Devmanus | डॉ. अजितची होणार नाचक्की, मंजुळाला चढावी लागणार पोलिस स्टेशनची पायरी  

झी मराठीवरील ‘देवमाणूस’ या मालिकेला वेगळे वळण आले आहे. गावात आलेल्या मंजुळाची अजितला भूरळ पडली आहे. पण मंजुळाचा स्पष्टवक्तेपणा आणि स्वावलंबीपणा यामुळे अजितच्या जाळ्यात ती सहजपणे अडकत नाही.

  • Shital munde
  • Published On - 15:56 PM, 8 Dec 2020
Devmanus | डॉ. अजितची होणार नाचक्की, मंजुळाला चढावी लागणार पोलिस स्टेशनची पायरी  

मुंबई : झी मराठीवरील ‘देवमाणूस’ या मालिकेला वेगळे वळण आले आहे. गावात आलेल्या मंजुळाची अजितला भूरळ पडली आहे. पण मंजुळाचा स्पष्टवक्तेपणा आणि स्वावलंबीपणा यामुळे अजितच्या जाळ्यात ती सहजपणे अडकत नाही. मंजुळाने वारंवार अपमान केल्याने पेटून उठलेला अजित सगळ्यांना बोलवून सांगतो की मंजुळाच्या घरी नक्की काहीतरी तिने दडवलेलं आहे. तिथे भेटा, मी दाखवतो.(new twist the Devmanus series)

म्हातारीला कळते ती जनाला म्हणते असं असल तर आपण पण जाऊ आणि त्या डॉक्टरचा समाचार घेऊ, टोण्या आणि गँग तयार होते. मंजु दीदीच्या मदतीला जायचं असे डिंपल क्रीशला सांगते. डॉक्टरला कॉन्फिडन्स आहे की, आता तो मंजुळाच  पितळ उघड पाडेल असं तो सर्वांना सांगतो की, बघा नक्की काहीतरी गडबड आहे. तितक्यात मंजुळाच्या घराचा दरवाजा उघडला  मंजुळा सर्वांना दिसते आणि तिच्यासोबत तिचा व्हिलचेअवर बसलेला नवरा असतो.  सगळे अचंबित होतात. डिंपल अवाक होते, इकडे अजितची नाचक्की होते.

ह्या नाचक्कीमुळे डॉक्टर अजित गावातून गायब होतो. सगळंगाव डॉक्टरला शोधतंय, पण डॉक्टर सापडत नाही. मंजूळा वाड्यात येते, सगळे तिच्यावर संशय घेतात. मंजूळावर त्यावेळी आरोप होतात. मंजूळा सर्वांना समजवायचा प्रयत्न करतेय पण पोलिस मंजूळाला चौकशीसाठी घेऊन जातात.
देवमाणूस ही मालिका त्यातली पात्रे आणि रंजक, रहस्यमयी कथांमुळे लोकांच्या पसंतीस उतरत आहे. प्रत्येक एपिसोडमध्ये मालिकेत वेगवेगळी वळणे येत आहेत. येत्या काळातही मंजुळा आणि डॉ. अजितकुमार देव यांच्यातली चुरस अधिकाधिक रंगत जाणार आहे. तेव्हा पाहायला विसरू नका ‘देवमाणूस’ सोमवार ते शनिवार रात्री 10.30 वाजता फक्त झी मराठीवर

गेल्या वर्षभरात आणि विशेष करुन २०२० मध्ये एक गोष्ट प्रकर्षांने जाणवली ती म्हणजे प्रेक्षकांचा कल हा ओटीटी प्लॅटफॉर्म्सकडे जास्त वाढू लागलाय. घरबसल्या आवडत्या भाषेतील सिनेमे, वेब सिरीज एका क्लिकवर अगदी सहजसपणे पाहायला मिळत आहेत.  त्यामुळे ओटीटी प्लॅटफॉर्म प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय. पण जर ओटीटी हे आपल्या प्रादेशिक (हक्काच्या) भाषेत असतील तर…?  प्रेक्षकांना त्यांच्या हक्काचं माध्यम मिळेल, जिथे त्यांच्या भाषेतील सिनेमे हे त्यांचं दिलखुलासपणे मनोरंजन करतील. हा मुद्दा अधोरेखित करण्यामागचा उद्देश असा आहे की, मराठी प्रेक्षकांना लवकरच त्यांच्या ओटीटीच्या माध्यमातून एक सुंदर, मनोरंजक सरप्राईज मिळणार आहे

संबंधित बातम्या : 

Kareena Kapoor | करीना कपूरच्या पोस्टरवर चाहते म्हणाले…सुन असावी तर अशी!

Winter Lipstick Trends | हिवाळ्यात ट्रेंडमध्ये आहेत ‘हे’ लिपस्टिक शेड्स, हटके लुकसाठी नक्की ट्राय करा

(new twist the Devmanus series)