AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bell Bottom BO Collection Day 4 : अक्षय कुमारच्या चित्रपटाला रक्षा बंधनचा फायदा!, चौथ्या दिवशी तब्बल इतक्या कोटींची कमाई!

अक्षय कुमारचा बेल बॉटम हा चित्रपट थिएटरमध्ये चांगलाच हिट होताना दिसत आहे. हा चित्रपट 15 आॅगस्ट रोजी प्रदर्शित झाला आहे. अक्षयच्या चित्रपटाला रक्षा बंधनाचा चांगल्याच फायदा झाला आहे. चित्रपटाच्या चौथ्या दिवशीचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आले आहे.

Bell Bottom BO Collection Day 4 : अक्षय कुमारच्या चित्रपटाला रक्षा बंधनचा फायदा!, चौथ्या दिवशी तब्बल इतक्या कोटींची कमाई!
बेल बॉटम
| Edited By: | Updated on: Aug 23, 2021 | 10:59 AM
Share

मुंबई : अक्षय कुमारचा बेल बॉटम हा चित्रपट थिएटरमध्ये चांगलाच हिट होताना दिसत आहे. हा चित्रपट 15 आॅगस्ट रोजी प्रदर्शित झाला आहे. अक्षयच्या चित्रपटाला रक्षा बंधनाचा चांगल्याच फायदा झाला आहे. चित्रपटाच्या चौथ्या दिवशीचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आले आहे. अगोदरच्या दिवसांच्या तुलनेत चित्रपटाने सर्वाधिक कमाई केली आहे. बेल बॉटममध्ये अक्षयसोबत वाणी कपूर, लारा दत्ता आणि हुमा कुरेशी महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसल्या आहेत.  (Akshay Kumar’s Bell Bottom grossed 4.50 crore on its fourth day)

बॉक्स ऑफिस कलेक्शन

अक्षय कुमारच्या बेल बॉटम या चित्रपटाने चौथ्या दिवशी चांगली कमाई केली आहे. बॉक्स ऑफिस इंडियाच्या अहवालानुसार, चित्रपटाने रविवारी सुमारे 4.50 कोटींची कमाई केली आहे. बेल बॉटमने आतापर्यंत सुमारे 13 कोटींची कमाई केली आहे. अक्षय कुमारच्या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये रविवारी वाढ झाली आहे. दिल्ली आणि एनसीआरमध्ये चित्रपटाला चांगली वाढ झाली आहे. त्याचबरोबर या चित्रपटाला यूपी, गुजरात सारख्या राज्यांमध्ये तितकी वाढ मिळालेली नाही.

ऑनलाइन लीक

अक्षय कुमारचा बेल बॉटम हा चित्रपट ऑनलाइन लीक झाला आहे. हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर काही तासांतच एचडीमध्ये ऑनलाइन लीक झाला. ज्याचा बॉक्स ऑफिस कलेक्शनवर मोठा फरक पडला आहे. त्याचबरोबर, अनेक राज्यांमध्ये चित्रपटगृहे अद्यापही बंदच आहेत.

प्रेक्षकांना आवडला ‘बेलबॉटम’

कोरोना विषाणूच्या काळादरम्यान, हा असा पहिला चित्रपट आहे. जो मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. बेल बॉटमसाठी अक्षय कुमारचे सर्व बाजूंनी कौतुक होत आहे. कोरोना काळामध्ये हा पहिलाच चित्रपट आहे, जो मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे.

चित्रपटाचा सिक्वेल येण्याची शक्यता

अलीकडेच, अक्षय कुमारने ‘बेल बॉटम’च्या सिक्वेल येण्याचे संकेतही दिले आहेत. अभिनेता म्हणतो- ‘ज्या प्रकारे चित्रपट संपतो, तिथे सिक्वेलला वाव आहे. जर मेकर्स चांगली स्क्रिप्ट घेऊन आले, तर काम करता येईल.’ अशा परिस्थितीत आता अक्षय कुमारच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

अक्षय कुमार सध्या लंडनमध्ये आहे. तो तिच्या नवीन चित्रपटाच्या शूटिंगसाठी सज्ज झाला आहे. अभिनेत्री रकुलप्रीत सिंहदेखील त्याच्यासोबत या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय अक्षय कुमार ‘रक्षाबंधन’, ‘राम सेतू’, ‘अतरंगी रे’ आणि ‘सूर्यवंशी’ सारख्या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.

संबंधित बातम्या : 

Nysa : न्यासाचा एक सिक्रेट बॉयफ्रेंड असं कळलं तर?, काजोल म्हणाली ‘अजयला कळलं तर तो गेटवर बंदूक घेऊन उभा राहील’

Bigg Boss OTT Shocking : करण नाथ आणि रिद्धिमा पंडित शोमधून बाहेर, लोकांनी एका कनेक्शनला केले वोट आऊट

Tiger 3 : ‘टायगर 3’च्या सेटवरून सलमान खानचा फर्स्ट लूक लीक, लांब केस आणि दाढीमध्ये भाईजानला ओळखणं कठीण

(Akshay Kumar’s Bell Bottom grossed 4.50 crore on its fourth day)

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.