AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चित्रपटासाठी बॉडी ट्रान्सफॉर्मेशन करण्याच्या नादात ‘या’ अभिनेत्याला थेट जावे लागले दवाखान्यात, वाचा नेमके काय घडले?

फवादने आमिर खानकडून प्रेरणा घेतली होती. मात्र, यामध्ये त्याला यश मिळाले नाही आणि आवाक्या बाहेर वजन वाढल्याने रूग्णालयात दाखल व्हावे लागले.

चित्रपटासाठी बॉडी ट्रान्सफॉर्मेशन करण्याच्या नादात 'या' अभिनेत्याला थेट जावे लागले दवाखान्यात, वाचा नेमके काय घडले?
| Updated on: Sep 24, 2022 | 8:42 AM
Share

मुंबई : पाकिस्तानी अभिनेता फवाद खान (Fawad Khan) सध्या जोरदार चर्चेत आहे. फवादचा ‘द लीजेंड ऑफ मौला जट्ट’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीली येणार आहे. मात्र, यावेळी फवाद हा चित्रपटामुळे (Movie) चर्चेत नसून त्याच्या एका विधानामुळे चर्चेत आलांय. फवाद खानने नुकताच एक मुलाखत (Interview) दिलीये. या मुलाखतीमध्ये फवादने अत्यंत मोठा खुलासा केलांय. फवादच्या या खुलाशाने अनेकांना मोठा धक्काच बसलांय. फवाद खान आपल्या बिनधास्त वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत राहतो. यावेळीही त्यांने केलेल्या एका विधानानंतर चर्चेत आलाय.

आमिर खानसारखे बॉडी ट्रान्सफॉर्मेशन करण्याच्या नादात हा अभिनेता गेला थेट दवाखान्यात

फवाद खानने द लीजेंड ऑफ मौला जट्ट या चित्रपटासाठी बॉडी ट्रान्सफॉर्मेशन आमिर खानसारखे करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यानंतर पुढे काय झाले हे स्वत: फवाद याने एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे. द लीजेंड ऑफ मौला जट्ट या चित्रपटात फवादला एका फायटरची भूमिका साकारायची असल्याने त्याने आपले 75 किलो वजन चक्क 100 किलोवर नेले. मात्र, त्यानंतर त्याला थेट रूग्णालयात दाखल व्हावे लागले असल्याचे फवादने सांगितले.

बॉडी ट्रान्सफॉर्मेशन केल्यानंतर मधुमेहाची लागण

फवादने आमिर खानकडून प्रेरणा घेतली होती. मात्र, यामध्ये त्याला यश मिळाले नाही आणि आवाक्या बाहेर वजन वाढल्याने रूग्णालयात दाखल व्हावे लागले. फवादने पुढे बोलताना सांगितले की, या वजन वाढवण्याच्या प्रक्रियेमुळे त्याच्या आरोग्यावर खतरनाक परिणाम झाला. यामुळे फवादला मधुमेह देखील झाला. यापेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे फवादला बरे होण्यासाठी तब्बल तीन महिन्यांचा कालावधी लागलाय. फवादने सांगितले की, या वजन वाढवण्याच्या प्रक्रियेत माझ्या शरीरावर खूप घातक परिणाम झाले.

Follow Us
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं...
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं....
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर..
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर...
ठाकरेंच्या उमेदवारीसाठी मविआत हालचालींना वेग; काँग्रेसची सावध भूमिका
ठाकरेंच्या उमेदवारीसाठी मविआत हालचालींना वेग; काँग्रेसची सावध भूमिका.
मराठी ज्ञान अनिवार्यतेकडे सरकारचे निर्णायक पाऊल
मराठी ज्ञान अनिवार्यतेकडे सरकारचे निर्णायक पाऊल.
ममता बॅनर्जींना लोक घरी बसवणार, मोठ्या नेत्याचं भाकीत, पश्चिम बंगाल...
ममता बॅनर्जींना लोक घरी बसवणार, मोठ्या नेत्याचं भाकीत, पश्चिम बंगाल....
महाडमध्ये अवकाळी पावसाचा कहर; वादळी वाऱ्यामुळे मालमत्तेचं नुकसान
महाडमध्ये अवकाळी पावसाचा कहर; वादळी वाऱ्यामुळे मालमत्तेचं नुकसान.
खरातला मदत करणाऱ्या डॉक्टरांचं काही खरं नाही, गर्भपातासाठी...
खरातला मदत करणाऱ्या डॉक्टरांचं काही खरं नाही, गर्भपातासाठी....
पुरोगामी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील घुसखोर कोण?
पुरोगामी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील घुसखोर कोण?.
तुम्ही टुकार माणूस आहात... मराठी सक्तीवरून मनसे आणि शिंदे गटात जुंपली
तुम्ही टुकार माणूस आहात... मराठी सक्तीवरून मनसे आणि शिंदे गटात जुंपली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कोलकात्यातील हुगळी नदीत नौकविहार, व्हायरल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कोलकात्यातील हुगळी नदीत नौकविहार, व्हायरल.