AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jhalak Dikhhla Jaa 10 | ‘झलक दिखला जा 10’च्या मंचावर रुबिना दिलैकने घेतला करण जोहरचा क्लास…

बिग बाॅसच्या घरामध्ये देखील रूबिनाने अशा काही हिंदी शब्दांचा प्रयोग केला होता, जे यापूर्वी कधी जास्त कोणी ऐकले नव्हते.

Jhalak Dikhhla Jaa 10 | 'झलक दिखला जा 10'च्या मंचावर रुबिना दिलैकने घेतला करण जोहरचा क्लास...
| Updated on: Sep 24, 2022 | 11:30 AM
Share

मुंबई : कलर्स टीव्हीवरील डान्स रिअॅलिटी शो ‘झलक दिखला जा 10’ (Jhalak Dikhhla Jaa 10) चाहत्यांच्या भेटीला आला आहे. ‘झलक दिखला जा’मध्ये कलाकारांचे जबरदस्त असे डान्स सध्या बघायला मिळत आहेत. टीव्ही इंडस्ट्रीमधील (TV industry) फेमस जोड्या या शोमध्ये सहभागी झाल्या आहेत. फैजल शेख, रुबिना दिलैक, शिल्पा शिंदे, पारस कलनावत, नीती टेलर यांसारखे सेलिब्रिटी आपल्या डान्सने (Dance) चाहत्यांचा उत्साह वाढवत आहेत.  नुकताच ‘झलक दिखला जा’चा एक प्रोमो प्रचंड व्हायरल होतो आहे.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

झलक दिखला जा 10 चा नवा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल

‘झलक दिखला जा’च्या व्हायरल होणाऱ्या प्रोमोमध्ये सर्वांची आवडती लाडकी टीव्ही अभिनेत्री अर्थात रुबिना दिलैक दिसते आहे. प्रोमोमध्ये रुबिना दिलैक हिंदीची शिक्षिका झाल्याचे दिसते असून ती सर्वांना हिंदी शिकवते आहे. इतकेच नाही तर रुबिना हिंदी शब्दांचा अर्थ विचारते आहे. रुबिना दिलैक करण जोहर, रोहित शेट्टी आणि माधुरी दीक्षित यांना बोर्डवर हिंदी शब्द लिहून त्यांचा अर्थ विचारत आहे.

रुबिना दिलैकने घेतला करण जोहरसह माधुरी दीक्षितचा क्लास

बिग बाॅसच्या घरामध्ये देखील रुबिनाने अशा काही हिंदी शब्दांचा प्रयोग केला होता, जे यापूर्वी कधी जास्त कोणी ऐकले नव्हते. त्यावेळी सलमान खानने ही रुबिनाचे काैतुक केले होते. हा प्रोमो कलर्स टीव्हीने शेअर केला आणि लिहिले की, रुबिना दिलैक मंचावर जेंव्हा हिंदीची टिचर होते, तेंव्हा वातावरण…हा प्रोमो बघितल्यावर आपल्याला नक्कीच लक्षात येईल की, झलक दिखला जा 10 मध्ये सर्वजण कशाप्रकारे मस्ती करत आहेत.

Follow Us
महाडमध्ये अवकाळी पावसाचा कहर; वादळी वाऱ्यामुळे मालमत्तेचं नुकसान
महाडमध्ये अवकाळी पावसाचा कहर; वादळी वाऱ्यामुळे मालमत्तेचं नुकसान.
खरातला मदत करणाऱ्या डॉक्टरांचं काही खरं नाही, गर्भपातासाठी...
खरातला मदत करणाऱ्या डॉक्टरांचं काही खरं नाही, गर्भपातासाठी....
पुरोगामी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील घुसखोर कोण?
पुरोगामी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील घुसखोर कोण?.
तुम्ही टुकार माणूस आहात... मराठी सक्तीवरून मनसे आणि शिंदे गटात जुंपली
तुम्ही टुकार माणूस आहात... मराठी सक्तीवरून मनसे आणि शिंदे गटात जुंपली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कोलकात्यातील हुगळी नदीत नौकविहार, व्हायरल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कोलकात्यातील हुगळी नदीत नौकविहार, व्हायरल.
मविआकडून उद्धव ठाकरेंना विधानपरिषदेची ऑफर?; संजय राऊत स्पष्टच बोलले
मविआकडून उद्धव ठाकरेंना विधानपरिषदेची ऑफर?; संजय राऊत स्पष्टच बोलले.
नागपूरमध्ये पोलिसांची अचानक धाड, लॅपटॉप, वाय-फाय जप्त, नेमकं काय घडलं?
नागपूरमध्ये पोलिसांची अचानक धाड, लॅपटॉप, वाय-फाय जप्त, नेमकं काय घडलं?.
मराठी सक्तीवर थेट बाळासाहेबांचा दाखला, राऊतांनी शिंदे गटाला घेरलं, म्ह
मराठी सक्तीवर थेट बाळासाहेबांचा दाखला, राऊतांनी शिंदे गटाला घेरलं, म्ह.
धमकी देणाऱ्या भैय्यांना धडा शिकवण्याची हीच वेळ, मनसेचा खरमरीत दम
धमकी देणाऱ्या भैय्यांना धडा शिकवण्याची हीच वेळ, मनसेचा खरमरीत दम.
भाजपच्या मोर्चात राडा करणाऱ्या महिलेविरोधात सदावर्तेची मुलगी मैदानात
भाजपच्या मोर्चात राडा करणाऱ्या महिलेविरोधात सदावर्तेची मुलगी मैदानात.