
‘बिग बॉस मराठी’च्या घरात मजा, मस्तीसह भांडण, वाद आणि गॉसिप होतचं असतं. घरातील सदस्य नेहमीच एकमेकांबद्दल गॉसिप करताना दिसून येतात. कधी कोण कोणाच्या बाजूने बोलेल आणि कधी कोण कोणाच्या विरोधात बोलेल हे सांगू शकत नाही. कालच्याच एपिसोडमध्ये निक्की तांबोळी आणि कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर यांची भांडणं झाली होती. अशातच अंकिता वालावलकरने तिच्या खेळण्याची स्टॅटर्जी सांगितली आहे. तिचं उत्तर ऐकून नेटकऱ्यांनी मात्र अंकिताचं कौतुक केलं आहे. मी माझी ‘संस्कृती जपत मी ‘बिग बॉस मराठी’मध्ये खेळणार आहे, असं अंकिता वालावलकरने सांगितलं आहे.
काल निक्की तांबोळी आणि कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर यांची जोरदार भांडणं झाली. त्यानंतर अंकिता आणि निक्कीमध्ये बोलणं होतं. तेव्हा हा टास्कमधील स्टॅटर्जीचा भाग होता. त्यामुळे तू मनाला लावून घेऊ नकोस, असं निक्की अंकिताला म्हणते. त्यावर अंकितानेही उत्तर दिलं आहे. आजच्या भागात अंकिता निक्कीसमोर आपली बाजू मांडताना दिसत आहे. मी स्वत:ला खूप कंट्रोल केलं होतं. माणूसकी सोडून जिंकण्यासाठी वेगळं वागू नको हे घरच्यांचे शब्द मला सारखे आठवतात. तू तुझ्या स्टॅर्जीने खेळ आणि मी माझ्या स्टॅटर्जीने खेळते. संस्कृती जपत मी खेळेल, असं अंकिता वालावलकर बोलताना दिसतेय. हा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. नेटकऱ्यांकडून अंकिताच्या या वक्तव्याचं कौतुक होत आहे. याला म्हणतात कोकणचे संस्कार, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.
प्रोमोमध्ये विनोदवीर पॅडी अर्थात पंढरीनाथ कांबळे आर्याबद्दल भाष्य करताना दिसतोय. पॅडी म्हणतोय,”तिने आजपण उडी घेतली आहे आणि मग ती येऊन आपल्याला सांगायला लागली”. त्यावर तू आम्हाला सांगायला नको येऊ आपण ग्रूप बनवू ते… तू जर इकडे येत आहेस ना मग तू विनंती करुन ये, असं अभिजीत सावंत म्हणतो. त्यानंतर पुढे पॅडी त्यांना ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वातील त्याला वाटणारे स्पाय कोण आहेत सांगताना दिसून येत आहे.