Raju Srivastav | राजू श्रीवास्तव यांची मुंबईतील इस्कॉन मंदिरात ‘या’ दिवशी होणार प्रार्थना सभा…

21 सप्टेंबर 2022 रोजी राजू श्रीवास्तव यांची प्राणज्योत मावळली. राजू 42 दिवस व्हेंटिलेटरवर होते. यादरम्यान त्यांच्या आरोग्याचे अपडेट दररोज चाहत्यांसोबत शेअर केले जायचे.

Raju Srivastav | राजू श्रीवास्तव यांची मुंबईतील इस्कॉन मंदिरात या दिवशी होणार प्रार्थना सभा...
| Updated on: Sep 24, 2022 | 12:09 PM

मुंबई : कॉमेडीचा बादशाह अर्थात राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) पडद्याआड गेले आहेत. राजू यांनी असंख्य अशा आठवणी नक्कीच मागे सोडल्या आहेत. राजू यांच्या अशाप्रकारे जाण्याने सर्वांनाच एक मोठा धक्का बसलांय. राजू यांना अखेरचा निरोप देताना राजू यांच्या पत्नी शिखा श्रीवास्तव (Sikha Srivastava) यांना अश्रू अनावर झाले होते. मुलगी अंतराच्या डोळ्यातील अश्रू थांबण्याचे नाव घेत नव्हते. 10 ऑगस्ट रोजी जिममध्ये व्यायाम करताना राजू यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना दिल्लीतील (Delhi) एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, 42 दिवसांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.

मुंबईतील या इस्कॉन मंदिरात राजू श्रीवास्तव यांची प्रार्थना सभा होणार

21 सप्टेंबर 2022 रोजी राजू श्रीवास्तव यांची प्राणज्योत मावळली. राजू 42 दिवस व्हेंटिलेटरवर होते. यादरम्यान त्यांच्या आरोग्याचे अपडेट दररोज चाहत्यांसोबत शेअर केले जायचे. रिपोर्टनुसार, रविवार 25 सप्टेंबर रोजी जुहू येथील इस्कॉन मंदिरात राजू श्रीवास्तव यांची प्रार्थना सभा होणार आहे. या प्रार्थना सभेत कलाकार आणि चित्रपट निर्माते देखील येणार असल्याची माहिती मिळते आहे.

मुंबईतील प्रार्थना सभेत शिखा श्रीवास्तव होणार सहभागी

जुहू येथील इस्कॉन मंदिरातील सभेला राजू श्रीवास्तव यांच्या पत्नी देखील सहभागी होणार असल्याची महत्वाची माहिती कळते आहे. यासाठी शिखा श्रीवास्तव मुंबईत येणार आहेत. राजू श्रीवास्तव रूग्णालयात दाखल असताना त्यांची मुलगी अंतरा चाहत्यांना राजू यांच्या चांगल्या तब्येतीसाठी प्रार्थना करा, अशी विनंती सातत्याने करत होती. राजू यांच्यावर दिल्लीतील निगम बोध घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.