The Kapil Sharma Show : कपिल शर्मानं गोविंदाला विचारले अनोखे प्रश्न, अशी होती चिची भैय्याची रिअ‍ॅक्शन

कपिल शर्मानं गोविंदाला काही प्रश्न विचारले मात्र गोविंदाला यापैकी काही प्रश्नाची उत्तरं माहितच नव्हते. कपिल शर्मानं विचारलेले सर्व प्रश्न पत्नी सुनीताबद्दल होते. (The Kapil Sharma Show: Kapil Sharma asks Govinda a unique question, see Chichi Bhaiya's reaction)

The Kapil Sharma Show : कपिल शर्मानं गोविंदाला विचारले अनोखे प्रश्न, अशी होती चिची भैय्याची रिअ‍ॅक्शन
| Edited By: | Updated on: Sep 10, 2021 | 7:29 PM

मुंबई : सुपरस्टार गोविंदा (Superstar Govinda) नुकताच पत्नी सुनीतासोबत ‘द कपिल शर्मा शो’च्या सेटवर पोहोचला आहे. छोट्या पडद्यावरील या सर्वात लोकप्रिय कॉमेडी शोमध्ये कपिल आणि गोविंदा यांच्यात बरीच चर्चा झाली होती, मातर जेव्हा प्रश्न-उत्तर फेरीचा विषय आला तेव्हा चिची भाई अडकले. कपिल शर्मानं गोविंदाला काही प्रश्न विचारले आणि त्याला यापैकी काही प्रश्नाची उत्तरं क्वचितच माहित होते.

काय होते कपिलचे प्रश्न?

कपिल शर्मानं विचारलेले सर्व प्रश्न पत्नी सुनीताबद्दल होते. कपिल शर्मानं प्रथम गोविंदाला त्याच्या पत्नीच्या कानाच्या रिंगचा रंग विचारला. या प्रश्नाचं उत्तर देण्यास गोविंदा असमर्थ, कपिल शर्मानं गोविंदाला सुनीताच्या नेल पेंटचा रंग विचारला. यानंतर गोविंदा म्हणाला की तुम्ही प्रश्न विचारत आहात की माला फसवत आहात? सुनीताला स्वत: वर नियंत्रण ठेवता आलं नाही आणि ती मध्येच बोलली.

काय म्हणाली गोविंदाची पत्नी?

गोविंदा उत्तर देऊ न शकल्यानं सुनीता म्हणाली, ‘कपिल (Kapil Sharma) तू कोणाला विचारतोय यार, तु मला विचारा, मी तुम्हाला सांगेन की अंडरवेअरचा रंग कोणता आहे? ‘ सुनीताच्या उत्तरावर कपिल शर्मा, गोविंदा आणि संपूर्ण प्रेक्षक हसले. गोविंदा जेव्हा या शोचा भाग बनला तेव्हा कॉमेडियन कृष्णा अभिषेकनं हा शो शूट केला नाही.

पाहा व्हिडीओ

यापूर्वीही कृष्णा गैरहजर

हे सगळ्यांना माहिती आहे की काही काळापूर्वी कृष्णा अभिषेक आणि गोविंदा यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता. हेच कारण होतं की जेव्हा गोविंदाचा एपिसोड शूट करण्यात आला, तेव्हा कृष्णा अभिषेकनं शोचं शूटिंग केलं नाही. यापूर्वी, जेव्हा गोविंदा नोव्हेंबर 2020 मध्ये कपिलच्या शोमध्ये पोहोचला होता, तेव्हाही कृष्णा त्या भागात दिसला नव्हता. नुकतंच, गोविंदाच्या पत्नीनं या नात्यावर स्पष्टपणे सांगितले की मला त्याचा चेहरा बघायचा नाही.

संबंधित बातम्या

रितेश आणि जिनिलियाचा नवा ‘प्लांट बेस्ड मीट’ बिझनेस, शाहरुख खानने अनोख्या स्टाईलने केले प्रमोशन!

नव्या गाण्याची आणि पारंपरिक आरत्यांची एक अनोखी सांगड, धनश्री गणात्रा आणि आदित्य महाजन घेऊन आले आहेत ‘गणरायाला साकडं’

Marathi Movie : रितिका श्रोत्री आणि विनायक माळीचा मॅडनेस, बघायला मिळणार धमाल मनोरंजनाचा ‘मॅड’ तडका