Birthday Special: राहुल देव आणि मुग्धा गोडसेच्या वयात 14 वर्षाचे अंतर, तरीही प्रेम कहाणी बहरली

मुग्धा गोडसेनं सांगितलं होतं की राहुलशी तिची पहिली भेट 2013 मध्ये एका मैत्रिणीच्या लग्नात झाली होती. (Birthday Special: Actress Mugdha Godse was in love with Rahul Dev, who is 14 years older. Read the love story)

1/6
आज बॉलिवूड अभिनेत्री मुग्धा गोडसे आपला वाढदिवस साजरा करत आहे. अशा परिस्थितीत या खास दिवशी आम्ही तुम्हाला तिच्या प्रेमकथे विषयी सांगणार आहोत. राहुल देव यांच्या प्रेमात पडलेल्या मुग्धा तिच्या नात्याबद्दल कधीही उघडपणे बोलेली नाही.

2/6
2015 मध्ये जेव्हा राहुल देव आणि मुग्धा त्यांच्या सुट्टीवरुन परत आले तेव्हा मुग्धा यांनीच त्यांचं नाते सार्वजनिक केलं होतं. ती म्हणाली होती की जेव्हा आपण नात्यात मैत्रीच्या पलीकडे जाता तेव्हा एक खास प्रकारची भावना मनात येते.

3/6
मुग्धानं सांगितलं होतं की राहुलशी तिची पहिली भेट 2013 साली एका मैत्रिणीच्या लग्नात झाली होती. त्यानंतर हे दोघंही बराच काळ चांगले मित्र म्हणून होते. त्यानंतर 2015 साली या दोघांनीही आपलं नातं स्वीकारलं.

4/6
पहिल्या भेटीनंतर राहुल देव आणि मुग्धा गोडसे एकमेकांच्या अगदी जवळ आले होते, दोघांनीही जवळजवळ 2 वर्षे डेट केलं. दोघंही नेहमीच एकमेकांच्या प्रेमात दिसायचे. या दोघांमध्ये 14 वर्षांचं अंतर आहे. मात्र वय त्यांच्या प्रेमाच्यामध्ये कधीच आलं नाही.

5/6
मुग्धाबरोबर रिलेशनशिपमध्ये येण्यापूर्वी अभिनेता राहुल देव विवाहित होता, त्याच्या पहिल्या पत्नीचं 2009 मध्ये कर्करोगानं निधन झालं. पहिल्या लग्नापासून राहुललाही एक मुलगा आहे.

6/6
एकदा त्यांच्या नात्याबद्दल बोलताना राहुल म्हणाला होता की मुग्धानं त्याच्या मुलाला स्वीकारलं आहे. हे दोघं प्रत्येक पार्टीत आणि कार्यक्रमात एकत्र दिसतात. दोघांच्या सोशल मीडिया पोस्टवरून तुम्हाला त्यांच्या केमिस्ट्री आणि बॉन्डिंगची कल्पना येईल.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI