बिग बाॅसच्या घरात चिकनसाठी भांडणारा शालिन भनोट आहे कोट्यावधी संपत्तीचा मालक

सलमान खान याने बिग बाॅस 16 मध्ये सर्वात जास्त जर क्लास कोणाचा घेतला असेल तर तो शालिन भनोटच आहे.

बिग बाॅसच्या घरात चिकनसाठी भांडणारा शालिन भनोट आहे कोट्यावधी संपत्तीचा मालक
| Updated on: Jan 06, 2023 | 7:33 PM

मुंबई : बिग बाॅस 16 मधील एक महत्वपूर्ण नाव आणि सतत चिकनसाठी घरात हंगामा करणारा शालिन भनोट हा कोट्यावधी रूपयांचा मालक आहे. बिग बाॅस 16 मध्ये शालिन भनोट हा सतत चिकनसाठी भांडणे आणि वाद करतो. चिकनसाठी शालिन भनोट अनेकदा बिग बाॅससोबत देखील वाद घालतो. बिग बाॅसच्या घरात टीना दत्ता आणि शालिन भनोट यांचा लव्ह अॅंगल देखील सुरू आहे. घरामध्ये काहीही कारण नसताना अनेकदा भांडताना शालिन भनोट दिसतो. सलमान खान याने बिग बाॅस 16 मध्ये सर्वात जास्त जर क्लास कोणाचा घेतला असेल तर तो शालिन भनोटच आहे.

बिग बाॅसच्या घरात जरी शालिन चिकन चिकन करत असला तरीही अभिनयाशिवाय शालिन भनोट एक व्यवयासिक देखील आहे. विशेष म्हणजे शालिनच्या तब्बल दोन कंपन्या असून तो त्याचा डायरेक्टर आहे.

प्राइम लँड प्रायव्हेट लिमिटेडचा शालिन भनोट हा डायरेक्टर आहे आणि त्याचा अजून एक व्यवसाय देखील आहे. मालिकांमध्ये महत्वपूर्ण भूमिका करूनही शालिन भनोट हा कोट्यावधी रूपयांची कमाई करतो.

बिग बाॅस 16 मध्ये शालिन भनोट चांगला गेम खेळतोय. नुकताच बिग बाॅसच्या घरात नाॅमिनेशन टास्क पार पडला. यामध्ये शालिनचा वाद अर्चना गाैतम हिच्यासोबत झाला.

शालिन आणि टीना दत्ता यांचे रिलेशन फेक असल्याचे घरातील सर्वच सदस्यांना वाटत आहे. विकेंडच्या वारमध्ये सलमान खान हा टीना दत्ता हिचा क्लास घेताना दिसणार आहे.

सुरूवातीला शालिन भनोट याच्यासोबत सुंबुल ताैकीरचे नाव जोडले जात होते. मात्र, शालिन याने सुंबुल माझ्या बहिणीसारखी असल्याचे सांगितले होते. शालिन किचनसाठी अनेकदा बिग बाॅससोबतही पंगा घेतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us