AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मन्नत 300 कोटी, कृष्णा राज 250 कोटी.. बॉलिवूडच्या सर्वांत महागड्या घरांची किंमत

अमिताभ बच्चन, शाहरुख खान, रणबीर कपूर यांसारख्या कलाकारांच्या बंगल्यांची खूप चर्चा होते. या सेलिब्रिटींचे चाहते त्यांच्या घराची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक असतात.

मन्नत 300 कोटी, कृष्णा राज 250 कोटी.. बॉलिवूडच्या सर्वांत महागड्या घरांची किंमत
बॉलिवूड सेलिब्रिटींची महागडी घरंImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 17, 2026 | 2:40 PM
Share

बॉलिवूडमधील कलाकारांची लोकप्रियता, त्यांची लाइफस्टाइल आणि आलिशान घरं नेहमीच चाहत्यांच्या आकर्षणाचा विषय असतात. आपल्या आवडत्या कलाकारांची एक झलक पाहण्यासाठी चाहते त्यांच्या घराबाहेर गर्दी करताना दिसतात. अशातच बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खानच्या मुंबईतील ‘मन्नत’ या बंगल्याच्या किमतीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे, एकेकाळी 18 कोटी रुपयांना खरेदी केलेल्या या बंगल्याची किंमत आता तब्बल 300 कोटी रुपये असल्याचा दावा करण्यात आला आहे. तर दुसरीकडे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या आलिशान ‘कृष्णा राज’ बंगल्याची किंमतही 250 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे.

शाहरुख खानचा ‘मन्नत’

शाहरुख खानचा वांद्रे इथल्या समुद्रकिनाऱ्याजवळ असलेला ‘मन्नत’ बंगला बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटी घरांपैकी एक आहे. सेलिब्रिटी वेल्थ मॅनेजर दीपक हिरो वाजिरानी यांनी एका पॉडकास्टमध्ये केलेल्या दाव्यानुसार, शाहरुखने हा बंगला जवळपास 18 कोटी रुपयांना खरेदी केला होता. आज या प्रॉपर्टीची किंमत जवळपास 300 कोटी रुपये असल्याचं त्यांनी सांगितलं. म्हणजेच मन्नतच्या किमतीत तब्बल 17 पटीने वाढ झाल्याचा अंदाज आहे.

सध्या या बंगल्याच्या नूतनीकरणाचं काम सुरू आहे. एप्रिल 2025 मध्ये शाहरुख आणि त्याचं कुटुंब मन्नत सोडून दुसरीकडे राहायला गेलं. मन्नतच्या मागील बाजूला असलेल्या अ‍ॅनेक्सी इमारतीमध्ये आणखी दोन मजले बांधण्यात येत आहेत. यामुळे जवळपास 7 हजार चौरस फुटांची अतिरिक्त जागा उपलब्ध होणार आहे. या कामासाठी जवळपास 25 कोटी रुपये खर्च होणार असल्याची माहिती आहे.

रणबीर-आलियाचा कृष्णा राज बंगला

शाहरुखच्या मन्नतनंतर सर्वाधिक चर्चा आहे ती रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या ‘कृष्णा राज’ बंगल्याची. मुंबईतील वांद्रे परिसरात असलेला हा सहा मजली आलिशान बंगला जवळपास 250 कोटी रुपयांचा असल्याचं सांगितलं जातं. नोव्हेंबर 2025 मध्ये रणबीर आणि आलिया आपल्या मुलगी राहासह या नव्या घरात राहायला गेले. रणबीरची आजी कृष्णा राज कपूर यांच्या नावावरून या बंगल्याचं नाव ठेवण्यात आलं आहे. याआधी हा बंगला राज कपूर आणि कृष्णा कपूर यांचा होता.

अमिताभ बच्चन यांच्या जलसाचीही कोट्यवधींची किंमत

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा जुहू इथला ‘जलसा’ बंगला देखील आलिशान सेलिब्रिटी घरांमध्ये गणला जातो. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, या बंगल्याची किंमत जवळपास 120 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.

शाहरुख खान, रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यांच्या किमती सध्या अंदाजांवर आधारित आहेत. त्यांच्या किमती नोंदणीकृत मालमत्ता व्यवहारांद्वारे निश्चित केल्या जाऊ शकत नाहीत. या किमती मीडिया रिपोर्ट्स, अंतर्गत सूत्रांकडून मिळालेली माहिती आणि वेल्थ मॅनेजर्सच्या अंदाजांवर आधारित आहेत. त्यामुळे त्यांना अधिकृत बाजारभाव मानलं जाऊ शकत नाही.

Follow Us
माझ्या पप्पांना न्याय कधी मिळणार? प्रदीप पुर्णेकरांच्या मुलाची पोलीस..
Pradeep Purnekar : माझ्या पप्पांना न्याय कधी मिळणार? प्रदीप पुर्णेकरांच्या मुलाची पोलीस ठाण्याबाहेर बॅनरबाजी; तपासावर प्रश्नचिन्ह
महिलांच्या शोषणाविरोधातील चित्रपटाला पाठिंबा देण्याऐवजी अडथळे का?
Dipali Sayyad On Rupali Chakankar : महिलांच्या शोषणाविरोधातील चित्रपटाला पाठिंबा देण्याऐवजी अडथळे का? दिपाली सय्यदांचा रुपाली चाकणकरांना सवाल
अमित शाहांच्या टीकेला ठाकरेंचं उत्तर; थेट म्हणाले, माफी मागायला हवी...
अमित शाहांच्या टीकेला ठाकरेंचं उत्तर; थेट म्हणाले, माफी मागायला हवी होती, कारण...
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी उद्धव ठाकरेंकडून शक्तीस्थळी अभिवादन
Uddhav Thackeray : बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी उद्धव ठाकरेंनी शक्तीस्थळी जाऊन केले अभिवादन!
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी एकनाथ शिंदेंकडून...
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी एकनाथ शिंदेंकडून अभिवाद; त्यांनी दिलेल्या मुलमंत्राचं स्मरण करत म्हणाले...
बच्चन बाप-बेट्याला बुलेटप्रूफमध्येही मारु! गोल्डी ढिल्लोच्या दाव्याने
Amitabh Bachchan Safety : बच्चन बाप-बेट्याला बुलेटप्रूफमध्येही मारु! गोल्डी ढिल्लोच्या दाव्याने खळबळ
मोठी बातमी! महाराष्ट्रातील आणखी 18 तालुके दुष्काळग्रस्त होणार? आज...
महाराष्ट्रातील आणखी 18 तालुके दुष्काळग्रस्त होणार? आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक!
ऑपरेशन टायगरवर आशिष जयस्वाल यांचे सूचक विधान; ठाकरे गटाच्या...
ऑपरेशन टायगरवर आशिष जयस्वाल यांचे सूचक विधान; ठाकरे गटाच्या नेतृत्वाबाबत काय म्हणाले?
छठपूजेनंतर महाराष्ट्रात काही ठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य! रामकुंड...
छठपूजेनंतर महाराष्ट्रात अस्वच्छतेचे साम्राज्य! रामकुंडाच्या पायऱ्यांवर आडनावे, समुद्रकिनाऱ्यांवर कचऱ्याचे ढीग
रायगडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे जोरदार शक्तिप्रदर्शन; शेकडो कार्यकर्ते
Eknath shinde : रायगडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे जोरदार शक्तिप्रदर्शन; शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश