Man Jhala Bajind : ‘प्यार के लिये सब कुछ’, भाऊ कदमांच्या तोंडून ऐका त्यांच्या बाजिंद प्रेमाची गोष्ट

आता नुकतंच झी मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक खास व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे या व्हिडीओत आपल्या लाडक्या भाऊ कदमांनी त्यांच्या बाजिंद प्रेमाची गोष्ट प्रेक्षकांना सांगितली आहे. (Man Jhala Bajind: 'Pyaar Ke Liye Sab Kuch', Listen to the love story of Bhau Kadam)

Man Jhala Bajind : 'प्यार के लिये सब कुछ', भाऊ कदमांच्या तोंडून ऐका त्यांच्या बाजिंद प्रेमाची गोष्ट

मुंबई : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर आजपासून ‘मन झालं बाजिंद’ (Man Jhala Bajind) ही नवीकोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचा प्रोमो काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला तेव्हापासून या मालिकेची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये होती. आता नवनवीन उपक्रम राबवत ही मालिका प्रेक्षकांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतेय. या मालिकेत राया आणि कृष्णाची एक अनोखी प्रेम कथा दाखवण्यात येणार आहे.

भाऊ म्हणाले प्यार के लिये सब कुछ

आता नुकतंच झी मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक खास व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे या व्हिडीओत आपल्या लाडक्या भाऊ कदम यांनी त्यांच्या बाजिंद प्रेमाची गोष्ट प्रेक्षकांना सांगितली आहे. पाहा ‘ममता आणि भालचंद्र म्हणजेच आपल्या भाऊंच्या प्रेमाची गोष्ट.’

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

सांगा तुमच्या बाजिंद प्रेमाची गोष्ट व्हिडीओच्या माध्यमातून 

आता ‘मन झालं बाजिंद’ या मालिकेची टीम एका नव्या उपक्रमासह प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. प्रत्येक जण आयुष्यात प्रेमात पडतोच, प्रेम ही भावना या सगळ्यात एक असली तरी प्रत्येकाची कहानी मात्र वेगळी असते. अशीच कहानी तुमचीही असेलच नाही का?. तर या उपक्रमाच्या माध्यमातून तुम्ही तुमची बाजिंद प्रेमाची कहानी सगळ्यांना सांगू शकणार आहात. ‘तुमच्या बाजिंद प्रेमाची गोष्ट व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला सांगा. #ManJhalaBajind #ZeeMarathi हे दोन हॅशटॅग वापरून आम्हाला टॅग करायला विसरू नका. एक नवी कथा, एक नवी मालिका ‘मन झालं बाजिंद’ आजपासून सोम ते शनि संध्या ७ वा .’ असं कॅप्शन देत हा उपक्रम प्रेक्षकांसमोर मांडण्यात आला आहे.

प्रेक्षकांनी सर्च केला ‘बाजिंद’ शब्दाचा अर्थ 

‘मन झालं बाजिंद’ या मालिकेचा प्रोमो 29 जुलै रोजी प्रदर्शित करण्यात होता. बघता बघता या नव्या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. पण प्रोमो पाहिल्यावर प्रेक्षक गुगलवर ‘बाजिंद’ शब्दाचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ‘बाजिंद अर्थ’, ‘बाजिंद Meaning’, ‘बाजिंदचा अर्थ’, ‘बाजिंद म्हणजे काय?’, ‘बाजिंदी अर्थ’ या टर्म्स गुगल सर्चच्या ट्रेण्डमध्ये दिसून आले.

कधी केला जातोय सर्च?

सायंकाळी म्हणजेच जेव्हा सर्वजण टीव्हीसमोर बसून आपल्या आवडत्या मालिका पाहत असतात, तेव्हापासूनच ‘बाजिंद’ शब्दाबद्दलचा सर्च वाढताना दिसतो. सामान्यपणे पुढील चार तासांमध्ये म्हणजेच रात्री साडेअकरापर्यंत सर्चचे हे प्रमाण वाढतच जाते. साडेअकराला सर्वाधिक लोक ‘बाजिंद’बद्दल सर्च करत असतात. विशेष म्हणजे त्यानंतर ‘बाजिंद’बद्दलच्या सर्चमध्ये पुन्हा घट होते आणि पुन्हा पुढील दिवशी साडेसातच्या आत हा सर्च ग्राफ वर गेलेला पहायला मिळतो. म्हणजेच जेव्हा जेव्हा मालिका बघताना जाहिरात लागते, तेव्हा लोक ‘बाजिंद’चा अर्थ काय आहे हे गुगलवर सर्च करताना दिसतात.

संबंधित बातम्या

Karbhari Laibhari : ‘कारभारी लयभारी’, अभिनेता निखिल चव्हाणनं शेअर केली खास पोस्ट

Kaun Banega Crorepati 13 : देविंयो और सज्जनो, आजपासून केबीसी प्रेक्षकांच्या भेटीला, कोणते बदल, कुठे, कसा पहाणार?

Saira Banu Birthday : वयाच्या 16 व्या वर्षी दिलीप कुमार यांच्या प्रेमात, अखेरपर्यंत साथ, सायरा बानो यांचे खास किस्से

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI