‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत नवं वळण; जयश्रीच्या दबावाला काय असेल वसु-आकाशचं उत्तर

Punha Kartvya Ahe Serial New Turn : 'पुन्हा कर्तव्य आहे' ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली आहे. या मालिकेतील पात्र लोकांना आपलीशी वाटत आहेत. वसुंधरा आणि आकाशचं नातंही प्रेक्षकांना आवडतं आहे. आता ही मालिका नव्या वळणावर येऊन ठेपली आहे. वाचा सविस्तर...

पुन्हा कर्तव्य आहे मालिकेत नवं वळण; जयश्रीच्या दबावाला काय असेल वसु-आकाशचं उत्तर
'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेत नवं वळण
Image Credit source: tv9
| Updated on: Jul 27, 2024 | 3:10 PM

‘पुन्हा कर्तव्य आहे’ ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीला उतरत आहे. आकाश आणि वसुंधराचं नातं आता अधिक घट्ट होत आहे. अशात आता ही मालिका नव्या वळणावर येऊन ठेपली आहे. मालिकेत बनीला त्रास देण्यासाठी जयश्रीचे प्रयत्न सुरूच आहेत. पण आता त्याची तीव्रता ती वाढवते आहे. ज्यामुळे तो लवकरात लवकर बोर्डिंग स्कूलमध्ये जाण्याचा निर्णय घेईल. जयश्रीच्या प्रयत्नानंना यश मिळत आणि बनी आपला निर्णय सगळ्यांना सांगतो. इकडे लकीला कळलं आहे की तो ज्या वृद्ध जोडप्याला मदत करत आहे ते त्याचे स्वतःचे आई- वडील आहेत.

सुधीर आणि सुशीलाचा वसुंधराचं लग्न आणि बनीचे अस्तित्व लकीपासून लपवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरूच आहे. निराश बनी वसु-आकाश समोर आपली बोर्डिंग स्कूलमध्ये इच्छा बोलून दाखवतो. आकाश आणि वसुला याबद्दल शंका वाटते पण बनी त्यांना पटवून देतो. बनीचा बोर्डिंग स्कूलमध्ये जाण्याचा दिवस उजाडतो. आकाश, वसु सोबत बनीला सोडायला जाणारच आहे. तितक्यातच जयश्री काहीतरी घोळ घालते. ज्यामुळे आकाशला मागे राहणं भाग पडतं.

वसु-आकाशचं उत्तर काय?

घरात बनीच्या अनुपस्थितीचा सामना करण्यासाठी वसुचा संघर्ष सुरु होतो. पहिल्यांदाच आपल्या मुलापासून वसु इतकी दूर राहत असल्यानी तिचा जीव कासावीस होतो. पण जयश्रीला विजयी झाल्यासारखे वाटते आणि ती वसुला ठाकूर घराण्याचा वारस देण्यासाठी दबाव आणायला सुरुवात करते. आता या सगळ्यावर वसुचं पुढचं पाऊल काय असेल? जयश्रीच्या दाबावाखाली येऊन वसु, आकाशसमोर आपलं दुःख व्यक्त करेल का? जयश्रीच्या हट्टाला वसुंधरा आणि आकाश यांचं उत्तर असेल? बोर्डिंग स्कूलमध्ये बनीचे काय अवस्था होत आहे? हे आता येत्या काळात ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत पाहायला मिळेल.

नवीन प्रोमोत काय?

‘पुन्हा कर्तव्य आहे’ या मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. यात वसुंधरा तिच्या आई- बाबांना फोन करते आहे. त्यावेळी मला वाईट वाटेल म्हणून कोणती गोष्ट लपवू नका, असं वसुंधरा आई- बाबांना सांगते. मात्र तितक्यात मागून तिला शार्दुलचा आवाज येतो आहे. वसुंधरासमोर शार्दुलचं सत्य येणार का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.