तैमुर दादा होणार!, 'सैफिना'कडून गुड न्यूज

अभिनेत्री करीना कपूर खान आणि सैफ अली खानच्या घरी लवकरच नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे (Saif ali khan and kareena Kapoor Khan gonna have second baby).

तैमुर दादा होणार!, 'सैफिना'कडून गुड न्यूज

मंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानने ‘गुड न्यूज’ दिली आहे. अभिनेत्री करीना कपूर खान आणि सैफ अली खानच्या घरी लवकरच नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. सैफने स्वत: याबाबत माहिती दिली आहे. करीना दुसऱ्यांदा आई होणार आहे. करीना आणि सैफचा मुलगा तैमुर लवकरच आता दादा होणार आहे. त्यांच्या कुटुंबात लवकरच तैमुरच्या लहान भाऊ किंवा बहिणीचं आगमन होणार आहे (Saif ali khan and kareena Kapoor Khan gonna have second baby).

“आम्हाला सांगायला प्रचंड आनंद होतोय की, आमच्या कुटुंबात लवकरच नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा, प्रेम आणि पाठिंब्यासाठी धन्यवाद”, असं सैफ अली खान म्हणाला आहे (Saif ali khan and kareena Kapoor Khan gonna have second baby).

करीनाचे वडील आणि सैफचे सासरे रणधीर कपूर यांनीदेखील याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. “घरात दोन मुलं तर असायलाच हवेत, जेणेकरुन एकमेकांना कंपनी मिळेल”, अशी प्रतिक्रिया रणधीर कपूर यांनी दिली आहे.

करीना आणि सैफ यांनी 2012 साली लगीनगाठ बांधली होती. त्यानंतर करीना 2016 साली पहिल्यांदा आई बनली. तिचा पहिला मुलगा तैमूर आता जवळपास साडेतीन वर्षांचा झाला आहे. तैमूरनंतर करीना पुन्हा आई होणार का? असा प्रश्न बऱ्याचदा करीनाला अनेक मुलाखतींमध्ये विचारण्यात आला होता.

“आम्ही तैमूरसोबत खूप आनंदात आहोत. आम्ही आमचं काम सांभाळून तैमूरला भरपूर वेळ देण्याचा प्रयत्न करत आहोत”, अशा प्रतिक्रिया करीनाकडून देण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता करीना आणि सैफकडून कुटुंबात दुसऱ्या पाहुण्याच्या आगमनाची माहिती देण्यात आली आहे.

सैफ आणि करीनाचा मुलगा तैमूर अली खान सोशल मीडियावर प्रचंड लाईमलाईटवर असतो. तैमूरचा एखादा नवा फोटो सोशल मीडियावर आला तर तो अवघ्या काही क्षणात प्रचंड व्हायरल होतो.

हेही वाचा : परमेश्वर परीक्षा घेतोय, पण आम्ही जिंकू, संजय दत्तची पत्नी मान्यताची भावनिक प्रतिक्रिया

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *