PHOTO | एक फोटो, तीन सुपरस्टार आणि मोठं राजकीय स्टेटमेंट, का बॉलिवूडला झापतायत नेटीझन्स?

सध्या देशातील अनेक राज्यात निवडणुका सुरू आहेत. तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत अनेक दक्षिण सुपरस्टार्स स्वत:ला मतदान करण्यासाठी बाहेर पडले होते. कमल हसन ते थलापती विजयपर्यंत अनेक सेलिब्रिटींनी मतदान केले.

Harshada Bhirvandekar | Updated on: Apr 07, 2021 | 12:35 PM
1 / 6
सध्या देशातील अनेक राज्यात निवडणुका सुरू आहेत. तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत अनेक दक्षिण सुपरस्टार्स स्वत:ला मतदान करण्यासाठी बाहेर पडले होते. कमल हसन ते थलापती विजयपर्यंत अनेक सेलिब्रिटींनी मतदान केले.

सध्या देशातील अनेक राज्यात निवडणुका सुरू आहेत. तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत अनेक दक्षिण सुपरस्टार्स स्वत:ला मतदान करण्यासाठी बाहेर पडले होते. कमल हसन ते थलापती विजयपर्यंत अनेक सेलिब्रिटींनी मतदान केले.

2 / 6

मात्र, यानंतर नेटकऱ्यांनी बॉलिवूड कलाकारांना ट्रोल करत बोल लावण्यास सुरुवात केली. याला कारण ठरली दक्षिणेतल्या या प्रसिद्ध कलाकारांची निवडणुकीतील स्वतःची भूमिका...प्रत्येक कलाकाराने आपली अशी ठाम भूमिका घेऊन मतदान केले. या मतदानाचे फोटो सध्या चर्चेत आले आहेत.

3 / 6

बॉलिवूडचे स्टार भूमिका घेत नाहीत आणि साऊथ सुपरस्टार्स घेतात, हेच सुनवत नेटकऱ्यांनी बॉलिवूड कलाकारांना खडे बोल सुनावले आहेत. इतकेच नाही तर हे दक्षिणात्य कलाकार चक्क सामान्य जनतेप्रमाणे मतदानाला हजार झाले होते. यावरूनही बॉलिवूड कलाकारांना लोकांनी फटकारले आहे.

4 / 6

सुपरस्टार विजय सेतुपती यांनी म्हटले की, ‘मी त्या पक्षासाठी मतदान करणार नाही, जे जात आई धर्माच्या नावावर राजकारण करतात.’ चाहत्यांनी त्याच्या या भूमिकेचे कौतुक केले आहे.

5 / 6

तर, वाढते प्रदूषण, ट्राफिकची काळजी आणि पेट्रोलच्या वाढत्या दाराकडे लोकांचे लक्ष केंद्रित करण्यासाठी थलापती विजय हा चक्क सायकलवरून मतदान केंद्रात पोहोचला होता.

6 / 6

साऊथचा आणखी एक सुपर स्टार थाला अजितकुमार हे देखील पत्नीसमवेत मतदान केंद्रावर पोहोचले होते. यावेळी त्यांनी DMK पक्षाच्या झेंड्याचा रंग असलेला मास्क परिधान केला होता. यावेळी चाहत्यांच्या गराड्यात त्यांनी फोटो देखील काढले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us