TMKOC: ‘तारक मेहता..’मध्ये शैलेश लोढाच्या जागी दिसणार ‘हा’ लोकप्रिय अभिनेता

शैलेश लोढा हे मालिकेच्या कराराबाबत खूश नव्हते अशी माहिती समोर येतेय. मालिकेच्या वेळापत्रकाशी संबंधित समस्या असल्याने त्यांनी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. निर्मात्यांनी त्यांना मालिकेत थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र ते आपल्या निर्णयावर ठाम होते.

TMKOC: तारक मेहता..मध्ये शैलेश लोढाच्या जागी दिसणार हा लोकप्रिय अभिनेता
Shailesh Lodha of TMKOC
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Sep 12, 2022 | 1:20 PM

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. 14 वर्षांनंतरही या मालिकेची लोकप्रियता (Popular Serial) अजूनही कायम आहे. मात्र गेल्या काही महिन्यांत काही कलाकारांनी ही मालिका सोडली. असं असतानाही प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी निर्माते अविरत प्रयत्न करत आहेत. आता या मालिकेशी संबंधित आणखी एक बातमी समोर येत आहे.

काही दिवसांपूर्वी या मालिकेत तारकची भूमिका साकारणारे अभिनेते शैलेश लोढा यांनी मालिकेचा निरोप घेतला. त्यांच्या जागी मालिकेत कोणता कलाकार झळकणार याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. निर्मात्यांनी तारकच्या भूमिकेसाठी नव्या कलाकाराची निवड केली आहे. टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेता सचिन श्रॉफ या मालिकेत आता तारकच्या भूमिकेत दिसणार असल्याचं कळतंय. यासाठी सचिनने शूटिंगलाही सुरुवात केली आहे. मात्र याबाबत निर्माते किंवा कलाकाराकडून अधिकृतरित्या माहिती समोर आली नाही.

अभिनेता सचिन श्रॉफ हा टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने प्रकाश झा यांच्या ‘आश्रम’ या वेब सीरिजमध्येही भूमिका साकारली आहे. त्याचसोबत ‘गुम है किसी के प्यार में’ या लोकप्रिय मालिकेतही तो झळकला होता.

शैलेश लोढा हे मालिकेच्या कराराबाबत खूश नव्हते अशी माहिती समोर येतेय. मालिकेच्या वेळापत्रकाशी संबंधित समस्या असल्याने त्यांनी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. निर्मात्यांनी त्यांना मालिकेत थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र ते आपल्या निर्णयावर ठाम होते. गेल्या काही वर्षांत या मालिकेतून दया बेनची भूमिका साकारणारी दिशा वकानी, अंजली भाभीची भूमिका साकारणारी नेहा मेहता यांनी निरोप घेतला.