Tu Tevha Tashi: ‘तू तेव्हा तशी’ मालिकेतील मजेदार गाणं; महाएपिसोडमध्ये पहायला मिळणार कलाकारांची धमाल

रविवारच्या एक तासाच्या विशेष भागात एका सोहळ्यात खूप मजेदार गाणं प्रेक्षकांना बघायला मिळणार असून यात मालिकेतील सर्व कलाकार नटून थटून या गाण्यावर ठेका धरताना पाहायला मिळणार आहे.

Tu Tevha Tashi: तू तेव्हा तशी मालिकेतील मजेदार गाणं; महाएपिसोडमध्ये पहायला मिळणार कलाकारांची धमाल
Tu Tevha Tashi: 'तू तेव्हा तशी' मालिकेत अनपेक्षित ट्विस्ट
Image Credit source: Tv9
| Edited By: | Updated on: Jul 31, 2022 | 10:03 AM

झी मराठी वाहिनीवरील ‘तू तेव्हा तशी’ (Tu Tevha Tashi) या मालिकेतील अनामिका (Shilpa Tulaskar) आणि सौरभ (Swwapnil Joshi) यांची अव्यक्त प्रेम कथा प्रेक्षकांना फारच भावली आहे. या दोघांचं प्रेम फुलत असताना नील आणि राधा यांचं प्रेमही प्रेक्षकांना भुरळ घालतेय. यातच आता मालिकेत एक नवीन वळण घेणार आहे. अनामिका-सौरभ लग्न कधी करणार याकडे मालिकेच्या चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं असतानाच मालिकेत अचानकपणे आश्चर्यकारक घडामोडी घडताना दिसणार आहेत. रविवारच्या एक तासाच्या विशेष भागात एका सोहळ्यात खूप मजेदार गाणं प्रेक्षकांना बघायला मिळणार असून यात मालिकेतील सर्व कलाकार नटून थटून या गाण्यावर ठेका धरताना पाहायला मिळणार आहे.

या मजेदार गाण्याची शब्द रचना आणि संगीत कुणाल करण यांचं आहे. तर हे गाणं कुणाल करण आणि सागरिका जोशी यांनी गायलं आहे. या गाण्याचं दिग्दर्शक महाबलेश्वर नार्वेकर यांनी केलं आहे. या गाण्याच चित्रीकरण नुकतंच झालं असून हे गाणं येत्या रविवारी एक तासाच्या विशेष भागात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. मात्र मालिकेतला हा सोहळा नेमका कशासाठी हे अजूनही गुलदस्त्यात ठेवलेलं पाहायला मिळत आहे. प्रेक्षक ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण म्हणजे अनामिका आणि सौरभचं लग्न. हा सोहळा त्यांच्या लग्नाचा तर नसेल ना? हे जाणून घेण्यासाठी महाएपिसोडची उत्सुकता अधिक वाढली आहे.

पहा फोटो-

या गाण्यासाठी वल्ली आणि अनामिका देखील एकत्र आल्या आहेत. सोबतच चंदू चिमणा चिमणीचीही जोडी गाण्यात झळकणार आहे. या विशेष भागात अनामिका आणि सौरभ प्रेक्षकांना एक सरप्राईज देणार आहेत. हे सरप्राईज काय असेल याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. तू तेव्हा तशी या मालिकेचा एक तासाचा विशेष भाग रविवारी 31 जुलै रोजी दुपारी 1 आणि रात्री 8 वाजता झी मराठी वाहिनीवर पहायला मिळेल.