
मुंबई : टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्मा हिने आत्महत्या केल्यानंतर अभिनेता शीजान खान (Sheezan Khan) याच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाली. शीजान खान याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर पंधरा दिवसांनी तुनिशा शर्मा हिने आत्महत्या केली. तुनिशा शर्मा (Tunisha Sharma) हिच्या आत्महत्येनंतर तिच्या आईने शीजान खान याच्यावर काही गंभीर आरोप केले. इतकेच नाहीतर तुनिशा शर्मा हिची आई म्हणाली की, माझ्या मुलीच्या आत्महत्येला शीजान खान हाच कारणीभूत आहे. कारण शीजान खान याच्यासोबत ब्रेकअप झाल्यापासून तुनिशा तणावात होती. मला तुनिशाने सांगितले होते, शीजान खान हा आपल्याला धोका देत असल्याचे. तुनिशा शर्मा हिच्या प्रकरणात शीजान खान हा जवळपास तीन महिने जेलमध्ये होता.
कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाल्यानंतर शीजान खान हा 4 मार्च रोजी जेलमधूनबाहेर पडलाय. शीजान खान याला घेण्यासाठी त्याची आई, बहिणी पोहचल्या होत्या. शीजान खान याला बघितल्यानंतर सर्वचजण भावूक झाल्याचे बघायला मिळाले. शीजान खान याला गळ्याला लावत त्याची आई ढसाढसा रडताना दिसली.
तुनिशा शर्मा हिच्या आत्महत्येनंतर शीजान खान याच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले. शीजान खान याच्या फोनवरून कळाले की, शीजान खान हा फक्त तुनिशा शर्मा हिच्याच संपर्कात नव्हता तर तो अनेक मुलींच्या संपर्कात होता. शीजान खान आपल्या मुलीला धोका देत असल्याचेही अनेकदा तुनिशा शर्माची आई म्हणाली होती.
शीजान खान याच्याही कुटुबियांनी तुनिशा शर्मा हिच्या आईवर काही आरोप केले होते. तुनिशा शर्मा हिच्या वाढदिवसाच्या दिवशी शीजान खान याची बहीण फलक नाज हिने एक भावनिक पोस्ट शेअर केली होती. तुनिशा शर्माने मालिकेच्या सेटवर शीजान खान याच्याच मेकअप रूममध्ये गळफास घेतला होता. तुनिशा शर्मा हिच्या आत्महत्येनंतर अली बाबा: दास्तान-ए-काबुल मालिकेच्या सेटवर भीतीचे वातावरण बघायला मिळाले.
अली बाबा: दास्तान-ए-काबुल मालिकेमध्ये शीजान खान आणि तुनिशा शर्मा हे मुख्य भूमिकेत होते. तुनिशा शर्मा हिच्या आत्महत्येनंतर अली बाबा: दास्तान-ए-काबुल मालिकेची शूटिंग काही दिवस बंद करण्यात आली. मात्र, निर्मात्यांनी पुन्हा काही दिवसांनी शूटिंगला सुरूवात केलीये. मालिकेच्या निर्मात्यांनी सेट इतर ठिकाणी स्थलांतरीत केला आहे. आता शीजान खान हा परत कधीच मालिकेमध्ये दिसणार नाहीये. शीजान खानऐवजी दुसरा अभिनेता मुख्य भूमिकेत दिसणार आहे.