
मुंबई : राखी सावंत ही कायमच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी राखी सावंत (Rakhi Sawant) हिला धमकीचा ईमेल पाठवण्यात आलाय. सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर राखी सावंत हिने लॉरेंस बिश्नोई (Lawrence Bishnoi) याला सलमान खानला माफ करा म्हणून विनंती केली होती. यावेळी राखी सावंत चक्क बिश्नोई समाजाची माफी मागताना देखील दिसली. यानंतर राखी सावंत हिला ईमेल करण्यात आला. राखी सावंत तुझ्यासोबत आमचा काही वाद नाहीये, तू सलमान खान (Salman Khan) याच्या प्रकरणात पडू नकोस नाही तर याचे परिणाम गंभीर होतील, असा ईमेल राखी सावंत हिला पाठवण्यात आला. ज्यानंतर अनेक चर्चांना उधाण आले.
आता सध्या सोशल मीडियावर राखी सावंत हिचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. राखी सावंत हिचा हा व्हिडीओ पाहून अनेकांना मोठा धक्का बसलाय. राखी सावंत चक्क शर्ट न घालता गाडीमधून उतरताना दिसली. राखी सावंत हिला पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला. ज्यावेळी राखी सावंत हिच्या लक्षात आले की, आपण शर्ट न घालता बाहेर आलो तेंव्हा ती लगेचच गाडीमध्ये गेली.
राखी सावंत ज्यावेळी शर्ट न घातला गाडी बाहेर आली, तेंव्हा तिथे पापाराझी होते. यानंतर राखी सावंत हिला चूक लक्षात आली आणि तिने शर्ट घातले. आता राखी सावंत हिचा हा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. राखी सावंत ही फक्त ब्रावर होती. त्यानंतर तिने शर्ट घातले. आता या व्हिडीओनंतर अनेकांना राखी सावंत हिला टार्गेट करण्यास सुरूवात केलीये.
राखी सावंत काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. बिग बाॅस मराठीमधून बाहेर पडल्यानंतर राखी सावंत हिने लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत आपण आदिल दुर्रानी याच्यासोबत लग्न केल्याचे जाहिर केले. राखी सावंत हिने तिच्या लग्नाची गोष्ट तब्बल सात महिने सर्वांपासून लपवून ठेवली होती. विशेष म्हणजे आदिल दुर्रानी याच्यासोबत लग्न केल्यानंतर राखी सावंत हिने इस्लाम धर्म स्वीकारला आहे.
राखी सावंत हिने कोर्टात लग्न करून आदिल दुर्रानी याच्यासोबत निकाह केला. लग्नानंतर राखी सावंत हिने तिचे नाव फातिमा असल्याचे जाहिर केले. काही दिवसांपूर्वीच राखी सावंत हिने आदिल दुर्रानी याच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. हे प्रकरण थेट कोर्टामध्ये पोहचले आहे. आदिल दुर्रानी हा सध्या जेलमध्ये आहे.