एक दिवस आधीच ढासळली होती राज कौशल यांची तब्येत, पत्नी मंदिराला म्हणाले ‘मला हार्टअटॅक येतोय’

| Updated on: Jul 02, 2021 | 11:25 AM

प्रसिद्ध अभिनेत्री मंदिरा बेदी (Mandira Bedi) हिचे पती राज कौशल (Raj Kaushal) यांचे बुधवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. राज गेल्यानंतर केवळ त्यांचे कुटुंबच नाही, तर अवघ्या मनोरंजन विश्वालाही धक्का बसला आहे.

एक दिवस आधीच ढासळली होती राज कौशल यांची तब्येत, पत्नी मंदिराला म्हणाले ‘मला हार्टअटॅक येतोय’
राज कौशल
Follow us on

मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री मंदिरा बेदी (Mandira Bedi) हिचे पती राज कौशल (Raj Kaushal) यांचे बुधवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. राज गेल्यानंतर केवळ त्यांचे कुटुंबच नाही, तर अवघ्या मनोरंजन विश्वालाही धक्का बसला आहे. आता राजच्या निधनानंतर त्यांचा मित्र आणि संगीत दिग्दर्शक सुलेमान मर्चंट यांनी राज यांना एक दिवस आधीच बरे वाटत नसल्याचे म्हटले आहे. इतकेच नाही तर, राज यांनी आपल्याला हृदयविकाराचा झटका आला आहे, असे मंदिराला सांगितले होते. पण मंदिरा त्यांना दवाखान्यात घेऊन जाईपर्यंत खूप उशीर झाला होता (Sulaiman Merchant reveals that Mandira Bedi Husband Raj Kaushal feeling seek from Tuesday).

ई-टाईम्सशी बोलताना सुलेमान म्हणाले, ‘मंगळवारी संध्याकाळपासून राज यांची तब्येत बरी नव्हती, त्यानंतर त्याने अँटासिड टॅलबेट घेतल्या. दुसऱ्या दिवशी पहाटे 4च्या सुमारास राजने मंदिराला सांगितले की, त्याला हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यानंतर मंदिराने त्यांचा मित्र आशीष चौधरीला बोलावून राज यांना दवाखान्यात नेण्याकी तयारी केली. पण इतक्यात राज बेशुद्ध झाले होते. त्यांनी राजला दवाखान्यात नेले, पण 5-10 मिनिटांनंतर त्यांना समजले की राज यांचा श्वास थांबला आहे. डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी खूप उशीर झाला होता.’

सुलेमान यांनी असेही सांगितले की, याआधीही राजला हृदयविकाराचा झटका आला होता, तेव्हा त्याचे वय अवघे 30-32 होते. पण त्या हल्ल्यानंतर राजने स्वत:ची काळजी घ्यायला सुरुवात केली. त्याची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली झाली होती.

25 वर्षांची मैत्री

राज यांच्याशी असलेल्या मैत्रीबद्दल सुलेमान म्हणाले, ‘मी माझा 25 वर्षांपासूनचा मित्र गमावला आहे. तो मुकुल आनंदला मदत करत असल्यापासून मी त्याला ओळखतो. मी कोरोनामुळे कित्येक महिन्यांपूर्वी एकदा त्याच्या घरी गेलो होतो. सलीम आणि मी त्याच्या ‘प्यार में कभी कभी’ या पहिल्या चित्रपटासाठी संगीत दिले आहे. मी त्याच्या संपर्कात होतो. जेव्हा आम्ही आपला भूमी 2020 हा अल्बम सुरू करत होतो, तेव्हा त्याने शूटिंगसाठी भाड्याने दिल्या जाणाऱ्या त्याच्या आलिशान बंगल्यात राहण्याची ऑफर दिली, पण आम्हाला तिथे शूट करता आले नाही.’

राजची कारकीर्द

राज कौशल यांनी 1989 साली लेखक म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली होती आणि त्यानंतर त्यांनी मुकुल आनंदचा सहाय्यक म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी स्वतःची जाहिरात उत्पादन कंपनी सुरु केली आणि त्यानंतर 800 जाहिरातींचे दिग्दर्शन केले. त्यांचा शेवटचा प्रोजेक्ट विक्की कौशल याच्याबरोबर होता. याशिवाय राजने ‘प्यार में कभी कभी’ आणि ‘शादी का लड्डू’ यासारखे चित्रपटही दिग्दर्शित केले होते.

(Sulaiman Merchant reveals that Mandira Bedi Husband Raj Kaushal feeling seek from Tuesday)

हेही वाचा :

Happy Birthday Pavan Malhotra | दूरदर्शनच्या ‘नुक्कड’ने मिळवून दिली प्रसिद्धी, करीना कपूरच्या काकाच्या भूमिकेतही गाजले पवन मल्होत्रा!

Love Story | वेगवेगळा स्वभाव तरीही एकमेकांच्या प्रेमात पडले मंदिरा बेदी-राज कौशल, घरच्यांची संमती मिळताच केले लग्न!