Nysa : न्यासाचा एक सिक्रेट बॉयफ्रेंड असं कळलं तर?, काजोल म्हणाली ‘अजयला कळलं तर तो गेटवर बंदूक घेऊन उभा राहील’

नुकतंच एका मुलाखतीत काजोलला तिच्या मुलीबद्दल विचारण्यात आलं, यावेळी तिनं अशा प्रकारे उत्तर दिलं की तुम्हालाही आश्चर्य वाटेल. (What if she he find out about Nyasa's secret boyfriend ?, Kajol said...)

Nysa : न्यासाचा एक सिक्रेट बॉयफ्रेंड असं कळलं तर?, काजोल म्हणाली 'अजयला कळलं तर तो गेटवर बंदूक घेऊन उभा राहील'

मुंबई : अजय देवगण (Ajay Devgn) आणि काजोलची (Kajol) मुलगी न्यासानं (Nysa) अजून चित्रपटांमध्ये प्रवेश केलेला नसला, तरी तिच्याबद्दल अधिक गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत. न्यासा जेव्हाही तिच्या आई आणि वडिलांसोबत दिसते तेव्हा तिचे फोटो सोशल मीडियावर नक्कीच व्हायरल होतात.

चाहतेही न्यासाबद्दल जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहेत. तर नुकतंच एका मुलाखतीत काजोलला तिच्या मुलीबद्दल विचारण्यात आलं, यावेळी तिनं अशा प्रकारे उत्तर दिलं की तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

खरं तर, फीट अप विथ द स्टार्सच्या एका एपिसोडमध्ये, काजोलला विचारण्यात आलं की जर तिला समजलं की मुलगी न्यासाचा एक सिक्रेट बॉयफ्रेंड असेल तर ती काय करेल? काजोलला ही कल्पना थोडी आवडली नाही. तिनं अजयबद्दल विनोद केला. काजोल म्हणाली, ‘अजयला कळलं तर तो गेटवर एक बंदूक घेऊन उभा राहील.’

मुलं कोणाकडून घेतील प्रेमाचा सल्ला

याआधी, एका मुलाखतीदरम्यान, काजोलला विचारण्यात होतं की न्यासा आणि युग प्रेमाचा सल्ला कोणाकडून घेतील, तुझ्याकडून की अजय? तर काजोल म्हणाली, ‘मला वाटतं की न्यासा माझ्याकडे आणि  युग अजयकडे येईल कारण युग म्हणतो की त्याचे वडील खूप कूल आहेत.’

काजोलनं असंही म्हटलं होतं की, न्यासा कधीही तिच्या वडिलांकडे जाणार नाही. ती त्यांना कधीच तिच्या बॉयफ्रेंडबद्दल सांगणार नाही. अन्यथा तो बंदूक घेऊन उभा राहील आणि म्हणेल की तो कोण आहे, तो कोण आहे.

यापूर्वी कॉफी विथ करणमध्ये काजोलनं सांगितलं होतं की अजय एक पजेसिव्ह पिता आहे आणि जोपर्यंत न्यासा सुरक्षित वाटत नाही तोपर्यंत तो शांत हसत नाही. तो विचारत राहतो की न्यासा कुठे चालली आहे, कधी परत येईल…

नुकतंच साजरा केला 18 वा वाढदिवस

न्यासानं नुकतंच तिचा 18 वा वाढदिवस साजरा केला. न्यासाच्या वाढदिवसानिमित्त काजोलनं तिच्या मुलीसाठी एक खास संदेश लिहिला, ‘तुझा जन्म झाला तेव्हा मी खूप काळजीत होते. ती माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी परीक्षा होती आणि ही भीती कायम राहिली. मग तु 10 वर्षांची झाली आणि मला समजलं की मी बहुतेक वेळा विद्यार्थी होते आणि कमी वेळेसाठी शिक्षक होते. या काळात मी अनेक नवीन गोष्टी शिकले. म्हणून फक्त उंच भरारी घेत रहा आणि चमकत रहा.

संबंधित बातम्या

Shilpa Shetty : राज कुंद्रा काँट्रोव्हर्सी दरम्यान शिल्पा शेट्टीची खास पोस्ट, फोटो शेअर करत म्हणाली, ‘कोणतीच शक्ती महिलेला…’

व्यक्तिरेखा जिवंत वाटावी म्हणून तासान् तास स्मशानात बसून राहायचा विकी कौशल, वाचा मसान चित्रपटाचा किस्सा…

‘देवदास’चं गाणं डोक्यात बसलं अन् कवी म्हणून उदय झाला; वाचा हृदयनाथ सिन्नरकरांचा किस्सा

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI