‘तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांचा जीव वाचवता, सलाम!’, सिद्धार्थ शुक्लाची शेवटची पोस्ट फ्रंटलाईन योद्ध्यांसाठी!

| Updated on: Sep 02, 2021 | 1:28 PM

द्धार्थची शेवटची सोशल मीडिया पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये त्याने आपल्या आगामी प्रोजेक्टचे प्रमोश करताना कोव्हिड योद्ध्यांचे आभार मानले आहेत. सिद्धार्थची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आली आहे. अभिनेत्याच्या आठवणीनी चाहते गहिवरले आहेत.

‘तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांचा जीव वाचवता, सलाम!’, सिद्धार्थ शुक्लाची शेवटची पोस्ट फ्रंटलाईन योद्ध्यांसाठी!
सिद्धार्थ शुक्ला
Follow us on

मुंबई : दूरदर्शन आणि चित्रपट विश्वातील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) याचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मृत्यू समयी तो 40 वर्षांचे होता. त्याने मुंबईतील कपूर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. सिद्धार्थ शुक्ला टीव्ही शो “बालिका वधू”मधील ‘शिव’ भूमिकेमुळे प्रसिद्ध झाला. कूपर हॉस्पिटलच्या एका अधिकाऱ्याने त्याच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. सिद्धार्थ शुक्लाला सकाळी हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले जात आहे. सिद्धार्थ शुक्लाचा शवविच्छेदन अहवाल प्रतीक्षेत असून, त्याच्यासोबत राहणाऱ्या लोकांचे स्टेटमेंट घेण्यात येणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

सध्या मुंबई पोलिसांची टीम कपूर हॉस्पिटलमध्ये पोहोचली आहे. दिवंगत सिद्धार्थची बहीण आणि मेहुणाही रुग्णालयात पोहोचले आहेत. सिद्धार्थ शुक्लाचे शवविच्छेदन दुपारी साडे बारा वाजता केले जाईल, असे म्हटले जात आहे. या सगळ्या दरम्यान सिद्धार्थची शेवटची सोशल मीडिया पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये त्याने आपल्या आगामी प्रोजेक्टचे प्रमोश करताना कोव्हिड योद्ध्यांचे आभार मानले आहेत.

पाहा सिद्धार्थची शेवटची पोस्ट

सिद्धार्थची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आली आहे. अभिनेत्याच्या आठवणीनी चाहते गहिवरले आहेत.

काय म्हणतोय सिद्धार्थ ‘या’ पोस्टमध्ये?

साधारण एक आठवड्यापूर्वी सिद्धार्थने त्याच्या इंस्टाग्राम या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये त्याने आपल्या आगामी प्रोजेक्टचे प्रमोश करताना कोव्हिड योद्ध्यांचे आभार मानले होते. या पोस्टमध्ये तो म्हणाला, ‘सर्व फ्रंटलाईन योद्ध्यांना, मनापासून धन्यवाद! तुम्ही तुमचा जीव धोक्यात घालता, अगणित तास काम करता आणि जे रुग्ण त्यांच्या कुटुंबियांसोबत राहू शकत नाहीत त्यांची काळजी घेता. आपण खरोखर सर्वात धाडसी आहात! एखाद्या लढ्याच्या अग्रभागी असणे इतके सोपे नाही, परंतु आम्ही तुमच्या प्रयत्नांचे खरोखर कौतुक करतो. #MumbaiDairiesOnPrime  ही या पांढऱ्या टोपीतील सुपरहिरोला, नर्सिंग स्टाफ आणि त्यांच्या असंख्य बलिदानासाठी एक मानवंदना आहे. 25 ऑगस्टला याचा ट्रेलर प्रदर्शित होईल.’

सिद्धार्थची कारकीर्द

अभिनेता, होस्ट आणि मॉडेल आहे जो हिंदी टेलिव्हिजन आणि चित्रपटांमध्ये प्रामुख्यानं काम करत होता. तो ‘ब्रोकन बट ब्यूटीफुल 3’, ‘बालिका वधू’ आणि ‘दिल से दिल तक’मधील भूमिकांसाठी ओळखला जातो. तो बिग बॉस 13 आणि फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी 7 च्या रिअॅलिटी शोचा विजेता आहे. त्यानं सावधान इंडिया  आणि इंडियाज गॉट टॅलेंट हे शो होस्ट केले आहेत. त्याने डिसेंबर 2005 मध्ये आशिया, लॅटिन अमेरिका आणि युरोपमधील इतर 40 स्पर्धकांना हरवून जगातील सर्वोत्कृष्ट मॉडेलचं विजेतेपद पटकावले. 2008 च्या ‘बाबुल का आंगन छुटे ना’ या शोमधील मुख्य भूमिकेतून त्यानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. 2014 मध्ये, शुक्लानं ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’मध्ये सहाय्यक भूमिकेतून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

हेही वाचा :

Siddharth Shukla Passes away : अभिनेता सिद्धार्थ शुक्लानं झोपण्यापूर्वी काही औषधे घेतली आणि सकाळी तो उठूच शकला नाही!

Sidharth Shukla dies : अभिनयात रस नव्हता, मॉडेलिंगही करायचे नव्हते, मग सिद्धार्थ शुक्ला मनोरंजन विश्वात आला कसा?