AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

किरण सोनावणे : गाणं आणि धर्मकारणाचा पूल सांधणारा गायक!

गायक, गीतकार किरण सोनावणे यांनी गाणी लिहिली आणि गायली. पण त्यांनी आपलं क्षेत्रं मर्यादित ठेवलं नाही. त्यांनी धार्मिक कार्यातही भाग घेतला. (kiran sonavane)

किरण सोनावणे : गाणं आणि धर्मकारणाचा पूल सांधणारा गायक!
Kiran Sonawane
| Edited By: | Updated on: Aug 21, 2021 | 7:47 AM
Share

मुंबई: गायक, गीतकार किरण सोनावणे यांनी गाणी लिहिली आणि गायली. पण त्यांनी आपलं क्षेत्रं मर्यादित ठेवलं नाही. त्यांनी धार्मिक कार्यातही भाग घेतला. भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून त्यांनी धार्मिक कार्य केलं. लोकांमध्ये बौद्ध धर्माविषयी जागृती करण्याचं कामही त्यांनी केलं. तर दुसरीकडे गाणं लिहिणंही सुरूच ठेवलं. (read about best of Kiran Sonavane songs)

किरण सोनावणे यांची लोकप्रिय गाणी…

सांगा कधी मावळेल, बेकीचा अंधार दाट, एकतेची उगवेल कधी सोनेरी पहाट… कवी होता तो वामन, साऱ्या समाजाचा प्राण, बोट तयाचं धरून, वाट चालला किरण, गाणं ऐक्याचं लिहिता, वय झालं त्याचं साठ…

‘फिटे अंधाराचे जाळे’ या गाण्याच्या चालीवरील त्यांचं हे गाणं खरोखरच अंतर्मुख करायला लावणारं आहे.

ये झुठ है की गम को भुला देती है शराब, भुले गमो की याद दिला देती है शराब… मरने के बाद आग जलाती है लाश को, पर जिंदे आदमी को जला देती है शराब…

किंवा

बौद्ध महिलांनी एकत्र येऊन, आता घरोघरी जाऊन, गोडी धम्माची भगिनींना लावून, धम्म सांगा समजावून…

अशी असंख्य प्रबोधनपर गीतं त्यांनी लिहिली. राहुल अन्वीकर आणि सुषमादेवी हे त्यांचे आवडते गायक-गायिका आहेत. महाकवी वामनदादा कर्डक, राजानंद गडपायले, विठ्ठलनाथ कांबळे आणि श्रीधर ओहोळ हे त्यांचे आवडते गीतकार आहेत. श्रीधर ओहोळ डाव्या हाताने लिहायचे. पण त्यांची गीतं उजवी होती, असा सोनावणेंचा अभिप्राय आहे. अनेक आघाडीच्या गायक-गायिकांनी त्यांची गाणी गायली आहेत. तर अनेकांबरोबर त्यांचे सामनेही रंगले आहेत.

डबल मिनिंगची गाणी नकोच

सुरुवातीच्या काळात देव-देवतांची आणि डबल मिनिंगची गाणी लिहिल्याचं ते मान्य करतात. परंतु, गीतकारांनीच डबल मिनिंगची गाणी लिहिणं बंद केलं पाहिजे. म्हणजे गायक ती गाणी गाणारच नाहीत, असं ते सांगतात. सोनावणे यांची गाणी पंजाबच्या ‘शुक्रिया’ मासिकातही छापून आली आहेत. ते शीघ्रकवी आहेत. सामाजिक जागृती हा त्यांच्या गाण्याचा केंद्रबिंदू आहे. चळवळीसाठी आणि चळवळीच्या प्रचार प्रसारासाठीच आपण गाणी लिहितो असं त्यांनी सांगितलं.

दूध प्यायलो जिचे त्या आईची चिता पटेविताना हे माझे कर कंपले ते आता लाखो जन भेटतील आपले पण, खऱ्या मायेचे सुख ते संपले… वाट मी चाललो जिचे बोट धरून तिच गेली आई अर्ध्या वाटेवरून या कठोर जगाच्या अंधारामधून वाट दावणारे किरण ते लोपले…

सोनावणे यांचं हे गीत अत्यंत लोकप्रिय आहे. एक अजरामर गीत म्हणूनही त्याकडे पाहिले जाते. सोनावणे यांनी बौद्ध धर्म प्रचार प्रसाराचं कामही केलं आहे. ते भारतीय बौद्ध महासभा मुलुंड शाखेचे अध्यक्ष होते. (साभार: आंबेडकरी कलावंत) (read about best of Kiran Sonavane songs)

संबंधित बातम्या:

कॅसेटमध्येच नव्हे तर मोर्चा, आंदोलनातही गाणी म्हटली जाऊ लागली; किरण सोनावणेंचे हे पैलू वाचाच!

आई सोंगणी करताना गायची, मुलगा कोरस द्यायचा; किरण सोनावणेंचा गायक म्हणून घडतानाचा रंजक प्रवास

थिएटरमध्ये गाण्याची पुस्तके, खाद्यपदार्थ विकले, डोअर किपरचा गायक कसा झाला?, वाचा किरण सोनावणेंचा प्रवास!

(read about best of Kiran Sonavane songs)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.