AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai | भाजपच्या मोर्चात राडा करणाऱ्या महिलेविरोधात सदावर्ते यांची मुलगी मैदानात, थेट पोलिस स्टेशनमध्येच...

Mumbai | भाजपच्या मोर्चात राडा करणाऱ्या महिलेविरोधात सदावर्ते यांची मुलगी मैदानात, थेट पोलिस स्टेशनमध्येच…

| Updated on: Apr 24, 2026 | 10:59 AM
Share

मुंबईत भाजपाने आयोजित केलेल्या जनआक्रोश मोर्चादरम्यान घडलेल्या एका घटनेमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. नारी शक्ती वंदन आणि मतदारसंघ पुनर्रचना दुरुस्ती विधेयके नामंजूर झाल्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चात भाजपाचे वरिष्ठ नेते आणि शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. मात्र, या मोर्चादरम्यान एका महिलेने अचानक रस्त्यावर उतरून संताप व्यक्त केल्याने प्रकरण चर्चेत आलं. संबंधित महिलेने मोर्चेकऱ्यांना रस्ता मोकळा करण्यास सांगत आक्रमक भूमिका घेतली.

मुंबईत भाजपाने आयोजित केलेल्या जनआक्रोश मोर्चादरम्यान घडलेल्या एका घटनेमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. नारी शक्ती वंदन आणि मतदारसंघ पुनर्रचना दुरुस्ती विधेयके नामंजूर झाल्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चात भाजपाचे वरिष्ठ नेते आणि शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. मात्र, या मोर्चादरम्यान एका महिलेने अचानक रस्त्यावर उतरून संताप व्यक्त केल्याने प्रकरण चर्चेत आलं. संबंधित महिलेने मोर्चेकऱ्यांना रस्ता मोकळा करण्यास सांगत आक्रमक भूमिका घेतली. यावेळी तिने मंत्री गिरीश महाजन यांनाही खडे बोल सुनावल्याचं समोर आलं आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.
दरम्यान, आता या प्रकरणाला नवं वळण मिळालं असून संबंधित महिलेविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या कन्या झेन सदावर्ते यांनी वरळी पोलीस ठाण्यात ही तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, संबंधित महिलेने सार्वजनिक ठिकाणी अपमानास्पद आणि आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. “एका महिलेने गाडीतून उतरून अपमानास्पद शब्दांचा वापर केला. हे शब्द केवळ व्यक्तीविरोधात नसून समाजासाठीही अयोग्य आहेत,” असा दावा तक्रारदारांकडून करण्यात आला आहे. तसेच, मी याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी याबाबत एआयआर दाखल करून तत्काळ करावाई करावी अशी मागणी मी केलेली आहे. त्यामुळे आता भाजपाच्या आंदोलनात वाद घालणाऱ्या महिलेसोबत नेमकं काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या घटनेनंतर राजकीय वातावरणात पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला असून, पुढील कारवाईकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

 

Published on: Apr 24, 2026 10:59 AM
Follow Us