Bigg Boss 16 | बिग बाॅसच्या घरातून अखेर ‘अर्चना गाैतम’ची हकालपट्टी, ते प्रकरण भोवले

कारण शिव ठाकरेचा अर्चनाने गळा पकडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला.

Bigg Boss 16 | बिग बाॅसच्या घरातून अखेर अर्चना गाैतमची हकालपट्टी, ते प्रकरण भोवले
| Updated on: Nov 11, 2022 | 9:02 AM

मुंबई : बिग बॉस 16 मध्ये मोठा हंगामा झालाय. भांडणामध्ये अर्चना गाैतम थेट शिव ठाकरेचा गळा पकडताना दिसली. हे वाद इतके टोकाला गेले की, बिग बाॅसने अर्चनाला थेट घरचा रस्ता दाखवला. कारण शिव ठाकरेचा अर्चनाने गळा पकडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला. यामुळे बिग बाॅस आणि अर्चना विरोधात बाहेर संतापाची लाट निर्माण झाली होती. शिव ठाकरेच्या चाहत्यांनी बिग बाॅसवर बहिष्कार टाकण्याची तयारी सुरू केली होती. बिग बाॅसच्या घरात हात उचलणे सर्वात मोठा गुन्हा आहे.

यापूर्वी ही अर्चनाने गोरीला मारहाण केली होती. मात्र, त्यावेळी बिग बाॅसने अर्चनाला पाठीशी घातले होते. यामुळे अर्चनाची हिम्मत वाढल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. बिग बाॅसने अर्चनाला घरचा रस्ता दाखवल्यानंतर घरात राहण्यासाठी अर्चनाने अनेक प्रयत्न केले. तिने रडत रडत सर्वांची माफी मागितली. मात्र, घरातील सदस्यांनी अर्चनाला अजिबात साथ दिली नाही.

हा सर्व वाद टिश्यू पेपर लपवल्यामुळे सुरू झाला होता. अर्चना प्रत्येक वेळी बिग बाॅसने पाठवलेल्या वस्तू लपून ठेवत होती. या सर्वांमध्ये आता सोशल मीडियावर एक चर्चा रंगताना दिसत आहे. अर्चनाने शिवचा गळा पकडल्यानंतर त्याने शांत राहत प्रकरण व्यवस्थित हाताळल्याने बिग बाॅस 16 चा विजेता शिव ठाकरेच होईल, असे आता अनेकांना वाटत आहे. मराठी बिग बाॅसचा विजेता शिव ठाकरे आहे.