Kareena Kapoor | करीना कपूरच्या पोस्टरवर चाहते म्हणाले…सून असावी तर अशी!

Kareena Kapoor | करीना कपूरच्या पोस्टरवर चाहते म्हणाले...सून असावी तर अशी!

बॉलिवूडची ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टैगोर यांचा आज 76 वा वाढदिवस आहे. शर्मिला टैगोर यांना वाढदिवशाच्या चाहत्यांनी, मित्रांनी आणि कुटुंबातील सदस्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Dec 08, 2020 | 3:07 PM

मुंबई : बॉलिवूडची ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टैगोर यांचा आज 76 वा वाढदिवस आहे. शर्मिला टैगोर यांना वाढदिवशाच्या चाहत्यांनी, मित्रांनी आणि कुटुंबातील सदस्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये करीना कपूरनेही सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने शर्मिला टैगोर यांचा एक फोटो शेअर केला आहे. (Kareena Kapoor’s Instagram post)

करीना कपूरने शर्मिला टैगोर यांचा अतिशय सुंदर छायाचित्र शेअर केला आणि लिहिले आहे की, मला माहित असलेली एक मस्त आणि भक्कम ही स्त्री आहे. माझ्या सुंदर सासूला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. करिना कपूरची ही पोस्ट चाहत्यांना खूपच आवडली आहे.

सासु आणि सुनेमधील भांडणे आपण रोजच ऐकतो मात्र, करीना आणि शर्मिला टैगोर यांचे हे असे प्रेम अनेकांना आवडले आहे. करीना ही एक आदर्श सून आहे. ती सासूला अजूनही काम करण्यास प्रोत्साहन देते. करीनाने तिच्या एका मुलाखतीत तिच्या आणि शर्मिला टैगोर यांच्या नात्याबद्दल सांगितले होते मला कधीही शर्मिला टैगोर यांचा फोन किंवा मॅसेज आला की, लगेचच उत्तर देते. सोहा अली खानचा पती कुणाल खेमूनेही आपल्या सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शर्मिला टैगोर यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोहा अली खानने आईच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाची फोटो शेअर केली आहेत. फोटो शेअर करताना लिहले आहे की, आम्ही प्रत्येक वाढदिवशी एकत्र साजरा करतो. परंतु यावर्षी आम्ही सोबत नाहीत. लवकरच भेटू आणि वाढदिवस साजरा करू, वाढदिवसाच्या शुभेच्छा अम्मा

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान आणि सैफ अली खानच्या घरी लवकरच नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. सैफने स्वत: याबाबत माहिती दिली होती. करीना दुसऱ्यांदा आई होणार आहे. करीना आणि सैफचा मुलगा तैमुर लवकरच आता दादा होणार आहे. त्यांच्या कुटुंबात लवकरच तैमुरच्या लहान भाऊ किंवा बहिणीचं आगमन होणार आहे.“आम्हाला सांगायला प्रचंड आनंद होतोय की, आमच्या कुटुंबात लवकरच नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा, प्रेम आणि पाठिंब्यासाठी धन्यवाद”, असं सैफ अली खान म्हणाला आहे होता.

करीनाचे वडील आणि सैफचे सासरे रणधीर कपूर यांनीदेखील याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. “घरात दोन मुलं तर असायलाच हवेत, जेणेकरुन एकमेकांना कंपनी मिळेल”, अशी प्रतिक्रिया रणधीर कपूर यांनी दिली आहे. करीना आणि सैफ यांनी 2012 साली लगीनगाठ बांधली होती. त्यानंतर करीना 2016 साली पहिल्यांदा आई बनली. तिचा पहिला मुलगा तैमूर आता जवळपास साडेतीन वर्षांचा झाला आहे. तैमूरनंतर करीना पुन्हा आई होणार का? असा प्रश्न बऱ्याचदा करीनाला अनेक मुलाखतींमध्ये विचारण्यात आला होता.

संबंधित बातम्या : 

Ira Khan | अमिर खानच्या लेकीचा बोल्ड लुक तुम्ही पाहिला का?

Deepika Padukone | दीपिका पादुकोणला ‘तापसी पन्नूचा बिकिनी शूट’ आवडला म्हणाली…

(Kareena Kapoor’s Instagram post)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें