आई कशी, गोड गोड मिठाईच जशी! पाहा ‘अरुंधती’ फेम मधुराणी आणि मिठाईचं हे भन्नाट कनेक्शन

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेतून ‘अरुंधती’ (Arundhati) बनून आभिनेत्री मधुराणी प्रभुलकर प्रेक्षकांच्या घरोघरी पोहोचली. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या मधुराणी प्रभुलकर यांचे अनेक फॅन पेज देखील आहेत. यावारुंच्या तिच्या लोकप्रियतेचा अंदाज लावता येतो.

1/6

2/6
नुकतेच एका अशाच फॅन पेजने मधुराणी प्रभुलकर यांच्या रोजच्या लूकची थेट गोड गोड मिठाईंशी भन्नाट तुलना केली आहे. यात अगदी त्यांच्या लाल साडीची गुलाबजामशी तर हिरव्या साडीची मावा बर्फीशी तुलना केली आहे.

3/6
आई कशी, गोड गोड मिठाईच जशी! कदाचित तिच्या चाहत्यांना या फोटोंमधून हेच म्हणायचं असेल. या फोटोंमध्ये आईचा अर्थात मधुराणी प्रभुलकर याचा ‘अरुंधती’ लूक तर दिसतोच आहे. मात्र, काही फोटोंमध्ये हटके ग्लॅमरस लूकही दिसत आहे.

4/6
मालिकेत एकीकडे अनिरुद्ध-अरुंधतीचा घटस्फोट दाखवला जात आहे, तर दुसरीकडे ‘अरुंधती’ साकारणाऱ्या मधुराणी प्रभुलकर यांनी सोशल मीडियावर नवा लूक शेअर केला होता. या लूकमध्ये मधुराणी अतिशय शॉर्ट केसांसह नव्या लूकमध्ये दिसत आहे. या फोटोंमुळे सोशल मीडियावर अरुंधतीच्या बदलत्या लूकची देखील चर्चा होत आहे.

5/6
नेहमी साधी साडी, वेणी अशा सोज्वळ अवतारात दिसणारी आई सोशल मीडियावर मात्र बऱ्याचदा ‘फन’ लूकमध्ये दिसली आहे. मधुराणी प्रभुलकर यांनी बऱ्याचदा शॉर्ट्स आणि टी-शर्ट परिधान केलेले फोटो देखील शेअर केले आहेत. लाडक्या ‘आई’चा हा हटके अवतार पाहून प्रेक्षकही अवाक् होतात.

6/6
सध्या मालिकेत अरुंधतीला पुन्हा समृद्धी बंगल्यात आणणार हे ऐकून संजना प्रचंड संतापली आहे. तिचा देखील घटस्फोट झाल्याने आता संजना लग्नासाठी अनिरुद्धच्या मागे लागली आहे. त्यातच अरुंधती घरी येणार हे कळल्यावर आणि घटस्फोटानंतरही अनिरुद्धचा तिच्याकडे वाढता झुकाव बघता संजनाला खूप असुरक्षित वाटू लागलं आहे. त्यामुळे आजारी अरुंधती घरी आल्यावर संजना लग्नाचा घाट घालणार आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI