West Bengal Election 2026 | Amit Shah | पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं; ममता बॅनर्जींची सत्ता…
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या कामगिरीबाबत मोठा दावा केला. पत्रकारांशी संवाद साधताना शाह यांनी सांगितले की, पहिल्या टप्प्यातील 152 जागांपैकी भाजप सुमारे 110 जागा जिंकत असल्याचा अंदाज पक्षाकडून व्यक्त केला जात आहे. तसेच, राज्यात सध्या सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या सरकारचा पराभव होऊन भाजप सत्तेत येईल, असा दावा त्यांनी केला.

“पहिल्या टप्प्यात परिवर्तनासाठी विक्रमी मतदान झालं आहे. ही मतदानाची टक्केवारी उत्साहवर्धक आहे,” असं शाह यांनी नमूद केलं. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडल्याचं सांगत त्यांनी बंगाल पोलीस आणि निवडणूक आयोगाचे आभार मानले. “दीर्घ कालावधीनंतर निवडणुकीत एकही मृत्यू झालेला नाही, ही सकारात्मक बाब आहे,” असंही त्यांनी सांगितलं. शाह यांनी पुढे म्हटलं की, पहिल्या टप्प्यातील मतदानातून जनतेने विकासाच्या बाजूने कौल दिल्याचं स्पष्ट होत आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी 29 एप्रिल रोजी मतदान होणार असून, त्यानंतर भाजप प्रचंड बहुमताने विजय मिळवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, शाह यांच्या या दाव्यांमुळे बंगालच्या राजकारणात चर्चेला उधाण आलं असून, आगामी टप्प्यांतील मतदानाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Published on: Apr 24, 2026 02:53 PM
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द