‘देवदास’चं गाणं डोक्यात बसलं अन् कवी म्हणून उदय झाला; वाचा हृदयनाथ सिन्नरकरांचा किस्सा

हृदयनाथ सिन्नरकर हे दलित साहित्यातील मोठं नाव आहे. विद्रोही कवी म्हणून त्यांची ओळख आहे. कवितेबरोबरच त्यांनी गीत लेखनही केलं. त्यामुळे एकाचवेळी त्यांची साहित्य क्षेत्रात आणि आंबेडकरी कलावंतांमध्ये त्यांची मुशाफिरी सुरू होती. (Hridaynath Sinnarkar)

'देवदास'चं गाणं डोक्यात बसलं अन् कवी म्हणून उदय झाला; वाचा हृदयनाथ सिन्नरकरांचा किस्सा
Hridaynath Sinnarkar


मुंबई: हृदयनाथ सिन्नरकर हे दलित साहित्यातील मोठं नाव आहे. विद्रोही कवी म्हणून त्यांची ओळख आहे. कवितेबरोबरच त्यांनी गीत लेखनही केलं. त्यामुळे एकाचवेळी त्यांची साहित्य क्षेत्रात आणि आंबेडकरी कलावंतांमध्ये त्यांची मुशाफिरी सुरू होती. कलेचा हा वारसा स्वत:पुरता मर्यादित न ठेवता त्यांनी पुढच्या पिढीलाही दिला. त्यामुळे त्यांच्या हाताखालून अनेक कवी आणि गीतकारही घडले. सिन्नरकर दादांची जडणघडण नेमकी कशी झाली? त्याचा घेतलेला हा आढावा. (who is hridaynath sinnarkar know about him)

वंदना हॉटेल आणि गप्पांची मैफल

सत्तरच्या दशकात साहित्य चळवळ जोमात होती. त्याकाळी कवी, लेखक मंडळींचे कट्टे असायचे. इराण्याची हॉटेल्स, सेंट्रल लायब्ररी आणि मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या कट्ट्यावर बसून ही मंडळी चर्चा करायची. त्यातून विचारांचं अदानप्रदान व्हायचं. सकस साहित्याची निर्मिती व्हायची. मुलुंड पश्चिमेला डंपिंग ग्राऊंड रोडवर गौतम नगरमध्ये एक स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमी जवळच चार रस्त्यावर वंदना हॉटेल आहे. या हॉटेलजवळही साहित्यिकांची मैफल जमायची. सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होणारी ही मैफल रात्री उशिरापर्यंत चालत असते. हो रोज व्हायचं. या मैफलीत अनेक मातब्बर साहित्यिक सामिल व्हायचे. त्यात हृदयनाथ सिन्नरकर, प्रशांत अम्बादे, विलास बसवंत, दत्ता खरात, सुरेंद्र बर्वे, विक्रम वाघमारे, मनोहर साळवे, भारत निकाळजे, साजन शिंदे, किरण सोनावणे आणि आशिष जगताप यांचा समावेश असायचा. यातील काहीजण आज हयात नाहीत. त्यापैकीच हृदयनाथ सिन्नरकरही आज हयात नाही.

दगडू जाधव, गोविंदसुत ते हृदयनाथ सिन्नरकर

या सर्वांमध्ये हृदयनाथ सिन्नरकर हे सर्वात ज्येष्ठ. त्यांना साहित्याची प्रचंड जाण होती. ते स्वत: विद्रोही कवी आहेत. त्यामुळे या वर्तुळात त्यांचा दबदबा होता. म्हणूनच त्यांना सर्वजण सिन्नरकरदादा म्हणायचे. त्याच नावाने ते परिचित होते. सिन्नरकर दादांचं मूळ नाव दगडू गोविंद जाधव. ते नाशिक जिल्ह्यातील सिन्नरचे. त्यांचा जन्म 1935चा. रेल्वेतेली प्रदीर्घ सेवेनंतर ते निवृत्त झाले होते. जुनी नॉन मॅट्रीक असलेल्या सिन्नरकरदादांनी 1956 पासून लिखाणास सुरुवात केली. विठ्ठलनाथ कांबळे हे त्यांचे गुरू. कांबळेंच्या सानिध्यात राहूनच दादांची कवी म्हणून जडणघडण झाली. सुरुवातीला दादा ‘गोविंदसुत’ या नावाने गीत लेखन करायचे. पण विठ्ठलनाथांनीच दादांचं दगडू गोविंद जाधव हे नाव बदलून हृदयनाथ सिन्नरकर असं नामकरण केलं. पुढे ते याच नावाने प्रसिद्ध झाले.

म्हणून धार्मिक गीतं लिहिली

दादांनी 1954 पासूनच खऱ्या अर्थाने लिखाणाला सुरुवात केली होती. तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केलं नव्हतं. त्यामुळे त्यांच्या लिखाणात देवदेविकांची स्तुती येत होती. 1956 नंतरही त्यांनी देवाधर्माची गाणी लिहिली. कारण त्यांना एका गाण्याचे 750 रुपये मिळायचे. कॅसेट कंपनीवाले एका भीमगीतांमागे देवांची पाच गाणी लिहून घ्यायचे. त्यामुळे अखेर दादांनी देवांची गाणी लिहिणं कायमचंच बंद केलं.

‘देवदास’चं गाणं डोक्यात बसलं अन्…

1954मध्ये दादा कुर्ला येथे राहायला आले. त्यावेळी आकाश थिएटरमध्ये बिमल रॉयचा ‘देवदास’ हा सिनेमा लागला होता. दादांनी हा सिनेमा पाहिला आणि त्यातील गाण्यांनी ते प्रचंड प्रभावीत झाले. ‘देवदास’मधील ‘आन मिलो, आन मिलो, शाम सवेरे’ हे गाणं दादांना खूपच भावलं. हे गाणं त्यांना खूपच भावलं. ही धून डोक्यात बसली आणि त्यावरून त्यांनी श्रीकृष्णावरील गाणं लिहिलं.

सांग उद्धवा, सांग उद्धवा,
नंदकुमारा नेले कोण्या गावा…

दादांनी खऱ्या अर्थाने लिहिलेलं हे पहिलं गीत होतं. त्यावेळी त्यांचं वय होतं केवळ 18.

तारू जीवनाचं किनाऱ्याला लावलं,
माझ्या भीमानं, मला जग दावलं…

दादांनी बाबाासाहेबांवर लिहिलेलं हे पहिलं गीत आहे. त्यानंतर त्यांनी आंबेडकरी गीते लिहिण्यास सुरुवात केली. त्यात आयुष्याच्या अखेरपर्यंत कधीच खंड पडला नाही. (साभार: ‘आंबेडकरी कलावंत’मधून) (who is hridaynath sinnarkar know about him)

संबंधित बातम्या:

किरण सोनावणे : गाणं आणि धर्मकारणाचा पूल सांधणारा गायक!

कॅसेटमध्येच नव्हे तर मोर्चा, आंदोलनातही गाणी म्हटली जाऊ लागली; किरण सोनावणेंचे हे पैलू वाचाच!

आई सोंगणी करताना गायची, मुलगा कोरस द्यायचा; किरण सोनावणेंचा गायक म्हणून घडतानाचा रंजक प्रवास

(who is hridaynath sinnarkar know about him)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI