NCP News | पुरोगामी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील घुसखोर कोण? पवारांच्या राष्ट्रवादीने जारी केले फोटो; थेट संभाजी भिडेंपासून…
वारकरी संप्रदायात घुसखोरीच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण तापल्याचं चित्र समोर आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने या प्रकरणावर आक्रमक भूमिका घेत बॅनरबाजी करण्यात आली आहे. पक्षाच्या कार्यालयाबाहेर ओबीसी सेलचे अध्यक्ष राज राजापूरकर यांच्या पुढाकारातून हे बॅनर लावण्यात आले.
वारकरी संप्रदायात घुसखोरीच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण तापल्याचं चित्र समोर आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने या प्रकरणावर आक्रमक भूमिका घेत बॅनरबाजी करण्यात आली आहे. पक्षाच्या कार्यालयाबाहेर ओबीसी सेलचे अध्यक्ष राज राजापूरकर यांच्या पुढाकारातून हे बॅनर लावण्यात आले. या बॅनरवर वारकरी संप्रदायात घुसखोरी केल्याचा आरोप करण्यात आलेल्या व्यक्तींचे फोटो लावण्यात आले आहेत. यामध्ये गोविंदगिरी महाराज, संभाजी भिडे, तुषार भोसले आणि अक्षय भोसले यांच्यासह इतर काहींचा समावेश आहे.
बॅनरवर “शिव-फुले-शाहू-आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्राला प्रतिगामी दिशेने नेण्याचा प्रयत्न करणारे घुसखोर” अशा आशयाचे वक्तव्य करण्यात आले आहे. या बॅनरबाजीमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाण आलं असून, या आरोपांवर संबंधितांकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Published on: Apr 24, 2026 12:54 PM
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द

