Bigg Boss 16 | प्रियंका चाैधरी हिचे बोलणे ऐकून प्रेक्षकांना मोठा धक्का, म्हणाले…

बिग बाॅसच्या घरात जोरदार हंगामा होताना दिसत आहे. गेल्या आठवड्यामध्ये टीना दत्ता ही बेघर झालीये. आता बिग बाॅसच्या घरात फक्त सातच स्पर्धेक शिल्लक आहेत.

Bigg Boss 16 | प्रियंका चाैधरी हिचे बोलणे ऐकून प्रेक्षकांना मोठा धक्का, म्हणाले...
| Updated on: Feb 02, 2023 | 4:30 PM

मुंबई : बिग बाॅस १६ चांगलेच रंगात आले आहे. फिनाले विकसाठी अवघे काही दिवस उरले आहेत. सध्या बिग बाॅसच्या घरात जोरदार हंगामा होताना दिसत आहे. गेल्या आठवड्यामध्ये टीना दत्ता ही बेघर झालीये. आता बिग बाॅसच्या (Bigg Boss 16) घरात फक्त सातच स्पर्धेक शिल्लक आहेत. सुंबुल ताैकिर हिच्या एका चुकीमुळे या आठवड्यात शिव ठाकरे, एमसी स्टॅन यांना नाॅमिनेशनमध्ये जावे लागले. यानंतर सुंबुल ताैकीर हिच्या विरोधात सोशल मीडियावर (Social media) मोठी लाट बघायला मिळत आहे. प्रियंका चाैधरी ही कायमच मंडळीवर निशाणा साधते आणि काहीही कारण नसताना भांडणे करते. काही दिवसांपूर्वीच बिग बाॅसच्या घरात एमसी स्टॅन, अर्चना गाैतम, शिव ठाकरे आणि प्रियंका चाैधरी यांच्यामध्ये जोरदार भांडणे झाली होती. आता निम्रत काैर ही फिनाले विकमध्ये पोहचली असून ती बिग बाॅसच्या घराची कॅप्टन आहे.

नुकताच बिग बाॅसने घरातील सदस्यांना एक टास्क दिला होता. यामध्ये दोन ग्रुप तयार करण्यात आले होते. यावेळी प्रियंका चाैधरी, अर्चना गाैतम आणि शालिन भनोट यांचा एक ग्रुप आहे.

या टास्कमध्ये बिग बॉसने घरातील सदस्यांना त्यांचे ५० लाख रुपये कमावण्याची संधी दिली. या टास्कमध्ये शालिन भनोटच्या ग्रुपला बजरवरील हात सोडायचा नाहीये आणि शिव ठाकरेच्या ग्रुपला त्यांचा बजरवरील हात काढून टाकण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत.

नेहमीच बिग बाॅसच्या घरात शालिन भनोट याला फेक म्हटले जाते. परंतू नुकताच घरात पार पडलेल्या टास्कमध्ये हे दिसून आले आहे की, प्रियंका चाैधरी ही घरातील सर्वात मोठी फेक व्यक्ती आहे.

टास्क झाल्यानंतर प्रियंका चाैधरी ही म्हणते की, शालिन आणि माझा गेम प्लॅन होता. टास्कमध्ये काहीही झाले नाही तरी ओरडायचे आम्ही ठरवले होते. इतकेच नाही तर शिव ठाकरे माझ्या कानात ते झाडाचे पान घालत होता. तेंव्हा मला काहीच होत नव्हते.

मी काहीही होत नसताना मुद्दाम ओरडत होते, असे प्रियंका चाैधरी हिने म्हटले आहे. आता प्रियंका चाैधरीचे हे बोलणे ऐकून अनेकांना मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर युजर्स म्हणत आहेत की…

बिग बाॅसच्या घरात शालिन भनोट हा फेक नसून प्रियंका चाैधरी सर्वात जास्त फेक आहे. प्रियंका आणि अर्चना गाैतम यांचा हाच व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

बिग बाॅसच्या घरात गेल्या आठवड्यात शो होस्ट करण्यासाठी फराह खान आली होती. सलमान खान याच्याप्रमाणेच फराह खान हिने देखील घरातील सदस्यांचा चांगलाच क्लास लावला होता.