AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजू सॅमसनमुळे अभिषेक शर्माच्या फलंदाजीला मिळालं बळ, गंभीर-सूर्याने असे टाकले होते फासे

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील चार सामन्यात शांत असलेली अभिषेक शर्माची बॅट अखेर बोलली. त्याने झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात अर्धशतक ठोकून फॉर्मात आल्याचं दाखवून दिलं. या डावात संजू सॅमसनचं योगदान खूपच महत्त्वाचं राहिलं. कसं काय ते जाणून घ्या

संजू सॅमसनमुळे अभिषेक शर्माच्या फलंदाजीला मिळालं बळ, गंभीर-सूर्याने असे टाकले होते फासे
संजू सॅमसनमुळे अभिषेक शर्माच्या फलंदाजीला मिळालं बळ, गंभीर-सूर्याने असे टाकले होते फासेImage Credit source: PTI
| Updated on: Feb 27, 2026 | 4:38 PM
Share

Abhishek Sharma, T20 World Cup 2026: टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या उपांत्य फेरीचं तिकीट मिळवण्यासाठी टीम इंडियाला करो या मरोची लढाई करावी लागणार आहे. भारताचा सामना वेस्ट इंडिजशी होणार आहे. या सामन्यातील विजयी संघ उपांत्य फेरीचं तिकीट मिळवणार आहे. पण या सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या जीवात जीव आला आहे. कारण अभिषेक शर्माला पुन्हा एकदा सूर गवसला आहे. सलग तीन सामन्यात शून्यावर बाद झाल्यानंतर दक्षिण अफ्रिकेविरुद्ध थोड्याफार धावा केल्या. पण झिम्बाब्वेविरूद्धच्या सामन्यात त्याची बॅट चांगलीच तळपली. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियममध्ये अभिषेक शर्माने 30 चेंडूत 55 धावांची खेळी केली. यात चार चौकार आणि चार षटकार मारले. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत त्याने पहिलं अर्धशतक ठोकलं. त्याचा फॉर्म परतल्याने टीम इंडियाच्या चाहत्यांचा जीव भांड्यात पडला आहे. कारण अभिषेक शर्माचा पत्ता चालला तर सामना एकतर्फी होतो असा अनुभव आहे.

अभिषेक शर्माचा असाच परतला नाही. तर त्यामागे प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांची एक चाल होती. त्यांनी टाकलेले फासे अभिषेक शर्मासाठी फायदेशीर ठरले. सूर्यकुमार यादवने संजू सॅमसनला प्लेइंग 11 मध्ये स्थान दिलं. इतकंच काय तर इशान किशनच्या जागी संधी दिली. त्यामुळे अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन राइटी-लेफ्टी कॉम्बिनेशनसह उतरले. विचारपूर्वक ही जोडी उतरवण्याचा निर्णय घेतला होता. कारण मागच्या काही सामन्यात विरोधी संघ भारताचे दोन टॉप ऑर्डर लेफ्टी बॅट्समन पाहून ऑफ स्पिनरला गोलंदाजी सोपवत होते. त्यामुळे अभिषेक शर्मा अडचणीत येत होता.

संजू सॅमसन राइट हँडेड बॅट्समन आणि फिरकीचा सामना करण्यास सक्षम असल्याने झिम्बाब्वेची गोची झाली. त्यामुळे चेंडू वेगवान गोलंदाजाच्या हाती सोपवण्याशिवाय पर्याय उरला नाही. अभिषेक शर्माला वेगवान गोलंदाजांचा सामना करणं आवडतं. त्याची प्रचिती या सामन्यात आली. त्याने या संधीचा पुरेपूर फायदा उचलला. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी केली. या स्पर्धेतील भारतीय संघाकडून केलेली सर्वोत्तम भागीदारी ठरली. पावर प्लेमध्येच भारताने 80 धावा केल्या होत्या. त्यामुळे झिम्बाब्वेचा संघ पूर्णपणे बॅकफूटवर गेला होता.

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...