Maharashtra Political News LIVE : सचिन तेंडुलकर यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट
Live Updates In Marathi : आज राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा उत्साह आहे. ठिकठिकाणी शिवजयंती उत्साहात साजरी होत आहे. आग्र्यामध्ये ही मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली जाणार आहे.

जळगावात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने मध्यरात्री 12 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांची महाआरती करण्यात आली. भाजप आमदार सुरेश भोळे, महापौर दीपमाला काळे, नगरसेवक सुनील खडके यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ हजारोंच्या संख्येने शिवप्रेमी नागरिक महाआरती करण्यासाठी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. फटाक्यांची आतषबाजी करत तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत मोठ्या जल्लोषात जयंती साजरी करण्यास सुरुवात झाली आहे. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी शिवप्रेमींची मोठी गर्दी. छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर उत्साहाचं वातावरण. जय जिजाऊ, जय शिवराय घोषणांनी परिसर दणाणला.
LIVE NEWS & UPDATES
-
डोंबिवलीतील हायप्रोफाईल MIDC भागात चोरीचा धाडसी प्रयत्न
डोंबिवलीतील हायप्रोफाईल MIDC भागात चोरीचा धाडसी प्रयत्न
मिलापनगरमध्ये बंगल्यात चोरी करण्याचा चोरट्यांचा डावा फसला
संपूर्ण चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
वृद्ध महिलेची चाहूल लागताच चोरट्यांचा घटनास्थळावरून पळ
-
धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर शहरात लग्नात तुफान राडा, तिघांची हत्या
धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर शहरात लग्नात तुफान राडा
दोन गटात झालेल्या वादात तिघांचा मृत्यू
पिंपळनेर शहरातील घटना
लग्नकार्यात झालेल्या वादातून तिघांची हत्या, तर दोन जण जखमी
-
-
नाशिकमध्ये शिवजयंतीच्या मिरवणुकीत मंत्री गिरीश महाजन यांनी वाजवला ढोल
नाशिकमध्ये शिवजयंतीचा उत्साह दिसून येत आहे. शिवजयंतीच्या मिरवणुकीत मंत्री गिरीश महाजन यांनी ढोल वाजवला नाशिकच्या शिवजयंतीच्या मिरवणुकीत मंत्री गिरीश महाजन यांच्या सोबत आमदार देवयानी फरांदे, राहुल ढिकले, सीमा हिरे तसेच महापौर हिंमगौरी आडके यांची देखील उपस्थिती होती.
-
सचिन तेंडुलकर यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट
मुलगा अर्जून याच्या विवाहाचे निमंत्रण देण्यासाठी भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
-
चाळीसगाव शहरात शिवजयंतीच्या कार्यक्रमात पोलिस आणि शिवप्रेमीत बाचाबाची
चाळीसगाव शहरातील शिवजयंतीनिमित्त सुरू असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान पोलिस अधिकारी आणि शिवप्रेमींमध्ये शुल्लक कारणावरून बाचाबाची झाल्याची घटना समोर आली. घटनेनंतर काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चौधरी यांची तात्काळ नियंत्रण कक्षात बदली करण्याचे आदेश दिले.
-
-
धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर शहरात लग्नात दोन गटात राडा, दोन ठार
धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर शहरात एका लग्नात तुफान राडा झाला असून दोन गटात झालेल्या वादात दोघांचा चाकूने भोसकून खून झाल्याने खळबळ उडाली आहे. पिंपळनेर शहरातील ही घटना असून लग्नकार्यात झालेल्या वादातून दोघांची हत्या झाली असून दोन जण जखमी झाले आहेत. जखमींना धुळ्याच्या भाऊसाहेब हिरे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. पिंपळनेर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
-
ईश्वरपूरमध्ये भीषण अपघात, कारने दुचाकीला उडवले
ईश्वरपूर ताकारी रस्त्यावर साखराळे येथील पेट्रोल पंपानजीक भरधाव कारने दुचाकी, पादचाऱ्याला धडक दिल्याने झालेल्या अपघातात तिघे जण जखमी झाले आहेत. नितीन शिवाजी पवार (वय ४१ रा. निनाईनगर, ईश्वरपूर), त्यांची आई छाया पवार हे जखमी झाले. तिसऱ्या जखमी व्यक्तीचे नाव समजू शकले नाही. त्यांना कराड येथे खासगी रुग्णालयात दाखल केले. कार चालक लिमय करसे (रा. गडचिरोली) याच्या विरोधात ईश्वरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
-
सचिन तेंडुलकरने घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट
भारतरत्न सचिन तेंडुलकर याने आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या नंदनवन या निवासस्थानी येऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांची पत्नी अंजली तेंडुलकर याही उपस्थित होत्या. सचिन यांचे ज्येष्ठ सुपुत्र अर्जुन यांच्या विवाहाची पत्रिका देण्यासाठी त्यांनी ही भेट घेतली.
-
गोंदिया जिल्ह्यात शिक्षणाचा बोजवारा, 97 शाळांच्या भार प्रत्येकी एका शिक्षकावर
गोंदिया जिल्ह्यात शिक्षणाचा बोजवारा उडवाला आहे. जिल्ह्यातील 97 शाळांच्या भार प्रत्येकी एका शिक्षकावर असल्याचे समोर आले आहे जिल्ह्यात 806 पदे रिक्त आहेत. ग्रामीण भागातील शाळांची दयनीय अवस्था झालेली पाहायला मिळत आहे. शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. शिक्षक भरती करावी अशी मागणी केली जात आहे.
-
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त धुळ्यात विविध कार्यक्रमांचा आयोजन
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त धुळ्यात विविध कार्यक्रमांचा आयोजन करण्यात आले. शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या वतीने शहरातील प्रमुख मार्गावर मोठ्या शोभा यात्रेचा आयोजन करण्यात आले. शोभायात्रेमध्ये ढोल ताशा पथकाबरोबर पारंपारिक वाद्य वाजवण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह हजारो विद्यार्थी शिक्षक सहभागी झाले.
-
मंत्रालयातील लाच प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल
मंत्रालयातील लाच प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी हे सरकार जनसेवेसाठी आहे हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री यावर कठोर निर्णय घेतील शंका नाही अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. जय पवार यांनी केलेल्या मागणीबाबत मी येथे बसून प्रतिक्रिया देणार नाही. सर्व तांत्रिक बाजूने तपास सुरू आहे. डीजीसीए आणि राज्याचा गुप्तचर विभाग देखील चौकशी करत आहे, असे ते म्हणाले.
-
बीड शहरातील शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात विद्युत रोषणाई
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बीड शहरातील शिवस्मारक परिसरात मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई करण्यात आली असून अनेकांचे लक्ष वेधत आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यापासून बीड शहरात शिवभक्तांनी सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे.
-
बाळासाहेब ठाकरे गड-किल्ले स्वच्छता मोहीम
गडकिल्ल्यांवर ‘बाळासाहेब ठाकरे गड-किल्ले स्वच्छता मोहीम – मानाचा मुजरा, हटवूया कचरा’ या माध्यमातून स्वच्छता मोहीम सुरू आहे, असे सिद्धेश कदम म्हणाले. मागील महिन्यात एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून त्याचे अनावरण झाले होते. अकरा किल्ल्यांना युनेस्को स्टेटस प्राप्त झालेले आहे. एमपीसीबी मार्फत किल्ल्यांचे संवर्धन करण्यात येणार आहे. महाराजांचे वैभव टिकवून ठेवण्यासंदर्भात शिंदे साहेब यांच्या पुढाकाराने प्रयत्न सुरू आहेत, असे ते म्हणाले.
-
विमान अपघाताची सरकारने उच्चस्तरीय चौकशी करा-संजय शिरसाट
विमान अपघाताचा ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होत नाही असे अजितदादांचे पुत्र जय पवार म्हणाले. ब्लॅक बॉक्स कधीही तात्काळ नष्ट होत नाही, हे सर्वांचाच मत आहे तज्ञांच सुद्धा मत आहे.परंतु हा नष्ट झाला असेल किंवा त्यातलं काही सापडलं असेल तर याची निश्चित उच्चस्तरीय चौकशी सरकारने केली पाहिजे, अशी प्रतिक्रिया मंत्री संजय शिरसाट यांनी दिली.
-
कांद्याला भाव नाही, शेतकऱ्यानं नांगर फिरवला
कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने बार्शी तालुक्यातील उंबरगे येथील शेतकर्याने पिकात नांगर फिरवलाय. संजय संदिपान देशमुख असं या शेतकऱ्याचे नाव आहे. कांद्याला योग्य भाव न मिळाल्याने वैतागून देशमुख यांनी आपल्या शेतातील 3 एकर उभा कांदा ट्रॅक्टरने नांगरत काढून टाकलाय. कांदा रोपांची किंमत प्रति किलो 3 हजार रुपये प्रमाणे 10 किलो रोप लावून तयार केले होते त्यासाठी सुमारे 30 हजार रुपयांचा रोपांचा खर्च झाला असून, लागवडीसाठी सुमारे 70 हजार रुपये, तसेच खत व औषधांसाठी 30 ते 40 हजार रुपयांपर्यंत खर्च झाला.
-
बीड शहरातील शिवस्मारक परिसरात मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बीड शहरातील शिवस्मारक परिसरात मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई करण्यात आली असून अनेकांचे लक्ष वेधत आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी बीड शहरात शिवभक्तांनी सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे.
-
आम्हाला काँग्रेसची चौकशी समिती आणि चेन्नीथला यांच्या वक्तव्याबाबत काहीही देणं घेणं नाही- मुनगंटीवार
“आम्हाला काँग्रेसची चौकशी समिती आणि चेन्नीथला यांच्या वक्तव्याबाबत काहीही देणं घेणं नाही. आम्हाला जनतेच्या हृदयात विश्वास निर्माण करून विकास साधायचा आहे. चंद्रपूर आमची कर्मभूमी, जन्मभूमी आहे. तिच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आहे. कोण काय बोलतोय याबाबत आम्हाला काहीही म्हणायचं नाही,” अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
-
मंत्रालयातील लाचप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली- सुधीर मुनगंटीवार
“मंत्रालयातील लाच प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी हे सरकार जनसेवेसाठी आहे हे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री यावर कठोर निर्णय घेतील शंका नाही, अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी झिरवाळ यांच्याप्रकरणी दिली आहे. तर जय पवार यांच्याबद्दल ते पुढे म्हणाले, “जय पवार यांनी केलेल्या मागणीबाबत मी इथे बसून प्रतिक्रिया देणार नाही. सर्व तांत्रिक बाजूने तपास सुरू आहे. डीजीसीए आणि राज्याचा गुप्तचर विभाग देखील चौकशी करत आहे.”
-
अजितदादांच्या निधनाबाबत रोहित पवारांच्या आरोपांवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया
कोणीही किती काही शंका निर्माण केल्या तरी माझं म्हणणं इतकंच आहे की पुरावे असतील तर वेगवेगळ्या तपास यंत्रणा काम करतात. सन्माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा ताई यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून सीबीआयच्या चौकशीची मागणी केली. गृहमंत्री अमित शहा यांना सांगतो की तुम्ही पण चौकशी करा. ज्यांच्याकडे जी काही माहिती असेल त्यांनी तपास यंत्रणांना ती माहिती दिली पाहिजे. त्याच्यामध्ये चौकशी करून किती तथ्य आहे ते समजेल, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी अजित पवार यांच्या निधनाबद्दल दिली.
-
रोहितमध्ये अस्वस्थता असून धावपळ करून त्याने अनेक मुद्दे समोर आणले- सुप्रिया सुळे
मुलांमध्ये अस्वस्थता आहे. रोहितमध्ये अस्वस्थता असून धावपळ करून त्याने अनेक मुद्दे समोर आणले आहेत. समस्त पवार कुटुंब आणि लाखो लोकांच्या मनात प्रश्न आहेत, जे अस्वस्थ करणारे आहेत. पार्थ आणि जय यांना मोठा धक्का बसला आहे. अजितदादांची अपुरी स्वप्नं आपण पूर्ण करूयात. रोहित अनेक मुद्दे मांडत आहे, अनेकांना त्याची काळजी वाटत आहे, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.
-
तेजस ठाकरे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज
तेजस ठाकरे यांना एचय एन. रिलायन्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आठवडाभरानंतर तेजस ठाकरेंना डिस्चार्ज मिळाला आहे. इन्फेक्शन झाल्यामुळे तेजस ठाकरेंची तब्येत बिघडली होती.
-
छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात राज ठाकरे दाखल, आदित्य ठाकरेही उपस्थित
छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात मनसे अध्यक्ष राज ठाकरे दाखल झाले, आदित्य ठाकरेही उपस्थित होते. राज ठाकरेंनी शिवरायांना केलं अभिवादन. छत्रपती शिवाजी महाराज पार्कात राज ठाकरे व आदित्या ठाकरे यांच्या हस्ते भूमीपूजन पार पडलं. काही दिवसात या पार्कच सुशोभीकरण होणार आहे.
-
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त धुळ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त धुळ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या वतीने शहरातील प्रमुख मार्गावर मोठ्या शोभा यात्रा, त्यामध्ये ढोल ताशा पथका बरोबर पारंपारिक वाद्यंही होती. तसेच सजीव देखावे वारकरी पथकही होतं. विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह असून हजारो विद्यार्थी शिक्षक सहभागी झाले होते.
-
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर पुन्हा वाहतूक कोंडी
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर पुन्हा वाहतूक कोंडी झाली आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
-
धाराशिव – आमदार तानाजी सावंत यांना डावलून जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेचं चित्र दिसताच सावंत सावध
धाराशिवमध्ये आमदार तानाजी सावंत यांना डावलून जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेचे भाजपचे चित्र दिसताच सावंत सावध पवित्र्यात आहेत. आमदार तानाजी सावंत यांनी तातडीने एकनाथ शिंदे यांची भेट घेतली .
जिल्हा परिषद निकालानंतर पहिल्यांदाच तानाजी सावंत यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली . भाजपकडून शिवसेनेच्या एका गटाला सोबत घेत तानाजी सावंतांना वगळून जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेची सुरू होती रणनीती. भाजप आणि शिवसेनेतूनही तानाजी सावंत यांनी निवडणुकीत फिक्सिंग केल्याचा आरोप.
-
ठाणे महापालिकेकडून मालमत्ता कर वसुली जोमात, आतापर्यंत 518 कोटी वसूल
ठाणे महापालिकेची मालमत्ता कर वसुली जोमात सुरु आहे. पालिका निवडणुकीनंतर प्रशासनाने वसुलीवर भर दिला असून मालमत्ता करपोटी आतापर्यंत तब्बल 604 कोटी 77 लाख जमा झाले आहेत. मागील वर्षी याच काळात 518 कोटींची वसुली झाली होती. 80 टक्के इतकी वसुली झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा 56.83 कोटींची अधिकची वसुली आतापर्यंत झाली आहे.
-
शिवराय नसते तर भारताचा इतिहास, भूगोल राहिला नसता – देवेंद्र फडणवीस
मी शिवरायांना मानाचा मुजरा करतो. शिवरायांनी छत्रपती शिवरायांच्या राज्यात समता होती, सन्मान होता. रयतेचे राज्य स्थापित करण्याचा कानमंत्र जिजाऊंनी दिला. शिवराय नसते तर भारताचा इतिहास, भूगोल राहिला नसता. छत्रपती शिवरायांनी १८ पगड जातीच्या मावळ्यांना एकत्र केलं, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवनेरी किल्ल्यावरील भाषणादरम्यान म्हटलं.
-
मुंबईची सगळी प्रवेशद्वारे सुंदर करायची आहेत : रितू तावडे
आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मला येथे पुष्पहार अर्पण करण्याचा बहुमान मिळाला, याबद्दल मी स्मारक समितीचे मनापासून आभार मानते. मुंबईसाठी काम सुरु झालंय, गेट वे ऑफ इंडिया परिसरात रोहिंग्ये आणि बांगलादेशी यांची संख्या वाढतेय, तुम्ही तुमच्या देशात परत जा, मुंबईची सगळी प्रवेश द्वारे सुंदर करायची आहेत, दहिसर, मुलुंड चेक नाका, ऐरोली, इथे नवे प्रवेश द्वार तयार करणार आहोत. धूळीवर नियंत्रण करण्यासाठी ग्रीन झोन मेंटेन करणार आणि चेरी ब्लाॅसेमची झाडे लावणार आहोत. सुरंगीची झाडे लावणार आणि मुंबई सुगंधित करणार आहे, असे विधान मुंबईच्या महापौैर रितू तावडे यांनी केले.
-
शिवरायांनी रयतेचे राज्य तयार केलं, त्या जयघोषाने आम्हाला प्रेरणा मिळते – एकनाथ शिंदे
शिवनेरी किल्ल्यावरुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण केले. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, शिवरायांनी रयतेचे राज्य तयार केलं आहे. शिवरायांच्या जयघोषाने आम्हाला प्रेरणा मिळते. मातीच्या कणाकणात शिवराय आहेत. महाराजांची शेतकऱ्यांना सैनिक केले. किल्ले शिवनेरीवर नवी ऊर्जा, प्रेरणा मिळते.
-
शिव-शाहू-फुले आंबेडकरांचा वारसा मी कधीही विसरणार नाही – सुनेत्रा पवार
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार शिवनेरीवर भाषणावेळी भावूक झाल्याचे पाहायला मिळत आहे. शिव-शाहू-फुले आंबेडकरांचा वारसा मी कधीही विसरणार नाही. आजचा दिवस माझ्यासाठी जबाबदारीची जाणीव करुन देणारा आहे. या ठिकाणाहून अजित दादांनी अनेकवेळा शिवरायांना वंदन केलंय, असे सुनेत्रा पवार यांनी भाषणावेळी म्हटले.
-
छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त नवा आदर्श, डीजेचा खर्च टाळत भेट म्हणून दिली साडी चोळी
सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सोलापुरातील मराठा वस्ती परिसरातील मंडळाने नवा आदर्श दिला आहे. मागील 7 वर्षापासून डीजेमुक्त शिवजयंती साजरी करत शिवजागर केला जात आहे. डीजेचा खर्च टाळत परिसरातील महिलांना मराठमोळी साडी-चोळीचा पोशाख भेट म्हणून दिला जात आहे. मराठी संस्कृती, परंपरा टीकावी आणि डिजेमुक्त उत्सव साजरा करण्यासाठी हा प्रयत्न असल्याचे सांगितले जाते. आता मंडळाच्या या संकल्पनेचे कौतुक संपूर्ण शहरात होत आहे.
-
पुण्यात खुनाचा कट उधळला, सराईत गुन्हेगाराकडून बंदूक जप्त
पुण्यात सराईत गुन्हेगाराकडून बंदूक जप्त करून पोलिसांनी खुनाचा कट उधळल्याची घटना घडली आहे. दांडेकर पूल परिसरातून चेतन जाधव याला पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. याप्रकरणी खंडणी विरोधी पथकाने कारवाई केली आहे. अटक केलेला आरोप हा सराईत गुन्हेगार आहे. खंडणी विरोधी पथकाने त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काढतुसे असे एकूण 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
-
पुण्यातील जगदाळे कुटुंबाने घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात जगदाळे कुटुंबातील संतोष जगदाळे यांचा मृत्यू झालेला होता, त्यांच्या पश्चात त्यांची मुलगी असावरी जगदाळे हिला शासकीय नोकरी देण्याचा आश्वासन काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारने दिले होते मात्र अद्यापही तिला पुणे महानगरपालिकेत शासकीय नोकरीत सामावून घेतलेले नव्हते…त्यामुळे जगदाळे कुटुंबाने नाराजी व्यक्त केली होती याच संदर्भात काही दिवसांपूर्वी खासदार मेधा कुलकर्णी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडे पत्र देऊन मागणी केली होती..
-
नाशिकच्या धर्तीवर त्रंबकेश्वरमध्ये गोदा आरती सुरू करण्याचा मानस
नाशिकच्या धर्तीवर त्रंबकेश्वर मध्ये देखील गोदा आरती सुरू करण्याचा मानस. आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने आणि धार्मिक पर्यटन वाढीसाठी त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त येथे रोज गोदा आरती सुरू करण्याचा विचार. स्थानिक पुरोहित संघ आणि नागरिकांची चर्चा करून निर्णय घेणार. गेल्या काही महिन्यांपूर्वी नाशिकच्या रामकुंड भागात गोदा आरती सुरू करण्याचा झाला होता निर्णय. याच पार्श्वभूमीवर त्रंबकेश्वर मध्ये देखील रोज कुशावर्त या ठिकाणी गोदा आरती सुरू करण्याचा विचार
-
तुळजाभवानी मंदिरात मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून शिवजयंती सोहळा साजरा
धाराशिव-तुळजाभवानी मंदिरात मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून शिवजयंती उत्सव सोहळा साजरा करण्यात आला. तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराजांचे दैवत असल्याने या पूजेला महत्त्व आहे. त्यामुळे देवीच्या गाभाऱ्यात सिंहासन पूजा करून शिवअभिषेक करण्यात आला. यानिमित्त श्री तुळजाभवानी मंदिरात शिवभक्तांनी प्रदक्षिणा घालत छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला यावेळी महिलांचाही उत्स्फूर्त सहभाग होता.
-
बनगाव पाणीपुरवठा योजना ठप्प, 36 गावांवर पाणीटंचाई
वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांची पाण्यासाठी पायपीट. जि.प.च्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह. देखभाल-अभावामुळे बनगाव योजना वारंवार बंद. उन्हाळ्यात गावकऱ्यांचे हाल….
-
शिवनेरी गडावर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे दाखल
शिवनेरी गडावर आज आकर्षक सजावट करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे गडावर दाखल झाले आहेत.
-
राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह…
आज राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह बघायला मिळतोय. राज्यपालांकडून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याल पुष्पहार अर्पण करण्यात आला.
-
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti : मराठा वस्ती परिसरातील मंडळाने घालून दिला नवा आदर्श
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सोलापुरातील मराठा वस्ती परिसरातील मंडळाने घालून दिला नवा आदर्श. मागील 7 वर्षापासून डीजेमुक्त शिवजयंती साजरी करत केला जातोय शिवजागर. डीजेचा खर्च टाळत परिसरातील महिलांना मराठमोळी साडी-चोळीचा पोशाख दिला जातोय भेट.मराठी संस्कृती, परंपरा टीकावी आणि डिजेमुक्त उत्सव साजरा करण्यासाठी हा प्रयत्न असल्याचे सांगितले जाते. मंडळाच्या या संकल्पनेचे कौतुक संपूर्ण शहरात होत आहे.
-
धाराशिव जिल्हा परिषदेतील भाजपचे सदस्य कर्नाटकात सहलीवर
धाराशिव जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेचं अंकगणित अजूनही अंतिम टप्प्यात पोहोचलेलं नसताना भाजपचे काही जिल्हा परिषद सदस्य कर्नाटकात सहलीवर आहेत .उत्तर कन्नड जिल्ह्यातील बीच वर त्यांनी फेरफटका मारला तसेच जंगल सफारीसाठी त्यांनी दांडेली परिसर गाठत दांडेली वाईल्डलाइफ अभयारण्यात सफारीचा अनुभव घेतल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
-
नाशिकमध्ये अंमली पदार्थ विक्री करणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात
नाशिक मध्ये एम.डी. अंमली पदार्थ विक्री करणारा तरुण अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या ताब्यात. चेतना नगर परिसरात सापळा रचून वैभव पांडुरंग आव्हाड (वय २५) याला अटक. राहत्या घरात मेफेड्रॉन (एम.डी.) अंमली पदार्थ विक्रीसाठी साठा केल्याची गोपनीय माहिती. प्रभारी वपोनि सुशिला कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली अचूक कारवाई.
-
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti : 422 किल्ल्यांच्या नावातून उभा राहिला शिवछत्रपतींचा तेजोमय पोर्ट्रेट
कल्याण मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अनोखी कलाकृती साकार. 422 किल्ल्यांच्या नावातून उभा राहिला शिवछत्रपतींचा तेजोमय पोर्ट्रेट चित्राचा अविष्कार. संशोधक कलावंत डॉ. दिनेश गुप्ता आनंदश्री यांची दोन दिवसांची परिश्रमपूर्वक कलासाधना. युनेस्कोच्या जागतिक वारसा दर्जातून मिळाली प्रेरणा. इतिहास, कला आणि राष्ट्रप्रेरणेचा अनोखा संगम.
-
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti : जय जिजाऊ, जय शिवराय घोषणांनी परिसर दणाणला
शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी शिवप्रेमींची मोठी गर्दी झाली होती. छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर उत्साहाचं वातावरण. जय जिजाऊ, जय शिवराय घोषणांनी परिसर दणाणला
-
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti : मध्यरात्री 12 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांची महाआरती
जळगावात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने मध्यरात्री 12 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांची महाआरती करण्यात आली. भाजप आमदार सुरेश भोळे, महापौर दीपमाला काळे, नगरसेवक सुनील खडके यांच्या हस्ते करण्यात आली महाआरती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ हजारोंच्या संख्येने शिवप्रेमी नागरिक महाआरती करण्यासाठी उपस्थित होते.
-
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti : आज आग्र्यातही साजरी होणार शिवजयंती
आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. आग्र्या मध्ये ही मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली जाणार आहे. अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानच्या वतीने आग्रा येथे लाल किल्ल्यावर मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सायंकाळी सात वाजता आग्रा येथील लाल किल्ल्यावर होणाऱ्या शिवजयंती उत्साहात सहभागी होणार आहेत.
Published On - Feb 19,2026 8:16 AM
