
बॉलिवूडमधील उत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक असलेल्या तब्बूने आपल्या चित्रपट आणि अभिनयासह वैयक्तिक आयुष्यामुळेही कायम चर्चेत राहिली आहे. तब्बू अनेकांसोबत रिलेशनशीपमध्ये होती, तरीही ती सिंगल लाइफ जगत आहे. वयाच्या 53 व्या वर्षीही तिने लग्न केलेले नाही. तिचे नाव अनेक प्रसिद्ध व्यक्तींसोबत जोडले गेले आहे. बॉलिवूड अभिनेता संजय कपूरपासून ते दक्षिणेतील सुपरस्टार नागार्जुनपर्यंत, तब्बूने या दोघांना डेट केले आहे.
तब्बू नावाच्या अभिनेत्रीच्या आयुष्यात एक असा क्षणही आला जेव्हा ती लग्न करून संसार थाटणार होती. एका प्रसिद्ध निर्मात्याशी तिचा साखरपुडा झाला होता. पण काही कारणांमुळे हे नाते लग्नापर्यंत पोहोचले नाही आणि त्यांचा साखरपुडा मोडला. त्यानंतर आजतागायत तब्बू अविवाहित आहे.
संजय कपूरला केले होते डेट
बॉलिवूडमध्ये तब्बूचा डेब्यू 1994 मधील ‘पहला पहला प्यार’ या चित्रपटातून झाला होता. तिचा डेब्यू 1995 मधील ‘प्रेम’ या चित्रपटातून होणार होता, ज्याचे शूटिंग 1991 मध्येच सुरू झाले होते. पण हा चित्रपट रखडला आणि 1995 मध्ये रिलीज झाला. यात तब्बूने संजय कपूरसोबत काम केले होते. यावेळी दोघे एकमेकांना डेट करत होते. संजयने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत तब्बूसोबतच्या प्रेमाची कबुली दिली होती. पण लवकरच दोघे वेगळे झाले.
साजिद नाडियाडवालाशी मोडला साखरपुडा
संजयपासून वेगळे झाल्यानंतर तब्बूच्या आयुष्यात बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता साजिद नाडियाडवालाची एन्ट्री झाली. तब्बूने 1996 मधील ‘जीत’ या चित्रपटात काम केले होते, ज्याचा निर्माता साजिद होता. याचवेळी साजिद आणि तब्बू एकमेकांच्या जवळ आले. दोघांनी एकमेकांसोबत आयुष्य घालवण्याचा निर्णय घेतला आणि साखरपुडा केली. पण काही कारणांमुळे हे नाते लग्नापर्यंत पोहोचले नाही. तब्बूसोबतच्या नात्याबाबत आणि साखरपुड्याबाबत साजिदने लहरें रेट्रोला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते.
विवाहित नागार्जुनवरही आले मन
तब्बूचे नाव नंतर विवाहित दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता नागार्जुन याच्याशीही जोडले गेले. पण या नात्यातही अभिनेत्रीला निराशाच हाती लागली. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर तब्बू आणि नागार्जुन वेगळे झाले.