व्यक्तिरेखा जिवंत वाटावी म्हणून तासान् तास स्मशानात बसून राहायचा विकी कौशल, वाचा मसान चित्रपटाचा किस्सा…

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) हे आज चित्रपटसृष्टीत एक मोठे नाव आहे. सध्या तो कतरिना कैफसोबत अफेअर आणि एंगेजमेंटच्या अफवांमुळे खूप चर्चेत आहे. विकी कौशलच्या फिल्मी करिअरबद्दल बोलायचे तर 'मसान' (Masan) या चित्रपटाने त्याचे नशीब बदलले.

व्यक्तिरेखा जिवंत वाटावी म्हणून तासान् तास स्मशानात बसून राहायचा विकी कौशल, वाचा मसान चित्रपटाचा किस्सा...
विकी कौशल
Follow us
| Updated on: Aug 22, 2021 | 9:03 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) हे आज चित्रपटसृष्टीत एक मोठे नाव आहे. सध्या तो कतरिना कैफसोबत अफेअर आणि एंगेजमेंटच्या अफवांमुळे खूप चर्चेत आहे. विकी कौशलच्या फिल्मी करिअरबद्दल बोलायचे तर ‘मसान’ (Masan) या चित्रपटाने त्याचे नशीब बदलले. याच चित्रपटाने विकीला बॉलिवूडमधील उदयोन्मुख अभिनेत्याची ओळख मिळवून दिली. याआधी त्याने 3-4 चित्रपटांमध्ये फक्त किरकोळ भूमिका केल्या होत्या. मुख्य अभिनेता म्हणून विकीचा हा पहिला चित्रपट होता. विकीसाठी मसान हा चित्रपट सोपा नव्हता कारण विकीने केलेला अभिनय आणि त्यामागची मेहनत तोच करू शकतो.

या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान विकी अनेक दिवस स्मशानात बसत असे. तो प्रत्येक मृतदेह डोळ्यांसमोर जळताना पाहत असे. एवढेच नाही तर विकी कौशलच्या पात्राशी संबंधित बहुतेक दृश्ये स्मशानभूमीत चित्रीत केली गेली. चला तर, ‘मसान’ चित्रपटाचा हा किस्सा जाणून घेऊ..

दररोज मृतदेह बघायचा..

‘मसान’ हा तरुण दिग्दर्शक नीरज घायवानचा पहिला चित्रपट होता. मसानचे शूटिंग सुरू होण्याआधी विकी कौशल दररोज मणिकर्णिका घाटावर तासनतास बसायचा. या काळात त्याने अनेक मृतदेह राखेत बदलताना पाहिले होते. काळा, गोरा, सुंदर, कुरूप, श्रीमंत, गरीब, लठ्ठ, हाडकुळा. विकीला बऱ्याचदा वाटले की, या घाटावर लोक निघून जातात आणि फक्त त्यांचे काम फक्त मागे राहते.

विकीच्या वडिलांची भूमिकाही खडतर

‘मसान’ चित्रपटात विकीचे वडील बनलेले विनीतचे पात्रही खूप कठीण होते. तो चित्रपटात डोमराजाची भूमिका साकारत होता. डोम म्हणजे मृत लोकांना जाळणारे लोक. या चित्रपटासाठी विनीतने एका आठवड्यासाठी मणिकर्णिका घाटावर मृतदेहांना अग्नी देण्याचे काम केले होते. या चित्रपटात चांगले काम करता यावे, म्हणून तो दररोज 10 तास घाटावर काम करत असे.

अंत्यसंस्काराचे खरे दृश्य

‘मसान’ चित्रपटाचे चित्रीकरण बनारसमधील वेगवेगळ्या स्मशानभूमींमध्ये करण्यात आले आहे. या दरम्यान, चित्रपटातील कलाकार अग्नी दिल्या जाणाऱ्या मृतदेहांमध्ये वावरत असत. चिता जाळण्यापासून ते मृतदेह पलटवण्यावण्यापर्यंतची दृश्येही प्रत्यक्षात चित्रित केली गेली. अशा प्रकारचे काम कोणत्याही अभिनेत्यासाठी खूप कठीण असते. परंतु, कलाकारांनी चित्रपट जिवंत वाटावा म्हणून पूर्ण समर्पणाने आपली भूमिका बजावली.

पुरस्कारांचा वर्षाव

विकी कौशल सोबत पंकज त्रिपाठी, संजय मिश्रा, रिचा चड्ढा, श्वेता त्रिपाठी या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते. 2015 मध्ये कान्स चित्रपट महोत्सवात या चित्रपटाने दोन पुरस्कारही जिंकले. यासह, समीक्षकांनी देखील चित्रपटाची कथा आणि सादरीकरणाचे कौतुक केले. दिग्दर्शक नीरज घायवान यांनाही त्यांच्या पहिल्याच चित्रपटातून बरीच ओळख मिळाली.

हेही वाचा :

मुंबईत खासगी विमानतळावर ऐश्वर्या राय-बच्चन स्पॉट, ड्रेसमुळे प्रेग्नंट असल्याची चर्चा

आई कशी, गोड गोड मिठाईच जशी! पाहा ‘अरुंधती’ फेम मधुराणी आणि मिठाईचं हे भन्नाट कनेक्शन

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.