेळीही त्याने लेकीची झलक दाखवली होती.

Suraj Chavan: माझी लाडूबाई.. सूरज चव्हाणने पहिल्यांदाच दाखवला लेकीचा चेहरा; लक्ष्मीपूजनाला पत्नी अन् चिमुकलीचं केलं औक्षण
सूरज चव्हाणने दाखवला मुलीचा चेहरा
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 10, 2026 | 9:16 AM

Suraj Chavan: बिग बॉस मराठी 5चा विजेता आणि सोशल मीडियावर गुलिगत फेम म्हणून लोकप्रिय असलेला सूरज चव्हाण सध्या एका खास कारणामुळे चर्चेत आहे. सूरजने पहिल्यांदाच त्याच्या चिमुकल्या लेकीचा चेहरा चाहत्यांना दाखवला आहे. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सूरजने पत्नी संजना आणि आपल्या लाडक्या लेकीसोबत लक्ष्मीपूजन केलं. या खास क्षणांचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला असून, तो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. सूरजच्या लेकीची पहिली झलक पाहून चाहते तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. सूरज चव्हाणने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर लक्ष्मीपूजनाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सूरजच्या मांडीवर त्याची चिमुकली मुलगी दिसत आहे. विशेष म्हणजे, याच व्हिडीओतून त्याने पहिल्यांदाच लेकीचा चेहरा चाहत्यांना दाखवला आहे. चिमुकल्या राधाची ही पहिली झलक पाहण्यासाठी चाहते बऱ्याच दिवसांपासून उत्सुक होते.

सूरजने या व्हिडीओला ‘माझी लाडूबाई, माझी लाडाची लक्ष्मीचे लक्ष्मीपूजन’ असे भावनिक कॅप्शन दिलं आहे. मुलीच्या रूपाने आपल्या आयुष्यात आलेल्या आनंदाची झलक त्याने चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. सूरजने शेअर केलेल्या दुसऱ्या व्हिडीओमध्ये लक्ष्मीपूजनाचा एक खास विधी पाहायला मिळतो. यावेळी त्याची पत्नी संजना पाटावर बसलेली दिसते. तिच्या मांडीवर त्यांची चिमुकली मुलगी आहे. सूरज सर्वप्रथम आपल्या लेकीचे पाय पाण्याने धुतो. त्यानंतर तिच्या पायांना हळद-कुंकू लावून फुलं वाहत पूजा करतो. लेकीचं औक्षण करून तो तिच्याप्रती असलेलं प्रेम व्यक्त करतो.

Loading...

पहा व्हिडीओ-

यानंतर सूरज पत्नी संजनाचेही पाय धुतो. तिच्या पायांना हळद-कुंकू लावून फुलं वाहतो आणि तिचं औक्षण करतो. इतकंच नाही तर तो पत्नीच्या पाया पडून तिचे आशीर्वादही घेतो. सूरजने केलेला हा खास विधी पाहून नेटकऱ्यांनी त्याचं कौतुक केलं आहे. सूरजच्या या व्हिडीओवर त्याची मानलेली बहीण आणि अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिनेही प्रतिक्रिया दिली आहे. ‘आमची लक्ष्मी’ अशी कमेंट करत तिने सूरजच्या लेकीवरील प्रेम व्यक्त केलं आहे. चाहत्यांनीही चिमुकलीच्या गोंडस रूपाचं कौतुक करत सूरज आणि संजनाला शुभेच्छा दिल्या आहेत.

सूरज चव्हाणने 29 नोव्हेंबर 2025 रोजी संजनासोबत लग्नगाठ बांधली. लग्नानंतर काही महिन्यांतच त्यांच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचं आगमन होणार असल्याची गोड बातमी समोर आली होती. अखेर 4 सप्टेंबर 2026 रोजी संजनाने गोंडस मुलीला जन्म दिला. जन्माष्टमीच्या दिवशी मुलगी झाल्याने सूरजने त्याच्या लेकीचं नाव राधा ठेवलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us