AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘I DID NOT QUIT!!’, ‘तारक मेहता…’ सोडल्याच्या चर्चेवर ‘बबिता’ मुनमुन दत्ताची पहिली प्रतिक्रिया!

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेत ‘बबिता जीं’ची भूमिका साकारणारी मुनमुन दत्ता (Munmun Dutta) सध्या ऑनलाईन माध्यमात बरीच चर्चेत आली आहे.

‘I DID NOT QUIT!!’, ‘तारक मेहता...’ सोडल्याच्या चर्चेवर ‘बबिता’ मुनमुन दत्ताची पहिली प्रतिक्रिया!
मुनमुन दत्ता
| Edited By: | Updated on: Jul 26, 2021 | 12:02 PM
Share

मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेत ‘बबिता जीं’ची भूमिका साकारणारी मुनमुन दत्ता (Munmun Dutta) सध्या ऑनलाईन माध्यमात बरीच चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपासून ती या शोमध्ये दिसली नाही, अशा परिस्थितीत तिने हा शो सोडल्याच्या अफवांनी इंटरनेटवर जोर धरला आहे. यापूर्वी अशी बातमी आली होती की, जातीयवादी टिप्पणीच्या वादात अडकल्यानंतर अभिनेत्री शोच्या सेटवर येत नाही. आता हा शो सोडल्याच्या बातमीवरून अभिनेत्रीने मौन सोडले आहे. याबद्दल तिने आपल्या इंस्टा स्टोरीवर उघडपणे पोस्ट लिहिले आहे.

तिने लिहिले, “गेल्या 2-3 दिवसांत काही गोष्टी चुकीच्या पद्धतीने पसरवल्या गेल्या ज्याचा माझ्या आयुष्यावर नकारात्मक प्रभाव पडला आहे. मी कामावर नव्हते गेले हे पूर्णपणे चुकीचे आहे. खरं म्हणजे सध्या जी कथा लिहिली गेली आहे, त्यात माझी उपस्थिती आवश्यक नव्हती. म्हणूनच मला प्रॉडक्शनच्या बाजूने शूट करण्यासाठी बोलवले गेले नाही. कोणते सीन किंवा कोणती स्टोरीलाईन आहे ते मी ठरवत नाही. प्रॉडक्शन हाऊस ठरवते. जर सीनमध्ये माझी आवश्यकता नसेल, तर नक्कीच तिथे शूटवर जाणार नाही.”

मी स्वतः सांगेन!

तिने पुढे असे लिहिले आहे की, “हा कार्यक्रम सोडल्यास मी स्वत:ही याची घोषणा करेन. कारण माझे चाहते माझ्याशी भावनिकरित्या जोडलेले आहेत. त्यांना सत्य जाणून घेण्याचा पूर्ण हक्क आहे,  अशा अफवांकडे लक्ष देण्याची गरज नाही.”

पाहा मुनमुनची पोस्ट :

Post

यापूर्वी मुनमुन दत्ताने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता ज्यामध्ये त्यांनी दलित समाजाबद्दल काही भाष्य केले होते. तिने जातीवादी एक शब्द वापरला होता, त्यानंतर या प्रकरणाला वेग आला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी तिला जोरदार ट्रोल केले. त्याच्याविरोधात एफआयआरही दाखल करण्यात आला होता.

दुसर्‍याच दिवशी अभिनेत्रीने माफी मागितली होती की, ‘तिचा बोलण्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आहे आणि हे शब्द कोणाच्याही भावनांचा अपमान, धमकावणे, अपमान करणे किंवा दुखापत करण्याच्या उद्देशाने बोलले गेले नाहीत, असे सांगत आपल्याला या शब्दाच्या अर्थाबद्दल चुकीची माहिती देण्यात आली असल्याचेही तिने नमूद केले. असे असूनही, काही दिवसातच दलित कार्यकर्त्यांनी तिच्याविरोधात एफआयआर दाखल केला होता.

(Babita Ji AKA Munmun Dutta’s first reaction on quitting taarak Mehta ka oolath chashmah show)

वाचा :

सिद्धार्थच्या ‘शेरशाह’चा ट्रेलर पाहून विक्रम बत्रांचे आई-वडील म्हणतात, ‘हीच आमच्या मुलाला खरी श्रद्धांजली!’

Birthday Special: राहुल देव आणि मुग्धा गोडसेच्या वयात 14 वर्षाचे अंतर, तरीही प्रेम कहाणी बहरली

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.