Kaun Banega Crorepati 13 : देविंयो और सज्जनो, आजपासून केबीसी प्रेक्षकांच्या भेटीला, कोणते बदल, कुठे, कसा पहाणार?

ज्या एका शोची देश आतुरतेनं कित्येक वर्षापासून सातत्यानं वाट पहात असतो. तो म्हणजे कौन बनेगा करोडपती (Kaun Banega Crorepati 13.)त्याचं कारणही खास आहे. बॉलीवुडचा शहंशाह अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हा शो होस्ट करत असतात. यावेळेसच्या सिजनमध्ये अमिताभ बच्चन स्पर्धकांना प्रश्न विचारतील, त्यांच्या आयुष्याचा उलगडाही करतील.

Kaun Banega Crorepati 13 : देविंयो और सज्जनो, आजपासून केबीसी प्रेक्षकांच्या भेटीला, कोणते बदल, कुठे, कसा पहाणार?
केबीसी

मुंबई : ज्या एका शोची देश आतुरतेनं कित्येक वर्षापासून सातत्यानं वाट पहात असतो. तो म्हणजे कौन बनेगा करोडपती (Kaun Banega Crorepati 13.)त्याचं कारणही खास आहे. बॉलीवुडचा शहंशाह अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हा शो होस्ट करत असतात. यावेळेसच्या सिजनमध्ये अमिताभ बच्चन स्पर्धकांना प्रश्न विचारतील, त्यांच्या आयुष्याचा उलगडाही करतील. 13 सिझनमध्ये काही बदल मात्र केलेले आहेत. (Now watch kaun banega crorepati 13, host Abhitabh Bachchan)

कोरोनाच्या उद्रेकानंतर 12 व्या सिजनमध्येही काही बदल केलेले होते. ऑडियन्स पोल आणि लाईफलाईन हटवलेल्या होत्या. आता नव्या सिजनमध्ये ह्या दोन्ही गोष्टी पुन्हा स्पर्धकांना उपलब्ध असतील. अमिताभ बच्चन हा शो घेऊन येणार म्हणजे देशात चर्चा तर होणारच. ह्या 13 व्या सिजनचीही तशीच उत्सुकता लागलेली आहे. आजपासून हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. त्याचे प्रोमोजही पसंतीस उतरलेत. अर्थातच त्याला कारण बिग बीचा आवाज.

सोनी टीव्हीवर हा शो सुरु होईल तोही नव्या वेळेनुसार. अनेक गोष्टी ह्या नव्या सिजनमध्ये बदललेल्या असतील. त्याची उत्सुकताही आहे. सोबतच यावेळेस कोण पहिला करोडपती होणार, कुठले प्रश्न विचारले जाणार, प्रश्नांवर कोरोनाची सावली असेल का याचीही जोरदार चर्चा होतेय. स्पर्धकांना कोरोनाला वगळता येणार नाही. त्यामुळेच कौन बनेगा करोडपती अनेक अर्थानं प्रेक्षकांचं मनोरंजनही करेल आणि ज्ञानही वाढवणार यात शंका नाही. कदाचित काही स्पर्धकांनी कोरोनाचा सामनाही केलेला असेल. त्यांची गोष्ट ऐकणही एक नवा अनुभव असू शकतो.

कुठे आणि कधी पहाणार केबीसी 13 ?

अमिताभ बच्चन यांचा कौन बनेगा करोडपती हा शो आजपासून म्हणजेच 23 ऑगस्टपासून सोनी टीव्हीवर प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. आज रात्री 9 वाजता शोचा प्रिमिअर आहे.

ऑनलाईन कसा पहाणार केबीसी 13?

केबीसी 13 चा सिजन हा सोनी टीव्हीवर तर पहाता येईलच पण ज्यांना टीव्हीवर पहाणं शक्य नाही ते ऑनलाईनही पहाऊ शकतात. सोनी लिव एप तसच जिओ टीव्हीवर ह्या दोन डिजिटल प्लॅटफॉर्मवर हा शो बघता येईल.

केबीसी लाईफलाईन

केबीसीच्या 13 व्या सिजनमध्ये ऑडियन्सची वापसी झालीय. त्यामुळे शोची उंची आणखी वाढणार यात शंका नाही. शोमध्ये 50:50, एक्सपर्टचं मत, तसच प्रश्न बदलण्याची लाईफलाईन यांचाही समावेश आहे. त्यामुळे शो अधिक कसदार, दमदार होणार यात शंका नाही.

केबीसी प्रोमो

कौन बनेगा करोडपती हा शो म्हणून जेवढा लोकांना आवडतो तेवढाच त्याचे प्रोमोही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात. शोचा टीआरपी जेवढा असतो तेवढाच किंवा कधी कधी शो पेक्षा प्रोमोचा टीआरपी जास्त असतो. त्यामुळे यावेळेसही बच्चनचा तो आवाज कानावर पडताच एका मोठ्या रुबाबदार शोच्या आगमनाची चाहूल लागते. सोशल मीडियावर खुद्द अमिताभ बच्चन यांनी शोजचे काही प्रोमो रिलिज केलेले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

वीरु आणि दादा एकत्र भेटीला

येणारा शुक्रवार शोसाठीच नाही तर केबीसीच्या प्रेक्षकांसाठी स्पेशल असणार आहे. कारण शानदार शुक्रवारमध्ये माजी क्रिकेट कर्णधार सौरभ गांगुली आणि तडाखेबाज फलंदाज वीरेंद्र सहवाग एकत्र हॉटसीटवर असतील. सिजन 12 मध्ये दर शुक्रवार हा कर्मवीर स्पेशल असायचा. आता तोच शानदार शुक्रवार केला गेलाय. त्यामुळे शुक्रवारी सेलिब्रिटी हे सामाजिक क्षेत्रातले असतील. 27 तारीख लक्षात असू द्या कारण त्यादिवशी दादा आणि वीरु शहंशाहसमोर हॉटसीटवर असतील. त्यामुळे किस्स्यांसह अनुभवाची मेजवाणीही ऐकायला, पहायला मिळेल.

संबंधित बातम्या : 

Bell Bottom BO Collection Day 4 : अक्षय कुमारच्या चित्रपटाला रक्षा बंधनचा फायदा!, चौथ्या दिवशी तब्बल इतक्या कोटींची कमाई!

Nysa : न्यासाचा एक सिक्रेट बॉयफ्रेंड असं कळलं तर?, काजोल म्हणाली ‘अजयला कळलं तर तो गेटवर बंदूक घेऊन उभा राहील’

Bigg Boss OTT Shocking : करण नाथ आणि रिद्धिमा पंडित शोमधून बाहेर, लोकांनी एका कनेक्शनला केले वोट आऊट

(Now watch kaun banega crorepati 13, host Abhitabh Bachchan)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI