Aai Kuthe Kay Karte | अनिरुद्ध पुन्हा अरुंधतीकडे जाणार, संजना देशमुखांच्या घरात एकटी पडणार?

संजनाने साम-दाम-दंड-भेद वापरून अनिरुद्धशी लग्न करून देशमुखांच्या घरात संसार थाटला आहे. यानंतर आता देशमुखांच्या कुटुंबाची सूत्र एकहाती घेण्यासाठी संजनाची धडपड सुरु आहे. या सगळ्यात मात्र अनिरुद्ध पुन्हा एकदा अरुंधतीच्या बाजूने झुकताना दिसणार आहे.

Aai Kuthe Kay Karte | अनिरुद्ध पुन्हा अरुंधतीकडे जाणार, संजना देशमुखांच्या घरात एकटी पडणार?
आई कुठे काय करते
| Edited By: | Updated on: Sep 09, 2021 | 4:00 PM

मुंबई : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte ) सध्या प्रेक्षकांमध्ये खूप चर्चेत आहे. मालिकेच्या कथानकाने सध्या अतिशय रंजक वळण घेतलं आहे. संजनाने साम-दाम-दंड-भेद वापरून अनिरुद्धशी लग्न करून देशमुखांच्या घरात संसार थाटला आहे. यानंतर आता देशमुखांच्या कुटुंबाची सूत्र एकहाती घेण्यासाठी संजनाची धडपड सुरु आहे. या सगळ्यात मात्र अनिरुद्ध पुन्हा एकदा अरुंधतीच्या बाजूने झुकताना दिसणार आहे.

मालिकेत नुकताच कृष्णजन्म सोहळा पार पडला. यावेळी देशमुखांच्या घरी अनघाने देखील हजेरी लावली होती. तर, रात्री उशीर झाली, तिला एकटीला घरी जावे लागू नये म्हणून गौरीने अनघाला रात्री तिच्या घरी थांबण्याची विनंती केली. तर, अनघासोबत आजची रात्र सगळे धमाल करू असं म्हणत, गौरीच्या घरी गप्पा आणि दम शेराजची मैफल रंगली. सगळे तिथे गेलेले पाहून अनिरुद्ध देखील तिथे जाण्याची धडपड करत होता. संजनाचा डोळा चुकवून अनिरुद्ध गुपचूप गौरीच्या घरी गेला. इथे संजना त्याच्य्साठी कॉफी घेऊन बाल्कनीत आली आणि तिला समोर अनिरुद्ध आणि अरुंधती हसत एकमेकांना टाळी देताना दिसले. हे पाहून आता संजनाचा तिळपापड झाला आहे.

पाहा नवा प्रोमो :

संजना करणार अनघाला भडकवण्याचा प्रयत्न

अंकिताचं सत्य समोर आल्यानंतर आता ती अभिषेकच्या आयुष्यातून दूर झाली आहे. यानंतर पुन्हा एकदा अभि आणि अनघामध्ये जवळीक निर्माण होतेय. अरुंधतीच्या ऑपरेशवेळी देखील अनघानेच जबाबदारीने पुढे होत तिची सोबत दिली होती. याचवेळी अभि आणि अनघा पुन्हा एकदा चांगले मित्र झाले होते. म्हणूनच यश आणि इशाने तिला देखील घरी बोलवण्यासाठी आईला सांगितले होते.

यावेळी घरी आलेल्या अनघाला पाहून संजना आता आपला मोर्चा तिच्याकडे वळवणार आहे. घरातील कृष्णजन्म सोहळा आणि पूजा पार पडल्यानंतर संजना अनघाकडे येऊन तिला घरी आल्याबद्दल थँक्यू म्हणते. तर, इतकं सगळं होऊनही तू अभिकडे येतेस, तुला कसं जमलं? तुला नाही वाटत का की यात अरुंधतीची देखील चूक होती. तुमचं नातं तुटण्याला अरुंधती जबाबदार होती, असं देखील म्हणते. यावर अरुंधती तिला तिच्या ल्ग्नावेली अनिरुद्ध कसा पळून गेला होता, तरी तिने लग्न केलं या प्रसंगाची आठवण करून देत तिची बोलती बंद करते.

अरुंधती झाली ‘समृद्धी’ची मालकीण

संजना घरात आल्यानंतर आता अप्पांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. अरुंधतीने देशमुखांच्या कुटुंबात राहावं, ती इथे राहिल्यानेच घरात शांतता नांदेल, असा विचार करणाऱ्या अप्पांनी देशमुखांचा ‘समृद्धी’ बंगला आता अनिरुद्ध आणि अरुंधती या दोघांच्याही नावावर समान वाटला आहे. अर्थात आता अरुंधती देखील या अर्ध्या घराची मालकीण झाली आहे. त्यामुळे आता ती पुन्हा एकदा देशमुखांच्याच घरात राहणार आहे.

हेही वाचा :

He Ganaraya : बाप्पाचं आगमन होणार धुमधडाक्यात, ‘हे गणराया’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Bigg Boss Marathi 3 | दार परत उघडणार आणि एकच आवाज घुमणार, ‘बिग बॉस मराठी 3’च्या प्रोमोचा मेकिंग व्हिडीओ पाहिलात का?