Sanjay Raut Uncut | मविआकडून उद्धव ठाकरेंना विधानपरिषदेची ऑफर?; संजय राऊत स्पष्टच बोलले
महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, महाविकास आघाडीमध्ये संभाव्य उमेदवारांबाबत चर्चा रंगल्या आहेत. राज्यातील 10 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.
महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, महाविकास आघाडीमध्ये संभाव्य उमेदवारांबाबत चर्चा रंगल्या आहेत. राज्यातील 10 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीनंतर आता राज्याचं लक्ष विधानपरिषद निवडणुकीकडे वळलं आहे. संख्याबळाच्या समीकरणानुसार भाजपला 6, शिवसेनेला 2, राष्ट्रवादीला 1 आणि महाविकास आघाडीला 1 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेत जावं, असा आग्रह वाढत असल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नुकतीच ठाकरे यांची भेट घेतली असून, त्यांच्या विधानपरिषद प्रवेशाला पाठिंबा दर्शवला आहे.
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. “उद्धव ठाकरे यांनी अद्याप उमेदवारी जाहीर केलेली नाही, त्यामुळे पाठिंब्याचा प्रश्नच येत नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यांनी पुढे सांगितलं की, काँग्रेससोबत झालेल्या बैठकीत फक्त विधानपरिषद नव्हे तर आगामी निवडणुका, संघटनात्मक काम आणि आघाडीची पुढील रणनीती यावरही चर्चा झाली. तसेच राष्ट्रवादीकडूनही ठाकरे यांच्या नावाला पाठिंबा असल्याचं संकेत मिळत असून, शशिकांत शिंदे यांनीही यासंदर्भात संपर्क साधल्याचं राऊत यांनी सांगितलं. या घडामोडींमुळे उद्धव ठाकरे विधानपरिषदेत जाणार का, याकडे आता राज्याच्या राजकारणाचं लक्ष लागलं आहे.
Published on: Apr 24, 2026 11:48 AM
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार

