फी भरायला पैसे नव्हते, दहावीनंतर शाळा सोडली; आता टॉप अभिनेत्रींपैकी एक
अशी एक अभिनेत्री जी आज आपल्या टॅलेंटच्या जोरावर फिल्म इंडस्ट्रीवर राज्य करतेय. पण एक काळ असा होता जेव्हा आर्थिक अडचणींमुळे या अभिनेत्रीला तिचं शिक्षण मध्येच सोडावं लागलं. पण तिने संघर्षातून आपलं करिअर घडवलं. कोण आहे ही अभिनेत्री माहितीये?

मराठी इंडस्ट्री असो किंवा बॉलिवूड प्रत्येक कलाकाराचा स्ट्रगल हा वेगळा असतो. अनेकजण संघर्षातून वाट काढत आपलं करिअर घडवत असतता. यात अभिनेत्रीही मागे नाहीयेत. अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी मोठ्या कष्टाने आपलं करिअर घडवलं आहे. एवढंच नाही तर फार गरीब परिस्थितीतही आपल्या भविष्य घडवण्यासाठी ठाम उभ्या राहिल्या आहेत.
अशीच एक अभिनेत्री आहे जिने फार वाईट परिस्थितीतून आपलं करिअर घडवलं आहे. तिने फी भरण्यासाठी पैसे नव्हते म्हणून ती इंडस्ट्रीमध्ये आली, मेहनत केली अन् आज प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय. ही अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडित.
शिक्षण अपूर्ण राहण्यामागे आर्थिक कारणं होती.
तसं पाहायला गेलं तर कलाकार नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतात. चाहत्यांनाही आपल्या आवडत्या स्टारबद्दल सगळं जाणून घ्यायचं असतं. मराठी इंडस्ट्रीमध्ये आपलं नाव उंचावणारी अभिनेत्री जीचे फक्त दहावीपर्यंत शिक्षण झालं आहे. शिक्षण कमी असूनही, ही अभिनेत्री आज इंडस्ट्रीच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. तेजस्विनी फक्त दहावीपर्यंत शिकली आहे. शिक्षण अपूर्ण राहण्यामागे आर्थिक कारणं होती. सध्या ती ‘ये रे ये रे पैसा 3’ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याच निमित्ताने तिने एका यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली. यावेळी तिने तिच्या संघर्षाबद्दल तसेच अपूर्ण शिक्षणाबद्दल वैगरे सगळं सांगितलं.
अभिनय क्षेत्रात यायचं असं कधीच ठरवलं नव्हतं
तेजस्विनी म्हणाली, “अभिनय क्षेत्रात यायचं असं मी कधीच ठरवलं नव्हतं. मला खरं तर इंटिरियर डिझायनिंग किंवा फॅशन डिझायनिंगमध्ये जास्त इंटरेस्ट होता.” दहावीनंतर तिला हेच करायचं होतं. ती पुढे म्हणाली, “फॅशन डिझायनिंगकडे माझा ओढा जास्त होता. तेव्हा मी सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये इंटिरियर डिझायनिंगची चौकशी करत होते आणि NIFT मध्ये फॅशन डिझायनिंगबद्दल माहिती घेतली.”
वडिलांनी स्पष्टपणे सांगितलं, माझ्याकडे पैसे नाहीत
तेजस्विनीने तिचं शिक्षण अपूर्ण राहण्यामागचं खरं कारणही सांगितलं. ती म्हणाली, “पण, दोन्ही कोर्सची फी तेव्हा साधारण 80 हजार रुपये होती.” तेव्हा तिच्या वडिलांनी तिला स्पष्टपणे सांगितलं, “तेजू, माझ्याकडे पैसे नाहीत. त्यामुळे तुझी ऍडमिशन नाही करू शकत.”
जेव्हा कमवेन किंवा पैसे येतील, तेव्हा शिक्षण घेईन
तेजस्विनीला अकरावी, बारावी असं ‘नॉर्मल’ शिक्षण घ्यायचं नव्हतं. त्यामुळे तिने वडिलांना सांगितलं, “ठीक आहे, पण मला याच क्षेत्रात काहीतरी करायचंय. आता पैसे नसतील तर आपण नको करूयात. जेव्हा मी कमवेन किंवा पैसे येतील, तेव्हा मी शिक्षण घेईन.”
View this post on Instagram
टॅलेंटच्या जोरावर मराठी इंडस्ट्रीत आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय.
त्यानंतर ती या इंडस्ट्रीत आली. त्यानंतर तिला एकामागोमाग चांगले प्रोजेक्ट मिळत गेले.मालिका , चित्रपट मिळाले आणि त्यानंतर ती एक अभिनेत्री म्हणून नावारुपाला आली. इथे ती इतकी रमली, नंतर शिक्षण घ्यायला तिला वेळच मिळाला नाही. अशाप्रकारे, शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी अभिनयाच्या क्षेत्रात आलेली तेजस्विनी पंडित आज तिच्या टॅलेंटच्या जोरावर मराठी इंडस्ट्रीत आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय.
