AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वतंत्र राहण्याच्या धडपडीत अरुंधती पडणार एकटी? बाईचं एकटं राहणं अजूनही पचनी का पडत नाही?

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेत अरुंधतीच्या (Arundhati) आयुष्यातील महत्त्वपूर्ण टप्पा सुरू आहे. ज्या देशमुख कुटुंबात ती अनेक वर्षे राहिली, ते घर कायमस्वरुपी सोडल्यानंतर आता अरुंधतीने स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे.

स्वतंत्र राहण्याच्या धडपडीत अरुंधती पडणार एकटी? बाईचं एकटं राहणं अजूनही पचनी का पडत नाही?
Aai Kuthe Kay KarteImage Credit source: Hotstar
| Updated on: Mar 03, 2022 | 1:01 PM
Share

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेत अरुंधतीच्या (Arundhati) आयुष्यातील महत्त्वपूर्ण टप्पा सुरू आहे. ज्या देशमुख कुटुंबात ती अनेक वर्षे राहिली, ते घर कायमस्वरुपी सोडल्यानंतर आता अरुंधतीने स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला जरी तिच्या आईचा आणि भावाचा पाठिंबा असला तरी एकटं असल्यामुळे घर शोधताना तिला अडचणींचा सामना करावा लागला. या अडचणींवर मात करत तिने देशमुखांच्या नाकावर टिच्चून एकटं राहण्यासाठी घर शोधलंच. मात्र या सर्व प्रवासात अरुंधती कुठे तरी एकटी पडणार का, असा प्रश्न प्रेक्षकांसमोर निर्माण झाला आहे. एकटं राहण्याचा निर्णय घेणं हे आधीच स्त्रीसाठी अवघड असतं आणि तो निर्णय घेतल्यानंतरही तिला इतरांकडून अपेक्षित अशी साथ मिळत नाही. अशा निर्णयांमध्ये अनेकदा एक स्त्रीसुद्धा दुसऱ्या स्त्रीची साथ देण्यासाठी पुढे येत नाही. कांचन देशमुखांनी तर अरुंधतीला एकटं पाडण्याची पूर्ण तयारीच केली आहे. त्यामुळे आता मालिकेत पुढे घडणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. (Marathi Serial)

अरुंधती घर सोडून गेली आणि ती स्वतंत्र राहू लागली, हे अजूनही कांचन देशमुखांच्या पचनी पडत नाही आहे. विनायकरावांच्या वाढदिवसाची तयारी करत असतानाच अरुंधतीला कसं एकटं पाडायचं, याचाही विचार त्यांच्या डोक्यात घोळतोय. तर दुसरीकडे विनायकरावांनी मात्र अरुंधतीला भेटवस्तू देण्याची तयारी सुरू केली. अरुंधती लवकरच तिच्या नवीन घरात राहायला जाणार आहे. असं असलं तरी देशमुख कुटुंबीयांच्या आठवणी तिच्या मनात कायम आहेत.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

अरुंधतीला एकटं पाडण्याच्या कटात कांचन देशमुखांचा विजय होणार की त्यांचा अंदाज पुन्हा एकदा चुकणार, हे मालिकेच्या पुढील भागात प्रेक्षकांना पहायला मिळेल. अरुंधतीचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतोय. या मालिकेत अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर अरुंधतीची भूमिका साकारत असून त्यांचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. याशिवाय मालिकेत मिलिंद गवळी, रुपाली भोसले यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

संबंधित बातम्या: ‘आपण बरं अन् आपलं काम बरं’ अशी मंडळी घातक ठरतात? अनघामुळे देशमुखांचं घर पुन्हा फुटीच्या उंबरठ्यावर?

संबंधित बातम्या: आई कुठे काय करते: देशमुखांसमोर आशुतोष देणार प्रेमाची कबुली; काय असेल अरुंधतीची प्रतिक्रिया?

संबंधित बातम्या: आई कुठे काय करते: अरुंधतीने सोडला तिचा घरावरचा हक्क; कांचन देशमुखांवर भडकले नेटकरी

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...