अफगाणी क्रिकेटपटूशी लग्न ठरलंय, बहुतेक बाबा साखरपुडा मोडतील, अभिनेत्री अर्शी खानची खंत

एका अफगाणिस्तानी क्रिकेटपटूसोबत मी ऑक्टोबर महिन्यात साखरपुडा करणार होते. माझ्या वडिलांनीच त्याची पसंती केली होती. मात्र आपल्या कुटुंबाला हा साखरपुडा रद्द करावी लागू शकतो, अशी भीतीही अर्शी खानने व्यक्त केली.

अफगाणी क्रिकेटपटूशी लग्न ठरलंय, बहुतेक बाबा साखरपुडा मोडतील, अभिनेत्री अर्शी खानची खंत
Arshi Khan
| Edited By: | Updated on: Aug 23, 2021 | 12:31 PM

मुंबई : वडिलांनी निवडलेल्या एका अफगाण क्रिकेटपटूशी माझे लग्न होणार होते, असे टीव्ही अभिनेत्री अर्शी खान (Arshi Khan) हिने सांगितले. मात्र अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात गेल्यामुळे आपल्या कुटुंबाला हा साखरपुडा रद्द करावी लागू शकतो, अशी भीतीही तिने व्यक्त केली.

काय म्हणाली अर्शी?

“एका अफगाणिस्तानी क्रिकेटपटूसोबत मी ऑक्टोबर महिन्यात साखरपुडा करणार होते. माझ्या वडिलांनीच त्याची पसंती केली होती. मात्र तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्याने आम्हाला हे नातेसंबंध तोडावे लागतील” असं अर्शी खान म्हणाली. अर्शीने त्या अफगाण क्रिकेटपटूचं नाव मात्र गुलदस्त्यातच ठेवणं पसंत केलंय.

तो माझ्या वडिलांच्या मित्राचा मुलगा आहे. हे पूर्णपणे अरेंज मॅरेज आहे. मी आणि तो एकमेकांच्या संपर्कात होतो. आमची मैत्रीच झाली होती. मात्र माझ्या कुटुंबाकडून हा साखरपुडा मोडला जाण्याची शक्यता आहे. माझे आई-बाबा आता माझ्यासाठी भारतीय वर शोधण्याची चिन्हं आहेत, असं अर्शी म्हणते.

अर्शी खान मूळ अफगाणी

अर्शी म्हणाली की तिच्या कुटुंबाची मुळे अफगाणिस्तानात रुजली आहेत. “मी एक अफगाणी पठाण आहे, आणि माझे कुटुंब युसुफझाई वंशीय गटातील आहेत. माझे आजोबा अफगाणिस्तानातून भारतात स्थलांतरित झाले होते. ते भोपाळमध्ये जेलर होते. माझी मुळे अफगाणिस्तानात आहेत, पण मी भारतीय नागरिक आहे, जसे माझे पालक आणि आजी आजोबा आहेत” असं अर्शीने सांगितलं.

कोण आहे अर्शी खान?

अर्शी खान ‘बिग बॉस 11’ ची स्पर्धक होती आणि तिने 14 व्या सीझनमध्ये चॅलेंजर म्हणून शोमध्ये पुन्हा प्रवेश केला होता. ती ‘सावित्री देवी कॉलेज अँड हॉस्पिटल’, ‘विश’ आणि ‘इश्क में मरजावन’ यासारख्या टीव्ही शोमध्ये झळकली आहे. ती अनेक रिअॅलिटी शो आणि म्युझिक व्हिडिओंमध्ये दिसली आहे.

वादळी वक्तव्यांमुळे प्रसिद्ध

सप्टेंबर 2015 मध्ये अर्शी खानने आपण पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा केला होता. अर्शी खान ही तीच मॉडेल आहे जिने या अगोदर टीम इंडियाच्या बऱ्याचश्या मॅचेस दरम्यान वादळ उठवलं होतं. 2016 टी -20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याआधी, टीम इंडिया हा सामना जिंकल्यास मी माझे कपडे काढेन, असं अर्शी खान म्हणाली होती. ती नुसती बोलून थांबली नाही तर खरंच तिने तिची कपडे काढले देखील, तसे काही फोटोही तिने प्रसिद्ध केले होते.

अर्शी खानचे इन्स्टाग्राम फोटो

संबंधित बातम्या :

मला मिस्टर राईट हवाय, टीम इंडियाच्या विजयानंतर कपडे उतरवणाऱ्या अर्शी खानची इच्छा

प्यार के लिये सब कुछ’, भाऊ कदमांच्या तोंडून ऐका त्यांच्या बाजिंद प्रेमाची गोष्ट

दीपिका पदुकोणचे रेड चॅनेल टॉप, लेटेक्स बॅलेंसियागा पँटमधील ‘हे’ खास फोटो बघितले का?