हिरोच्या पत्नीमुळे गमवावा लागला चित्रपट? अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा
बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूने चित्रपटांमधील तिच्या कटू अनुभवांचा नुकताच खुलासा केला. एका मुलाखतीत तिने सांगितले, की एका अभिनेत्याच्या हट्टामुळे तिला चित्रपटातून काढण्यात आले. इतकेच नाही तर, 'हिरोच्या पत्नीला मी आवडत नाही' या विचित्र कारणास्तव एका मोठ्या प्रोजेक्टमधून मला वगळण्यात आले. तापसीच्या या धक्कादायक दाव्याने सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नी अभिनयात जितकी अव्वल आहे तितकीच बेधडक वागण्या-बोलण्यासाठीही ओळखली जाते. तिच्या मनात काय आहे , ते ती थेट बोलते. गुळमुळीत उत्तर न देता ती बिनधास्त वक्तव्य करते. फिल्म इंडस्ट्रीमधील कटू अनुभव आणि संघर्षांबद्दल ती बऱ्याचदा बोलते. नुकताच तापसीने एका धक्कादायक खुलासा केला. फक्त एका हिरोच्या हट्टामुळे, मला फिल्ममधून बाहेर काढण्यात आलं होतं, असं तिने सांगितलं. एवढंच नव्हे तर आणखी एखा घटनेबद्दल बोलताना ती म्हणाली होती की, हिरोच्या बायकोला मी आवडले नाही, म्हणूनही मला एका प्रोजेक्टमधून हटवण्यात आलं. तिच्या धक्कादायक खुलाशामुळे चांगलीच खळबळ माजली आहे.
नयनदीप रक्षित यांच्याशी झालेल्या संवादादरम्यान तापसीने काम करताना आलेल्या काही धक्कादायक अनुभवांचा खुलासा केला. त्या मुलाखतीत बोलताना तिने सांगितलं की, एका चित्रपटातून तिला काढून टाकण्यात आलं आणि त्यामागे मुख्य अभिनेत्याची इच्छा होती, असंही तिला स्पष्टपणे सांगण्यात आलं.
त्याबाबत बोलताना तापसी म्हणाली की, “ मला सरळ सांगण्यात आलं होतं की, चित्रपटातील मुख्य अभिनेत्याने मला रिप्लेस करायला सांगितलं आहे. मात्र, त्यामागचं नेमकं कारण काय होतं, हे मला कधीच कळलं नाही. मी अनेकदा त्यामागची कारणं समजून घेण्याचा प्रयत्न केला. कदाचित ही त्यांच्या मनातील असुरक्षिततेची भावना असू शकते किंवा त्यांना त्यांच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीला चित्रपटात संधी द्यायची असेल. यामागे अनेक कारणं असू शकतात. पण मला आजपर्यंत कोणतंही ठोस कारण सांगण्यात आलेलं नाही” असं तापसी म्हणाली.
हिरोच्या बायकोमुळे गमावला चित्रपट
एवढंच नव्हे तर तापसीने याच मुलाखतीत, तिला चित्रपटातून रिप्लेस करण्यामागे देण्यात आलेल्या एका अत्यंत विचित्र कारणाचाही खुलासा केला. आतापर्यंत मला चित्रपटातून काढण्यासाठी देण्यात आलेल्या कारणांपैकी हे सर्वात विचित्र होतं, असं ती म्हणाली.
“ मला रिप्लेस करण्यासाठी आतापर्यंत सांगण्यात आलेलं सर्वात विचित्र कारण म्हणजे, ‘हिरोच्या पत्नीला तुम्ही आवडत नाही.’ हे होतं… त्यांना माझ्याबद्दल नेमकी काय अडचण होती, हे मला आजपर्यंत समजलेलं नाही” असं तापसी म्हणाली. पण तो चित्रपट किंवा तो अभिनेता कोण होता, ते काही तिने स्पष्टपणे सांगितलं नाही. तिच्या या विधानाने चर्चांना उधाण आलंय.