प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा 24 वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत इंटिमेट सीन; चाहते नाराज!

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या वेब सीरिजमधील सीन सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती, अशा शब्दांत चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा 24 वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत इंटिमेट सीन; चाहते नाराज!
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 04, 2026 | 11:59 AM

टेलिव्हिजन इंडस्ट्रीतल्या अभिनेत्रींना एका ठराविक भूमिकांमध्ये पाहण्याची प्रेक्षकांना सवय असते. त्यामुळे जेव्हा हे कलाकार आपली चौकट मोडून नवीन काहीतरी प्रयोग करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा अनेकांना ते आवडत नाही. हिंदी टीव्ही इंडस्ट्रीत लोकप्रिय असलेल्या मराठमोळ्या तेजस्वी प्रकाशसोबत असंच काहीसं घडलं आहे. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. तेजस्वीने नुकतचं ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाऊल ठेवलं आहे. ‘सायको सैया’ या शोमधून ती ओटीटीवर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. यामध्ये भोजपुरी सुपरस्टार रवी किशन आणि सुरभी ज्योती यांच्या मुख्य भूमिका आहेत. या वेब सीरिजमध्ये तेजस्वी तिच्यापेक्षा वयाने 24 वर्षांनी मोठ्या असलेल्या रवी किशनसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.

रवी किशन भोजपुरी आणि हिंदी सिनेसृष्टीतील प्रतिभावान अभिनेता आहे. चित्रपट असो किंवा वेब सीरिज.. रवी किशन पडद्यावर येतो तेव्हा प्रेक्षकांकडून टाळ्यांचा कडकडाट आवर्जून होतो. दुसरीकडे तेजस्वी प्रकाश ही टेलिव्हिजन क्वीन आहे, असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. तेजस्वीने मालिका आणि बिग बॉससारख्या शोजमधून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. हे दोन पॉवरफुल स्टार आता ‘सायको सैया’ या सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या सीरिजचे काही क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

यातल्या एका क्लिपमध्ये रवी किशन तेजस्वीसोबत रोमँटिक होताना दिसत आहे. तेजस्वीला प्रेक्षक पहिल्यांदाच अशाप्रकारे इंटिमेट सीन करताना पाहणार आहेत. कारण छोट्या पडद्यावर तिने आतापर्यंत फक्त सून आणि नागिनची भूमिका साकारली होती. परंतु आता ‘सायको सैया’मध्ये ती एका बोल्ड भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आदर्श सुनेच्या प्रतिमेला झुगारून ती एका वेगळ्या अंदाजात दिसणार आहे.

छोट्या पडद्यावरील अभिनेत्रींना बोल्ड भूमिकांमध्ये पाहणं चाहत्यांसाठी सवयीचं किंवा सोपं नसतं. तेजस्वीला इंटिमेट सीनमध्ये पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. तुला या भूमिकेत पहायला आवडत नाही, असं एकाने लिहिलं आहे. तर करणला हे सर्व कसं सहन झालं, असं दुसऱ्याने म्हटलंय. रवी किशन यांना अशी भूमिका शोभत नाही, असंही काहींनी लिहिलंय. ‘सायको सैया’ ही सीरिज 25 फेब्रुवारीपासून एमएक्स प्लेयरवर स्ट्रीम होत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us