West Bengal Election | ममता बॅनर्जींना लोक घरी बसवणार, मोठ्या नेत्याचं भाकीत, पश्चिम बंगालमध्ये मोठं काहीतरी होणार?
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदारांचा उत्साह मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला. निवडणूक आयोगाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, गुरुवारी झालेल्या मतदानात सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत ८१ टक्क्यांहून अधिक मतदान झाल्याचं समोर आलं आहे.

या टप्प्यात ग्रामीण तसेच शहरी भागात मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या इतिहासात प्रथमच विक्रमी प्रमाणात मतदान झालं. यावर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं वक्तव्य केलं. ते म्हणाले, “ही टक्केवारी स्पष्ट सांगतेय की नागरिकांनी स्वतःहून समोर येऊन इतक्या प्रमाणात मत केलं, याचा अर्थ ममता बॅनर्जी यांचं सरकार आता घरी जाणार… हे एक परिवर्तन आहे, ममता बॅनर्जींच्या विरोधातच हे मतदान झालं असेल आणि लोकं नक्की त्यांना घरी बसवणार आहेत.”
ममता बॅनर्जींना लोक घरी बसवणार, मोठ्या नेत्याचं भाकीत, पश्चिम बंगाल...
महाडमध्ये अवकाळी पावसाचा कहर; वादळी वाऱ्यामुळे मालमत्तेचं नुकसान
खरातला मदत करणाऱ्या डॉक्टरांचं काही खरं नाही, गर्भपातासाठी...
पुरोगामी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील घुसखोर कोण?