AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मिसळ खायला जाताय? आधी ही बातमी वाचा! नाशिककरांच्या आवडत्या हॉटेल्समध्ये अस्वच्छतेचा कळस; 5 नामांकित हॉटेल्सवर प्रशासनाचा छापा

Nashik Famous Misal Hotels Raids: नाशिकमधील नामांकित हॉटेल्सवर अन्न प्रशासनाने छापा टाकला आहे. 5 हॉटेल्समधील अस्वच्छता उघड झाली आहे. दुर्गा कॅफेचे प्रमाणपत्र निलंबित करण्यात आले आहे.

मिसळ खायला जाताय? आधी ही बातमी वाचा! नाशिककरांच्या आवडत्या हॉटेल्समध्ये अस्वच्छतेचा कळस; 5 नामांकित हॉटेल्सवर प्रशासनाचा छापा
Popular Nashik Hotels Under Fire Over Hygiene Viola
| Updated on: Nov 21, 2026 | 9:35 PM
Share

नाशिक शहरातील नामांकित हॉटेल्स आणि खाद्यपदार्थांच्या ठिकाणी मिळणाऱ्या अन्नाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आणि अस्वच्छतेच्या तक्रारींनंतर अन्न व औषध प्रशासनाने नाशिकमधील पाच नामांकित हॉटेल्सवर कारवाई केली आहे. या तपासणीत हॉटेल्समध्ये अस्वच्छता, किटकांचा प्रादुर्भाव, अन्नपदार्थांच्या साठवणुकीतील त्रुटी तसेच मुदतबाह्य अन्नपदार्थ आढळून आले.

मिळालेल्या माहितीनुसार, कॉलेज रोडवरील दुर्गा कॅफेचे नोंदणी प्रमाणपत्र निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे शहरातील हॉटेल व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. अन्न सुरक्षा नियमांचे पालन केले जात आहे की नाही, याची तपासणी करण्यासाठी प्रशासनाने विविध हॉटेल्सची पाहणी केली. यामध्ये हॉटेल विहार, हॉटेल शामसुंदर, दुर्गा कॅफे, हॉटेल तुषार मिसळ आणि हॉटेल महाराजा काठियावाडी या पाच आस्थापनांमध्ये गंभीर त्रुटी आढळल्या.

गंगापूर रोडवरील जुन्या गंगापूर नाक्याजवळ असलेल्या हॉटेल विहारमध्ये अन्न तयार करण्याच्या ठिकाणी अस्वच्छता आणि किटकांचा प्रादुर्भाव आढळला. सातपूर एमआयडीसी परिसरातील हॉटेल शामसुंदरमध्येही अस्वच्छ परिस्थिती आणि अन्न साठवणुकीबाबत त्रुटी निदर्शनास आल्या. कॉलेज रोडवरील क्यूबवर्ल्ड बिझनेस सेंटरमधील दुर्गा कॅफेमध्ये अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळले. ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या बिलांवर FSSAI परवाना क्रमांक नमूद नव्हता.

तसेच मेन्यू कार्ड किंवा डिस्प्लेवर स्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या माध्यमाचा उल्लेखही नव्हता. यामुळे या कॅफेचे नोंदणी प्रमाणपत्र निलंबित करण्यात आले. कॉलेज रोडवरील हॉटेल तुषार मिसळमध्ये अन्न साठवणुकीसाठी अपुरी जागा आणि मुदतबाह्य अन्नपदार्थ आढळले. तर पंचवटीतील मुंबई-आग्रा रोडवरील आडगाव फाटा परिसरातील हॉटेल महाराजा काठियावाडीच्या स्टोअर रूममध्ये उंदरांची विष्ठा आढळली. तसेच मुदतबाह्य अन्नपदार्थ साठवून ठेवल्याचे आणि धूळ व किटकांचा प्रवेश रोखण्यासाठी योग्य व्यवस्था नसल्याचे तपासणीत समोर आले.

या कारवाईतून शहरातील काही नामांकित खाद्य आस्थापनांमधील स्वच्छता आणि अन्न सुरक्षिततेबाबत गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत. हॉटेलमध्ये चव आणि लोकप्रियतेसोबतच स्वच्छता, अन्न साठवणूक आणि सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर प्रशासनाकडून पुढील काळातही कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

Follow Us
मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? अहिर म्हणाले?
Sachin Ahir : मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? सचिन अहिर काय म्हणाले?
मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा...
Deven Bharati : डायल 112 पासून GPS ट्रॅकिंगपर्यंत…; मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा दावा
चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
Dharashiv Farmer : चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे
Pune : बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे गावची अनोखी काटेबारस यात्रा, व्हिडिओ बघाच
एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर चंदनशिवे स्पष्टच बोलले
Nitin ChandanShive : एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर नितीन चंदनशिवे स्पष्टच बोलले
माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
Narhari Zirwal on Sharad Pawar : माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर...
Sugarcane Rate Protest : उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर स्थगित
गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
CM Devendra Fadnavis : गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी शाह खासदार विकत घेत आहेत...
Sanjay Raut : एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी अमित शाह खासदार विकत घेत असल्याचा संजय राऊतांचा दावा
माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे...
Amol Kolhe : माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे स्पष्टच म्हणाले...