तारक मेहता… फेम बावरीने अत्याचाराला वैतागून स्वतःला संपवणार होती, पण…, आता कशी आहे अभिनेत्री?

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम बावरीवर झालेले अत्याचार, वैतागलेल्या बावरीने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न..., आता कशी आहे अभिनेत्रीची प्रकृती? सध्या सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा...

तारक मेहता... फेम बावरीने अत्याचाराला वैतागून स्वतःला संपवणार होती, पण..., आता कशी आहे अभिनेत्री?
फाईल फोटो
| Updated on: Jul 13, 2025 | 3:05 PM

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ गेल्या 17 वर्षांपासून चाहत्यांचं मनोरंजन करत आहे. गेल्या 17 वर्षांत मालिकेने अनेक चढ – उतार पाहिले. अनेकांनी मालिकेचा निरोप घेतला तर, अनेकांनी निर्माते अतिस मोदी यांच्यावर गंभीर आरोप देखील केले. दरम्यान वैतागलेल्या बावरीने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न देखील केला. बावरी म्हणजे मालिकेत बाघा याच्या गर्लफ्रेंडची भूमिका बजावणारी अभिनेत्री मोनिका भदौरिया. मोनिका हिने देखील मालिकेचा निरोप घेतला आहे .

मालिका सोडल्यानंतर मोनिका हिने असित मोदी यांच्यावर अनेक गंभीर आरोप देखील केलं. मालिकेच्या निर्मात्यांनी मोनिका हिने 4 – 5 लाख रुपये थकवले होते. जेव्हा मोनिका हिने स्वतःचे पैसे मागण्याचा प्रयत्न केला तेव्हा, तिच्याकडून बळजबरी करार साईन करुन घेण्यात आला.

मोनिका भदोरिया हिने सांगितलं की, जेव्हा तिने शोच्या निर्मात्यांशी सेटलमेंट केलं तेव्हा प्रॉडक्शन प्रमुखांनी तिच्यावर खूप ओरड केली होती. शोमध्ये काम करत असताना मोनिकाच्या आई आणि आजीचे निधन झालं होतं, ज्यामुळे तिचं दुःख आणि अडचणी आणखी वाढल्या होत्या.

मोनिका म्हणाली, ‘आई आणि आजी यांचं निधन झाल्यानंतर मला प्रचंड वाईट वागणूक देण्यात आली. अत्याचार केले… एक वेळ अशी देखील आली जेव्हा मी स्वतःला संपवण्याचा निर्णय देखील घेतला… असित मोदी सतत ओरडायचे, शिव्या द्यायचे…’ एवढंच नाही तर, त्यांनी अभिनेत्रीला धमकी देखील दिली होती.

‘तुला मुंबईत काम मिळणार नाही. त्यांनी मला माझं करीयर संपवेल अशी धमकी दिली. ज्याचा माझ्या करीयरला फार मोठा फटका बसला. मला पुन्हा काम मिळवण्यासाठी अनेक संकटांचा सामना करावा लागला…’ असं देखील मोनिका म्हणाली.

मोनिकाने सांगितले होते की प्रोजेक्ट हेड सोहेल रमानी यांचा फोन आल्यानंतर ती ऑफिसमध्ये गेली आणि तिथं दुसरं कोणीतरी होतं. त्या व्यक्तीने मोनिकाला सांगितले की तिला तिच्या वजनाबद्दल बोलण्यास सांगितलं. तो पुरुष मोनिकाला म्हणाली, ‘जरा स्वतःला बघ असं वाटतं प्रेग्नेंट आहेस आणि तुझं लग्न देखील झालं नाहीये…’ असे अनेक धक्कादायक खुलासे मालिकेतील अन्य कलाकारांनी देखील केले.

आता मोनिका सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.