बिग बॉसच्या घरात अरेरावी, निर्मात्यांनी टाकला एक डाव आणि स्पर्धेक एकमेकांच्या थेट अंगावर, मोठा वाद

बिग बॉस 19 ला धमाकेदार पद्धतीने सुरूवात झाली आहे. विशेष म्हणजे पहिल्यांच दिवशी घरात मोठे वादळ आल्याचे बघायला मिळाले. सलमान खान हा बिग बॉस 19 ला होस्ट करताना दिसतोय. हे सीजन अत्यंत खास ठरणार आहे.

बिग बॉसच्या घरात अरेरावी, निर्मात्यांनी टाकला एक डाव आणि स्पर्धेक एकमेकांच्या थेट अंगावर, मोठा वाद
Bigg Boss
| Updated on: Aug 26, 2025 | 8:57 AM

बिग बॉस 19 ला धमाक्यात सुरूवात झाली असून 16 सदस्य हे बिग बॉसच्या घरात दाखल झाले. बिग बॉस 19 च्या ग्रॅंन्ड प्रिमियरमध्ये सलमान खानने घरात दाखल होणाऱ्या सदस्यांची ओळख करून दिली. बिग बॉसचे हे सीजन धमाकेदार करण्यासाठी निर्मात्यांनी कंबर कसली आहे. प्रेक्षकांना मनोरंजनाच्या जोरदार तडका बघायला मिळणार हे स्पष्ट आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच दिवशी बिग बॉसच्या निर्मात्यांनी असा डाव टाकला की, घरात जोरदार वाद झाला आणि भांडणे झाली. दरवर्षी बिग बॉसच्या घरात पहिल्यांच दिवशी कधीच वाद होताना दिसला नाहीत. या सीजनमध्ये हे बघायला मिळाले.

बिग बॉसने घरातील सदस्यांना विचारले की, तुम्हाला काय वाटते घरात दाखल झालेल्या स्पर्धेकांपैकी कोणता एक असा स्पर्धेक आहे जो घरात राहण्याच्या योग्य नाही? सर्वांनी चर्चा करून त्या व्यक्तीचे नाव सांगा….यावेळी सर्वजण चर्चा करत असताना वाद निर्माण झाला आणि पहिल्याच दिवशी स्पर्धेक हे एकमेकांच्या अंगावर जाताना दिसले. यासोबतच किचनमध्येही वाद झाला. विशेष म्हणजे एका स्पर्धेकाला बिग बॉसच्या घरातून बाहेरचा रस्ता देखील दाखवण्यात आला.

यावेळी कुनिका सदानंद यांचा पारा चांगलाच चढला. बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले की, घरातील सदस्यांमध्ये इतका वाद पहिल्या दिवशी झाला. बिग बॉसकडून हे सीजन खास आणि टीआरपीमध्ये टॉपला ठेवण्यासाठी प्रयत्न केली जात आहेत. मागच्या सीजनला म्हणावा तसा धमाका करण्यात अजिबातच यश मिळाले नाही. अनुपमा मालिकेतील अभिनेता गाैरव खन्ना हा बिग बॉसच्या घरात दाखल झालाय.

विशेष म्हणजे गाैरव खन्नाची जोरदार अशी फॅन फॉलोइंग सोशल मीडियावर बघायला मिळतंय. हेच नाही तर गाैरव खन्ना हाच विजेता होणार असल्याचा दावा त्याच्या चाहत्यांकडून केला जात आहे. यावेळी मोठे बदल बिग बॉसच्या निर्मात्यांनी केली आहेत. घरातील निर्णय घरातील सदस्यांनाच घ्यावे लागणार आहेत. बिग बॉसचा हस्तक्षेप कमी असणार आहे. चाहत्यांमध्येही या सीजनबद्दल मोठी क्रेझ बघायला मिळत आहे.